जॉन्टी रोड्सच्या आवडत्या सात फिल्डर्सपैकी, दोन आहेत भारतीय खेळाडू…..कोण आहेत ते? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट म्हणजे आपल्या देशाचा श्वास आणि आपल्या इथे फक्त भारतीयच नाही तर इतर देशातल्या क्रिकेट खेळाडूंना तितकंच महत्व दिल जातं म्हणूनच या खेळाच आपल्या देशात तरी अस्तित्व कधीच मिटणार नाही!

 

cricket-ball-inmarathi02
hindustantimes.com

 

आपल्या टीम मध्ये बॅटिंग या गोष्टीवर जास्त लक्षकेंद्रित केलं जातं हे कटू असलं तरी सत्य आहे आणि भारतीय क्रिकेट टीम फिल्डिंग मध्ये खूप कमी पडते हे आपल्याला बऱ्याच सामन्यांमधून दिसून आलंय.

साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडीज कडे जसे तगडे बोलर्स होते, तसेच सर्वात उत्तम फिल्डिंग करणारी कोणती टीम असेल तर ती ऑस्ट्रेलियाची टीम असं गृहीतच धरलं गेलं आहे!

 

south africa aus players inmarathi
the nationals

 

भले आत्ताच्या ऑस्ट्रेलियन टीम कडे तशी फिल्डिंग करणारे प्लेयर्स आता नाहीत पण एक काळ असा होता की फिल्डिंग करावी तर ती ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी जीव ओतून!

पण साऊथ आफ्रिका या टीम मध्ये असा एक खेळाडू होता जो सगळ्यांवर भारी होता, ज्याची फिल्डिंग बघून तर भल्या भल्यांना घाम फुटायचा आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून जॉन्टी रोड्स, आज आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत!

 

rhodes inmarathi
the statesman

 

जॉन्टी रोड्स हा या खेळातील सर्वात बेस्ट फिल्डर्सपैकी एक मानला जातो, त्याच्या धमाकेदार फिल्डिंग ने एक वेगळाच बेंचमार्क सेट करून ठेवला!

१९९२ च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने इंझमाम-उल-हक ला केलेला रन आऊट आजही कित्येक क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यासमोर आहे, तुफान फिल्डिंग काय असत हे या रन आऊट मधून दिसून येईल, आजही ती क्लिप युट्युब वर उपलब्ध आहे, अवश्य जाऊन बघाच!

 

inzamam run out
news18.com

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर जोंटी हा बऱ्याच क्रिकेट टिम्स ना फिल्डिंग कोचिंग द्यायचं काम करतोय, आयपीएल सारख्या फेमस लीग मध्ये सुद्धा त्याने ९ सिझन्स मुंबई इंडीयन्स या नीता अंबानी यांच्या टीम ला कोचिंग दिले!

सगळ्यात उत्तम फिल्डर असल्याने नुकतंच जॉन्टीला ट्विटर वर एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे असा!

 

johnty hrodes tweet
twitter

 

तुझे फेव्हरेट फिल्डर्स कोण कोण आहेत? आणि या उत्तरावर जॉन्टी ने चक्क ७ खेळाडूंची नावं दिली त्यात २ नावं भारतीय फिल्डर्सची नावं सुद्धा आहेत! तर चला जाणून घेऊया ते प्लेयर्स नक्की आहेत तरी कोण??

1. Herschelle Gibbs

 

gibbs fielding
the maitland mercury

 

Herschelle Gibbs हा एक साऊथ आफ्रिकन प्लेयरच असून, १९९६ साली त्याने क्रिकेट मध्ये पदार्पण केले आणि १४ वर्षात सगळ्या फॉरमॅट्स मध्ये त्याने त्याची कामगिरी बजावली!

तसेच ६ बॉल मध्ये ६ षटकार मारणार हा पहिला बॅट्समन ठरला होता,

गिब्स नेहमीच ओपनिंग बॅट्समन राहिला पण त्याची फिल्डिंग सुद्धा तितकीच प्रभावी आणि अग्रेसिव्ह होती, फिल्डिंग साठी त्याने विशेष मेहनत घेतली होती!

 

2. Ricky Ponting

 

ricky ponting
the examiner

 

या प्लेयर ला कोण नाही ओळखत? २००४ ते २०११ हा काळ ऑस्ट्रेलिया टीम साठी खूप महत्वाचा होता आणि या वर्षांत ती टीम ही वर्ल्ड चॅम्पियन होती, आणि त्या काळात त्या टीम चा कॅप्टन होता तो म्हणजे रिकी पॉंटिंग!

