' गूढ उलगडलंय, एवढ्या मोट्ठ्या आकाराचे पिरॅमिडच्या कसे काय बांधता आले? वाचा! – InMarathi

गूढ उलगडलंय, एवढ्या मोट्ठ्या आकाराचे पिरॅमिडच्या कसे काय बांधता आले? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण अशा कितीतरी वास्तू, जागा पाहिलेल्या असतात किंवा त्यांच्याविषयी ऐकले असते, की त्या वास्तूंमध्ये काही ना काही गुपिते दडलेली आहेत. जसे की गुप्त दरवाजे, खोल्या, गुहा वगैरे!

गावाकडे देखील काही जुन्या वाड्यांमध्ये अशा गुप्त खोल्या, मार्ग किंवा सुरंग असायचे, जे सहसा कोणाला माहित नसतात. मोजक्याच माणसांना हे गुपित ठाऊक असे.

भारतात तर अशा अनेक रहस्यमयी वास्तु आहेतच, पण त्यासोबत जगभरात देखील अशा काही गूढ वास्तूंनी संशोधकांना वेड लावलंय. 

गूढ गोष्टींबाबत माणसाला कायमच आकर्षण वाटत आलं आहे आणि त्यातूनच त्याने मानवी उत्क्रांतीचे अनेक सिद्धांत मांडले.

इतिहासात बांधल्या गेलेल्या स्थापत्याचा ऊहापोह करून त्याचा उपयोग वर्तमानात करून घेण्याचा काम संशोधक करत असतात. त्यामुळे जगातील विविध आश्चर्यकारक गोष्टींवर संशोधक काम करत आहेत.

यातीलच एक म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. इजिप्तमधील पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्य असलेल्या वास्तूंपैकी एक वास्तू आहे. या पिरॅमिडमध्ये सुद्धा गुप्त खोली आहे, जिला खूप वर्षांच्या मेहनतीनंतर पुरातत्व विभागाने शोधले होते.

 

pyramid-inmarathi

 

इजिप्तचे पिरॅमिड सर्व जगात प्रसिद्ध आहेत. जीवनात एकदा तरी इजिप्तला जाऊन जगातील हे महान आश्चर्य उघड्या डोळ्यांनी पाहावे अशी प्रत्येक भटक्याची इच्छा असते.

हे पिरॅमिड म्हणजे आजही एक कोडंच आहेत. दगडांवर दगड रचून कश्याप्रकारे ते बांधले हे अजूनही शास्त्रज्ञांना किंवा जाणकारांना ठोसपणे सांगता येत नाहीये.

अगदी प्राचीन काळी कुठे होती आधुनिकता? कुठे होती यंत्रे? मनुष्यबळही इतके नव्हते. मग या लोकांनी पिरॅमिड कशाच्या माध्यमातून बांधले?

हे तुम्हाला-आम्हाला पडणारे प्रश्न अनेक शोधकर्त्यांना देखील पडत असतात आणि मग सुरु होतो अभ्यास अश्या गूढ गोष्टींचा!

पिरॅमिड बाबत याच कुतुहलाने एक संशोधन सुरु केले साउथ वेल्समधील सिंटेक इंटरनॅशनलमधील पीटर जेम्स या अभियंत्याने! आणि त्याने आजवर कधीही न मांडला गेलेला एक आगळावेगळा सिद्धांत मांडून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

या नव्या सिद्धांतानुसार,

पिरॅमिडचे बांधकाम करताना सर्वप्रथम आतल्या बाजूने मोठा ढिगारा तयार करून नंतर त्याच्या बाहेरून विटा जोडल्या असाव्यात.

पिरॅमिडच्या बांधकामाबाबतच्या प्रचलित सिद्धांतानुसार, महाकाय दगडी ठोकळे अतिशय लांबलचक घसरगुंडय़ांसारखा उतार वापरून एकमेकांवर ठेवून हे पिरॅमिड बांधण्यात आले. मात्र, जेम्स यांच्या दाव्यानुसार बांधकामाचा हा प्रकार शक्य नाही.

 

pyramids-marathipizza01

 

अशा प्रकारच्या पद्धतीने बांधकाम करण्यासाठी हे ठोकळे इतक्या उंचावर घेऊन जाण्यासाठी योग्य कोन तयार करताना सुमारे पाव मैल लांबीचा उतार लागला असता.

त्याचप्रकारे सध्याच्या सिद्धांतानुसार, सुमारे २० लाख दगडी ठोकळे एकावर एक रचण्यासाठी त्या काळातील इजिप्शिअन लोकांना दर तीन मिनिटाने एक या गतीने या उतारावर ठेवावे लागले असते, असे जेम्स यांचे म्हणणे आहे.

जर तसे झाले असते, तर त्या उताराच्या खुणा त्यावर दिसून आल्या असत्या. मात्र, तशा कोणत्याही खुणा त्यावर दिसून येत नाहीत.

 

pyramids-marathipizza02

 

पीटर जेम्स गेल्या वीस वर्षांपासून इजिप्तच्या पिरॅमिडचा अभ्यास करत आहेत. त्यांनी ४६०० वर्षे जुन्या स्टेप पिरॅमिड आणि रेड पिरॅमिडमधील दफन कक्षांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 

pyramids-marathipizza03

या स्टेप पिरॅमिडच्या आत जेम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक टन वजनाचे लहान लहान दगड हजारो वर्षे जुन्या पाम वृक्षाच्या केवळ एका फांदीला लटकत ठेवल्याचे आढळले.

त्यावरूनच हे पिरॅमिड आतल्या बाजूने लहान, सुटसुटीत ठोकळ्यांनी बांधून त्यावर मोठेठोकळे बसवले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

हे बांधकाम ‘बाहेरून आत’ असे न होता ‘आतून बाहेर’ असे झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

pyramids-marathipizza04

आतापर्यंत अनेक संशोधकांनी पिरॅमिडच्या रचनेबाबत विविध सिद्धांत मांडले आहेत, जेम्स यांचा सिद्धांत तर्कशुद्ध होता. या सिद्धांतामुळे पिरॅमिडची रचना नेमकी कशी झाली? याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे संशोधनाचे नवे दालन खुले झाले. 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?