' जगातील सर्वात थंड असलेल्या “या” खंडाखाली हिऱ्यांचा खजिना दडलाय? जाणून घ्या… – InMarathi

जगातील सर्वात थंड असलेल्या “या” खंडाखाली हिऱ्यांचा खजिना दडलाय? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पृथ्वीवरील सात खंडांपैकी सर्वात जास्त गूढ रहस्यांनी भरलेला एक खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड होय. हा खंड सर्वात दक्षिण दिशेला वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सुद्धा याच खंडावर आहे. दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड पूर्णत: वेढला गेला आहे.

अंटार्क्टिका खंड इतर सर्व खंडांपेक्षा सर्वात अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वाहत असणारा आणि सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. या खंडाचा तब्बल ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे. या खंडावर मानवी अस्तित्व नगण्यच!

असा हा अंटार्क्टिका खंड आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे संशोधकांना नेहमीच खुणावत आला आहे. या खंडावरील प्राणी, वनस्पती, मासे, पर्यावरण, दडलेली खनिजे आदींचा मोठय़ा प्रमाणावर अभ्यास सुरू आहे.

अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या डोंगराखाली चक्क हिऱ्यांचा मोठा खजिना सापडल्याचा भक्कम पुरावा शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे.

 

antarctica-marathipizza

अंटार्क्टिकाचा पूर्व भाग हा कायम बर्फाच्छादित असतो. याच भागात संशोधन करताना शास्त्रज्ञांना ‘किंबरलाइट’ हा दगड सापडला. हा दगड सापडणे याचाच अर्थ त्या भागात हिऱ्यांचा मोठा साठा सापडल्याची ही खूण आहे.

आफ्रिका, सैबेरिया आणि ऑस्ट्रेलियातही ‘किंबरलाइट’ हा दगड सापडणे म्हणजे हिऱ्यांच्या खाणी असणे असा होतो. मात्र, अंटार्क्टिका खंडातून व्यावसायिक खजिन उत्पादनास बंदी आहे.

 

antarctica-marathipizza01

‘किंबरलाइट’ हा दगड सर्वसाधारणपणे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतो. मात्र, व्यावसायिक हिरे उत्पादनात हा दगड अत्यंत उपयुक्त असतो. अंटार्क्टिकाच्या उत्तर भागातील प्रिन्स चार्ल्स डोंगर रांगातील मेरेडिथ शिखराच्या परिसराच्या उतारावर शास्त्रज्ञांना ‘किंबरलाइट’ दगड सापडले.

याचाच अर्थ या भागात हिऱ्यांचा साठा मोठय़ा प्रमाणावर दडलेला आहे. ‘किंबरलाइट’ हा दगड आतापर्यंत अंटार्क्टिका सोडून जगभरातील अन्य सर्व खंडात सापडला होता. या भागातील ‘किंबरलाइट’ दगडांचा साठा जगातील सर्वात जुना असावा असे शास्त्रज्ञांना वाटते.

antarctica-marathipizza02

जर अंटार्क्टिकामध्ये खरोखर हिरे सापडायला लागले तर ती या शतकातील मनुष्याच्या सर्वात मोठ्या कामगिरी पैकी ही एक ठरू शकते. फक्त एकच भीती आहे की, नागरीकरणाच्या स्पर्शापासून दूर असलेला हा प्रदेश केवळ हिऱ्यांपायी मातीमोल होऊ नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?