त्याची कॅप्टन्सी ही इतकी अग्रेसिव्ह होती की प्रत्येक खेळाडू त्याच्यासाठी प्राण पणाला लावून खेळायचा आणि त्याचेरीझल्टस सुद्धा त्यांना मिळायचे!

बॅट्समन असून सुद्धा पॉंटिंग ची फिल्डिंग लाजवाब होती, उडी मारून घेतलेले झेल तर आजही त्याची सिग्नेचर स्टाईल आहे, २०१२ साली त्याने खेळातून निवृत्ती घेतली!

 

3. AB de Villiers

 

ab de
wirally

 

अब्राहम बेंजामिन दि विलीयर्स म्हणजे एबी हा जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन पैकी एक मानला जातो,साऊथ आफ्रिकन टीम बरोबरच आयपीएल सारख्या फॉरमॅट मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या टीम कडून सुद्धा त्याने धुवादार बॅटिंग करत सगळ्यांची मन जिंकली!

बॅटिंग बरोबरच त्याची फिल्डिंग सुद्धा चर्चेचा विषय ठरली आहे, स्पायडरमॅन सारखे एक्रोबेटीक स्टाईल मध्ये त्याचे कॅच घेणं हे आपल्याला ठाऊक आहेच!

 

4. सुरेश रैना

 

suresh raina inmarathi
pinterest

 

याला तर सगळेच भारतीय ओळखतात, धोनी नंतर कुणाचं कौतुक करत असतील तर ते सुरेश रैनाचच! अग्रेसिव्ह लेफ्ट हॅण्ड बॅट्समन आणि ऑफ स्पिन बॉलिंग सोबत रैनाची फिल्डिंग सुद्धा तगडी आहे!

चौकार अडवण्यात आणि झेल घेण्यात तर त्याला टक्कर देणारं कुणीच नाही, आयपीएल च्या चेन्नई सुपर किंग्स या टीम मध्ये सुद्धा त्याने अशीच धमाकेदार फिल्डिंग करून कित्येक सामने जिकायला मदत केली!

शिवाय आयपीएल मध्ये ५००० रन्स बनवण्याचा रेकॉर्ड रैनाच्याच नावावर आहे!

 

5. Martin guptill

 

guptill inmarathi
scroll.in

 

या न्यूझीलंड च्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय तसेच डोमेस्टिक क्रिकेट दोन्ही कडे खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे!

शिवाय बॅटिंग आणि फिल्डिंग या दोन्ही मध्ये तो न्यूझीलंड या टीम मध्ये सर्वोत्तम आहे! २००९ साली त्याने या खेळात पदार्पण केलं!

 

6. Kieron Pollard

 

Pollard fielding
flickr

 

वेस्ट इंडिज टीम चा कॅप्टन, मिडीयम पेस बॉलर आणि Destructive बॅट्समन अशी पोलार्डची ओळख आहे, त्याची बॅटिंग म्हणजे तुफान आहे!

त्याने मारलेले षटकार तर आपण कुणीच विसरू शकत नाही. शिवाय आयपीएल च्या मुंबई इंडीयन्स टीम मधली त्याची कामगिरी आणि त्याने केलेली फिल्डिंगच आजही सगळे कौतुकच करतात, त्याची मेहनत त्याच्या खेळात दिसून येते!

 

7. रवींद्र जडेजा

 

jadeja inmarathi
Youtube

 

रवींद्र जडेजा हे नाव प्रत्येक क्रिकेट फॅन्स ना ठाऊक असेलच, फार कमी वेळात त्याने जे काही मिळवलंय ते कौतुकास्पद आहे!

डोमेस्टिक क्रिकेट मध्ये ३ वेळा ट्रिपल सेंच्युरी बनवणारा हा आठवा खेळाडू आहे, आणि हा विक्रम करून तर जडेजा हा सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा अशा दिग्गजांच्या रांगेत जाऊन बसला!

आज त्याचं करीयर खूप सेफ आहे, बॅट्समन तर तो उत्तम आहेच पण त्याची फिल्डिंग सुद्धा खूप अप्रतिम आहे, शिवाय त्याच्या फिल्डिंग टेक्निक्स सुद्धा वेगळ्या असल्या तरी त्या रिझल्ट्स देतात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?