जगातील सर्वात क्रुर व्यक्तींबद्दल माहीत आहे का? यांचं क्रौर्य केवळ वाचतानाही अंगावर काटा येतो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगामध्ये आजपर्यंत अनेक अमानवी कृत्ये घडलेली आहेत आणि त्यामुळे जगासोबतच इतर घटकांबरोबर जी वितहानी देखील प्रचंड नुकसान करून गेली आहे. इतिहासात मागे वळून बघताना असे जाणवते की जर एखादी घटना घडली नसती तर फार मोठा नरसंहार टळला असता!
परंतु ती घटना टाळता येत नसेल तरी अशा घटनांमधून शिकणं गरजेचं असतं. या प्रत्येक अप्रिय घटनेमागे एक हींस्त्र चेहरा होता, त्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी जरी असली तरी या क्रूर व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात अमानवीय कृत्य केलं आहे.

आजही इतिहासात या व्यक्तींकडे कधीच चांगल्या नजरेने बघितलं जाऊ शकत नाही. आपण अशाच काही क्रूर व्यक्तींबद्दल या लेखामधून जाणून घेणार आहोत!
१. ॲडॉल्फ हिटलर

ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा प्रसिद्ध हुकूमशहा होता. तो १९३३ ते १९४५ या काळात जर्मनीचे चांसलर म्हणून कार्यभार सांभाळत होता. हिटलर जगातील सर्वात हुशार आणि क्रूर हुकूमशहा म्हणून ओळखला जातो.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाला बऱ्याच अंशी हिटलर जबाबदार होता असे म्हटले जाते.
त्याने या काळात जगाचा नकाशा बदलून टाकला होता. त्याचा असा ठाम विश्वास होता की जर्मनीमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यू लोक आहेत. त्यामुळे, त्याचा जू लोकांवरती प्रचंड राग होता. याच रागातून त्याने ५० लाखाहून अधिक जू लोकांची हत्या केली.

३० एप्रिल १९४५ ला या जगप्रसिद्ध हुकूमशहाणे त्याच्या बंकरमध्ये आत्महत्या केली. हिटलर एक चांगला कलाकार देखील होता, परंतु त्याच्यातील क्रूर व्यक्तिमत्त्वामुळे तो कलाकार कधीच जगासमोर येऊ शकला नाही.
२. जोसेफ स्टॅलिन

जोसेफ स्टालिन हा सोवियत युनियन म्हणजेच आजचे रशिया येथील एक जगप्रसिद्ध हुकूमशहा होता. त्याने १९२२ पासून १९५३ पर्यंत रशिया वरती राज्य केलं.
तो नेहमीच म्हणत असे की, “एक मृत्यू म्हणजे दुःख होय परंतु लाखो मृत्यू म्हणजे एक नियोजन बद्दल कारभार होय” असा विचार करणाऱ्या स्टॅलिनच्या काळात त्याने लाखो परिवारांना यमसदनी धाडले.
शत्रूंना सोडाच त्याने अशा अनेक परिवारांना देखील संपवलं जे त्याला सर्व काही मानत होते. त्याच्या कार्यकाळात दीड लाखाहून अधिक जर्मन स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले आणि वीस लाखाहून अधिक लोकांचा नरसंहार या स्टालिनच्या काळात घडवून आणण्यात आला.

एवढं सगळं घडूनही जोसेफ स्टॅलिनचे नाव १९४५ आणि १९४८ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले होते. १९५३ मध्ये जोसेफ स्टॅलिन मृत्युमुखी पडला.
३. व्लाद इम्पेलर

