' पाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज! वाचा हा थरार

पाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज! वाचा हा थरार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अशा अनेक घटना असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतात.

जगभरात यापुर्वीही अनेक घटना घडल्या आहेत, ज्या सिद्ध होवूनही त्यांच्याबद्दलचं आकर्षण, काहीसं आश्चर्य आजही कायम आहे.

अशा अनाकलनीय घटनांचा अगदी विज्ञानानेही शोध घेतला, मात्र त्याबद्दलचं कुतुहल काही कमी होत नाही.

आजवर लोकांचे चमत्कारिकरित्या प्राण वाचल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या आहेत.

अंगावर काटा आणणा-या अपघातात अनेकांचे प्राण जातात, मात्र एखादी चिमुकली जीवंत राहते.

 

trackking inmarathi

 

हजारो फुट दरीत कोसळूनही गिर्यारोहक सुखरुप असतो, या आणि यांसारख्या अनेक घटना यांचीच उदाहरणं आहेत.

अश्या घटना पाहिल्या की देवाचे अस्तित्व नाकारता येत नाही.

कारण अश्या चमत्कारिकरित्या वाचलेल्या व्यक्ती इतक्या बिकट परिस्थितीमध्ये असतात की तेथून स्वत:ची सुटका होइल यावर त्यांचा देखील विश्वास नसतो.

जेव्हा या व्यक्ती त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडतात आणि बाहेर येऊन सांगतात की तो काळ कसा सोसला तेव्हा आपल्या लोकांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसतं नाही.

आता आम्ही तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही देखील म्हणालं, “देव तारी त्याला कोण मारी”

 

harrison-marathipizza

स्रोत

ही कथा आहे, महासागरात बुडूनही जीवंत राहिलेल्या व्यक्तीची.

विश्वास बसत नाहीये?

मग ही कथा तुम्ही वाचलीच पाहिजे.

 

atlantic inmarathi

 

विशाल अशा अटलांटिक महासागरातली ही घटना, अथांग अशा महासागरात बोट बुडाल्याने एकच हाहाकार उडाला.

सागराची खोली लक्षात घेता बोटीतील माणसं जीवंत राहण्याचा तर प्रश्नच नव्हता.

अटलांटिक महासागरात बुडालेल्या आणि सुमारे १०० फूट खोलीवर तळाशी विसावलेल्या बोटीतील मृतदेह काढण्याचे काम सुरू होतं.

पाणबुड्यांनी त्या बोटीतून चार मृतदेह आधीच बाहेर काढले होते. या सर्व कामावर पाण्याखाली टीव्ही कॅमे-याद्वारे देखरेख ठेवली जात होती.

अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक हात दिसू लागला. तो हात आणखी एका मृतदेहाचा असावा, असे सर्वानाच वाटलं. त्यामुळे पाणबुडे त्या हाताच्या जवळ सरकले.

ज्या पाणबुड्याने तो हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या हातानेच त्या पाणबुड्याला पकडले आणि त्या पाणबुड्यासहित सर्वाच्याच अंगावर भीतीने शहारे आले.

तो कोणताही भुताटकीचा प्रकार नव्हता आणि तो हात मृतदेहाचा नव्हता.

तर जी बोट बुडाली होती त्या बोटीवर काम करणारा नायजेरियन स्वयंपाकी हॅरिसन ओडजेग्बा ओकिने याचा होता.

पाण्याखाली १०० फुटांवर असलेल्या त्या बोटीच्या आत हा स्वयंपाकी तीन दिवस जिवंत राहिला होता.

सुरवातीला या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कुणीही तयार नव्हतं.

बोटीच्या आत एका ठिकाणी हवेची पोकळी तयार झाली होती. त्या पोकळीत शिल्लक असलेल्या ऑक्सिजनवर हॅरिसन तीन दिवस तग धरू शकला.

ही घटना २०१४ मध्ये घडली होती.

 

harrison-marathipizza01

स्रोत

पाण्याखाली असलेल्या या बोटीत त्याचे तीन दिवसांचे वास्तव्यदेखील थरारक होतं.

ज्या वेळी ही बोट बुडाली त्या वेळी हॅरिसनच्या अंगावर केवळ एक हाफ पँट होती.

बोट बुडाल्यानंतर तो जीवंत राहिला खरा, मात्र त्यानंतरचा पुढचा प्रवास जास्त कठीण होता.

अटलांटिक महासागरात पाण्याखाली असताना तापमान गोठणबिंदूच्या जवळ गेल्यावर त्या कडाक्याच्या थंडीत तो देवाचा केवळ धावा करीत राहिला.

त्या तापमानात, पाण्याखाली जीवंत राहण्याची शक्यता तशी कमीच होती, मात्र तरिही त्याची जिद्द आणि नशिब यांनी त्याला साथ दिली.

 

harrison-marathipizza03

स्रोत

 

पाण्याखाली ७२ तास राहिल्यावर जिवंत सुटका होणे म्हणजे खरोखरच दैवी चमत्कार आहे, असं खुद्द हॅरिसन मानतो.

हॅरिसनचा हात जेव्हा त्या पाणबुडयांनी पाहिला आणि त्या हाताने त्या पाणबुड्याला पकडले तेव्हा सर्वच घाबरून गेले होते.

मात्र, पाण्याखाली कोणीही जिवंत असण्याची शक्यता नसताना एक व्यक्ती जिवंत आहे हे पाहिल्यावर त्या भीतीचे रूपांतर आनंदात झाले. या बोटीवर एकूण ११ जण होते व त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.

 

harrison-marathipizza02

स्रोत

दैव बलवत्तर असेल तर माणूस कोणत्याही संकटातून सहीसलामत सुरु शकतो हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?