व्लाद याला अनेक लोक ड्रॅक्युला म्हणून देखील ओळखतात. तो त्याच्या क्रूर वागणुकीमुळे कुप्रसिद्ध आहे १४४८ ते १४६२ मध्ये त्याने वालाचाहिये इथे दहशत निर्माण केली होती. तो तेथील राजकुमार होता.त्याने त्याच्या कार्य काळामध्ये अनेक विचित्र आणि क्रूर अशी कामं केलेली आहेत.
जी काम ऐकल्यानंतर आजही प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येतात. त्याच्या कार्य काळामध्ये त्याच्या राज्यातील 20% लोकसंख्या कमी झाल्याचे इतिहास सांगतो.
एका जर्मन लेखकाने त्याच्या कारनाम्याविषयी असं लिहिलं आहे की,” तो एकदा रस्त्याने जात असताना काही स्त्रिया त्यांच्या मुलांना दूध पाजत होत्या. त्याने त्या स्त्रियांची स्तन कापून त्यांच्या पतींना ती स्तन खायला लावली.” एवढा तो क्रूर आणि विचित्र, विक्षिप्त राजकुमार म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.
४. पाॅल पाॅट

पाॅल पाॅट हा एक कंबोडियन क्रांतिकारी गटाचा नेता होता. या गटाने कंबोडिया मध्ये प्रचंड उत्पाद घातला होता. त्यांच म्हणणं होतं की कंबोडिया मधील नागरी व्यवस्था उलथून टाकल्याशिवाय नवीन काही निर्माण होऊ शकणार नाही.
तो इतिहासातील एकमेव असा हुकुमशाह आहे ज्याने स्वतःच्याच देशातील नागरिकांना मारण्याचा हुकुम सोडला आणि त्याच्या हुकुमामुळे कंबोडिया मध्ये भयंकर प्रमाणात नरसंहार करण्यात आला.

१९७६ ते १९७९ या काळात तो कंबोडियाचा पंतप्रधान म्हणून कार्यभार पहात होता. या काळातील त्यांच्या पॉलिसीजमुळे कंबोडियामधील २५% लोकसंख्या कमी झाली. त्याला त्याने मारलेल्या लोकांच्या कवट्या गोळा करायला प्रचंड आवडत असे. त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला.
५. हेनरीच हिमलर

ज्यु लोकांना सरसकट मारायलाच हवे, ते जगण्यायोग्य नाहीत असा विचार पेलणारा हाच तो क्रूर माणूस आहे. याच्याच आदेशानंतर जवळपास सहा लाख जू तर, ३ लाख रशियन नागरिकांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याच्यावरती विचारांचा प्रचंड पगडा होता.
त्यामुळे नाझींच्या दृष्टीने जी लोक जगण्याचा अयोग्य आहेत ती लोक हिमलरच्या दृष्टीनेदेखील जगण्यास अयोग्य होती.
त्याच्याबद्दल अभ्यास करताना एक कथा अशी देखील सांगितली जाते की तो ज्यु लोकांचा एवढा तिरस्कार करत असे की त्याने त्यांच्या हाडांपासून घरात मध्ये फर्निचर तयार करून ठेवलेले होते. याने दे्खील नंतर आत्महत्या केली.
६. सद्दाम हुसेन

इराकचा जगप्रसिद्ध तानाशाह ज्याने अमेरिकेला देखील एकेकाळी जेरीस आणले होते. सद्दाम हुसेन याने १९७९ पासून ते २००३ पर्यंत इराकमध्ये राज्य केले. त्याच्या कार्यकाळात त्याने सामान्य नागरिकांवरती अगणित हल्ले केले. त्याच्या या कार्यशैलीमुळे दोन लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला.
त्याने विचित्र पद्धतींनी लोकांचा बळी घेण्याचा आदेश दिला होता. त्याच्या आदेशावरून अनेक लोकांचे डोळे काढून घेण्यात आले, त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, काहींना विजेचे झटके देऊन मारण्यात आले, तर काहीं वरती केमिकल अटॅक देखील करण्यात आले.
त्याने यातील अनेक लोकांचे तडफडताना व्हिडिओ देखील तयार करून घेतले होते जेणेकरून तो ते व्हिडिओ नंतर देखील पाहू शकेल. सद्दाम ला २००६ मध्ये अमानवीय कृत्य केल्याबद्दल फासावर लटकवण्यात आले.

७. ईदी आमीन

हा व्यक्ती युगांडाच्या सैन्याचा प्रमुख म्हणून कार्यभार पाहत होता. जेव्हा पंतप्रधान बोटे सिंगापूर येथे एक आंतरराष्ट्रीय मीटिंग साठी गेले होते तेव्हा इदी अमीन याने युगांडा वरती स्वतःचे राज्य प्रस्थापित केले. परंतु काही आठवड्यानंतर त्याने स्वतःला युगांडा चा नवीन पंतप्रधान म्हणून घोषित केले.
कार्यकाळात त्याला युगांडा चा मांस विक्रेता म्हणून देखील लोक ओळखू लागले. त्याने लोकांना मगरीचे मांस खाऊ घालून घालून मारले होते.
त्याने १९७१ ते १९७९ च्या काळात जवळपास ५०००० लोकांचा नरबळी दिला. तो नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडला.
८. ईवान द टेरीबल

हा रशियाचा पहिला हुकूमशहा होता. तो जेव्हा लहान होतं तेव्हा उंच इमारतीवरून तो जनावरांना फेकून देत असे तो त्याच्या आवडीचा खेळ होता. तो प्रचंड बुद्धिमान जरी असला तरी तो त्याच्या मित्रांवरती नेहमीच संशय घेत असे. तो मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे देखील इतिहासात लिहिलेले आहे.
त्याने एकदा स्वतःच्या वारसदाराला देखील गादीसाठी मारल्याचे सांगितले जाते. त्याला लोकांना भोसकून मारण्यात प्रचंड आनंद मिळत असे. तो एवढा विक्षिप्त होता की त्याला लोकांना जाळण्यात, तळण्यात, अंध करण्यात, प्रचंड आनंद प्राप्त होत असे.
तो मानसिक दृष्ट्या एवढा आजारी होता की कधीकधी मित्रांमध्ये देखील त्याला शत्रू दिसत असत. त्याच्या जाचामुळे ६० हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. ईवान त्याच्या मित्रासोबत बुद्धिबळ खेळत असताना त्याचा मृत्यू झाला.
९. नेरो

नेरो ने त्याच्या कालखंडामध्ये रोमन साम्राज्याला जेरीस आणलं होतं. त्याने पूर्ण शहरं जाळून टाकली. हजारो लोकांचं जीवन संपवलं. त्याने फक्त बाहेरच्या लोकांना मारलं असं नाही तर त्याने त्याच्या परिवारातील प्रत्येक सदस्यादेखील मारून टाकलं.
त्याने सामान्य नागरिकांना अत्यंत क्रूर वागणूक दिली. तो लोकांना ठेचून जाळून मारत असे. असं म्हटलं जातं की, त्याने रोमन साम्राज्याला जाळण्यासाठी एक विशाल आग लावली होती पण त्याचा संशय ख्रिश्चन वर घेण्यात आला. नेरोने आत्महत्या केली होती.
१०. माओ

जगप्रसिद्ध हुकुमशहा माओने चीन वरती १९४३ पासून १९७६ पर्यंत राज्य केलं. माओला चीनला सुपर पॉवर बनवायच होतं परंतु त्याची पद्धत मात्र राक्षसी होती.
त्याच्या या पद्धतीमुळे चीनमध्ये इतिहासात कधीही घडले नसेल असा प्रचंड नरसंहार करण्यात आला.
तरीही चीनला प्रगतीपथावर नेणाऱ्या नेत्यांमध्ये आजही त्याच नाव आहे. त्याने त्याच्या कार्यकाळा मध्ये ४० ते ७० लाख लोकांना मृत्युमुखी पाडले. तो त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत असे त्याने कामगारांच्या प्रती कधीही दयामाया दाखवले नाही.
कामगार भुकेने तडफडत असतानाही तो त्यांच्याकडून काम करून घेत असे. माओ स्वतः मात्र आजारी असतानाच मृत्युमुखी पडला.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
nice