' लग्नानंतर नात्यातली गंमत हरविण्याची भीती भेडसावतेय? सुखी संसाराचा हा मंत्र तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल

लग्नानंतर नात्यातली गंमत हरविण्याची भीती भेडसावतेय? सुखी संसाराचा हा मंत्र तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यापैकी प्रत्येकाला लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी संसारात मन रमत नाही असे जाणवू लागते. खूप जणांसोबत असं घडत असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे.

काहीही कारण नसताना, लग्नाच्या काही वर्षांनंतर संसार निरस वाटू लागतो. तुमच्यासोबत देखील असं काही घडतंय का? तुम्हाला देखील लग्नातील गंमत हरवण्याची भीती भेडसावते आहे का?

सुखी संसाराचा मंत्र जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचाच….

लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी संसारात लक्ष लागत नाही. संसारातील ते सोनेरी दिवस कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटतं आणि मग आपण कुठेतरी तुलना करू लागतो. हे सर्व टाळण्यासाठी खाली दिलेले काही मुद्दे तुम्हाला नक्कीच मदत करतील.

 

१. तुमच्या पार्टनरला तुमच्या नात्यातील प्रेमाची आठवण करून द्या

 

happy marriage inmarathi
images dawn

 

लग्नाच्या अनेक वर्षानंतर तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी केलीत, ज्या गोष्टीची तुमच्या पार्टनरला थोडीदेखील अपेक्षा नाही. ती गोष्ट अगदी लहान जरी असली तरीही तुमच्या पार्टनरला तुमच्या मनातील प्रेम दाखवण्यासाठी पुरेशी असते.

उदाहरणार्थ, तुमची पत्नी ऑफिसमधून आल्यावर जर तुम्ही चहा करून तिला दिलात तर तिला आहे नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का बसेल आणि तिच्या लक्षात येईल की तुम्ही तिची काळजी करता.

तुमचं नातं चिरतरुण ठेवण्यासाठी एकमेकांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण या कृती मधूनच तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

 

२. अगदी लहान गोष्टींसाठी देखील तुमच्या पार्टनरचे आभार माना

 

marriage life inmarathi
masterfile

 

आपल्यापैकी प्रत्येकालाच लहानपणापासून आपण कुठले कुठले काम केले आहे हे ऐकवून दाखवण्याची सवयच असते आणि हीच सवय एकमेकांमधील विश्वास कमी करते.

नकारात्मक सवयी आणि गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा जर सकारात्मक गोष्टी लक्षात ठेवल्या तर नात्यामधील दुरावा कमी होतो. एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागते.

यासोबतच तुम्ही तुमच्या पार्टनरच्या प्रत्येक चांगल्या कृतीला तुमच्या धन्यवाद म्हणण्याची जोड दिलीत तर तुमच्या पार्टनरला देखील चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

 

३. प्रत्येक गोष्ट तुमच्या पार्टनर सोबत शेअर करा

 

Angry Indian couple having an argument
rackbrain

 

जर तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर एखादी गोष्ट लपवत असाल तर लक्षात घ्या यामुळे नात्यातील पारदर्शकपणा कमी होऊ शकतो. जसं तुम्ही एखादी गोष्ट लपवत आहात तसंच पार्टनर देखील एखादी गोष्ट लपवेल आणि यामुळेच एकमेकांबद्दल गैरसमज वाढातील.

प्रश्न कुठलाही असुदेत पैसे किंवा इतर कुठलीही गोष्ट तुम्ही मात्र तुमच्या पार्टनरला प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी. संसारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या पार्टनरला सांगताना कमीपणा वाटू शकतो.

पण जर ती गोष्ट तुम्ही ठाम सांगितलीत तर तुम्हाला त्या गोष्टीचे वाईट वाटणार नाही.

उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या पतीचे क्रेडिट कार्ड कामापेक्षा जास्त वापरले असेल आणि जर तुम्ही ही गोष्ट तुमच्या पतीपासून लपवणार असाल तर या गोष्टीचा तुम्हाला पुढे पश्चाताप करायला लागू शकतो.

किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी ट्रिपला जायचं आहे पण ट्रीपला जाण्यासाठी जर तुम्ही पत्नीला खोटं बोललात तर ही गोष्ट केव्हा तरी नक्कीच उघड होईल त्यामुळे पारदर्शकपणा जपण्यासाठी प्रत्येक गोष्ट तुमच्या पार्टनरला नक्की सांगा.

 

४. तुमच्या पोशाखाची काळजी घ्या

 

virat anushka 1 inmarathi
telgubullet

 

लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील आपल्या पोशाखाची व राहणीमानाची काळजी घेणे अत्यंत गरजेची बाब आहे. जर तुम्ही असा समज करून घेत असाल की आता व्यवस्थित पोषाख करण्याची एवढी आवश्यकता राहिली नाही तर मात्र तुम्ही चुकीचा विचार करत आहात कारण तुम्ही कसे वावरता हे इतरांसाठी खूप महत्त्वाचे असते.

महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर टापटीप राहिलात तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्यासाठी नेहमीच चांगले विचार येत राहतील.

विचार करा जेव्हा तुम्ही लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला भेटला असाल तेव्हा कुठल्याही पोशाखाचा विचार न करता, वाट्टेल ते कपडे घालून थोडीच भेटला असाल.

जर तेव्हाची आणि आजची व्यक्ती सारखीच असेल तर तुम्ही देखील तसेच असायला हवे आहात. या लहान लहान गोष्टींमुळेच तुमचे नाते चिरतरुण राहण्यास मदत होते.

 

५. तुमच्या मित्रांसोबत देखील चांगले संबंध ठेवा

 

rang de basanti inmarathi

 

अनेक मंडळी लग्न झाल्यानंतर काही वर्ष मित्रांना टाळू लागतात आणि जेव्हा संसार निरस होतं तेव्हा ते मित्रांशी सलगी करू पाहतात, तेव्हा असे न करता दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देऊन दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही वेळ काढायला हवा.

फक्त संसारामध्येच वेळ देणे ही बाब काही दिवसांनी तुम्हाला आतून पोखरुन काढते. त्यामुळे मित्रांसोबत बाहेर जाणे कधीच टाळू नका.

जेव्हा-केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवायला हवा यामुळे तुमचे मन फक्त संसारात न राहता इतरही गोष्टींमध्ये रमेल आणि त्यामुळे तुमचा संसार देखील चांगला होईल.

 

६. शब्दांचा जपून वापर करा

 

Couple in Hotel InMarathi
theshrinkonyourcouch.com

 

अनेक वेळा आपण बोलताना विचार न करता आपल्या पार्टनरशी बऱ्याच गोष्टी बोलून जातो. प्रत्येक वेळी तक्रारीचा ज्ञसूर न ठेवता आपण शांतपणे एखादी गोष्ट मांडली पाहिजे.

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पार्टनरला समजावत आहात तेव्हा, “तुझं हे नेहमीचच आहे” असं काहीतरी वेगळे वाक्य न बोलता मुद्द्याचं वाक्य बोललं पाहिजे.

जेणेकरून तुमच्या पार्टनरला देखील पुढच्या वेळी ती चूक सुधारण्यास मदत होईल. तुम्ही जर चूक वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला तर मग तुमच्यातील संवाद संपून वादास प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो आपल्या शब्दांवर लक्ष देणं गरजेचं आहे.

 

७. लहान गोष्टींमुळे मोठे वाद होऊ देऊ नका

 

Arguing-couple-inmarathi
sessualitafelice.it

 

जगामध्ये अनेक लोकांना खूप प्रचंड प्रॉब्लेम्स मधून वाट काढावी लागते, अशी परिस्थिती सध्यातरी आपल्यापैकी बऱ्याच जणांवर आलेली नाही. आपल्याकडे भांडणाची सुरुवातच कुठल्यातरी लहान कारणामुळे होण्याची जास्त शक्यता असते.

लहान गोष्टींना फार महत्त्व न देता आपल्या पार्टनरला समजून घेणं हे आपलं कर्तव्य असले पाहिजे, तरच तुमचं नातं भरपूर काळ टिकून राहील.

जर एखादी लहान गोष्ट तुमच्या पार्टनर कडून चुकून करायची राहून गेली तर ती गोष्ट पार्टनरला सांगावी जेणेकरून त्या लहान गोष्टीमुळे वाद होणार नाहीत.

 

८. शांत रहा

 

couple 1 inmarathi
time

 

काहीवेळा प्रश्नांना तोंड देण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायद्याचे असते. प्रत्येक वेळी बोलून दाखवल्याने तुमच्या बोलण्याला किंमत उरत नाही. लहान मोठ्या गोष्टी दुर्लक्ष करायला शिका आणि काही गोष्टी महत्त्वाच्या देखील असल्या तरी शांत बसल्यामुळे समोरचा व्यक्ती समजून घेईल‌. ‌‌‌‌

ज्यावेळी तुम्हाला काही चुकीचे वाटेल तेव्हा आपल्या पार्टनरवरती विश्वास ठेवून काही वेळाने ती गोष्ट पार्टनरला बोलून दाखवावी. प्र‌‌त्येक व्यक्ती ही सर्वगुणसंपन्न नसते, त्यामुळे या गोष्टीचा विचार करा की आपण आयुष्यभर सोबत राहणार आहोत.

जर काही चुका दुर्लक्ष करता येऊ शकत असतील तर त्या नक्की कराव्यात यामुळे तुम्हीदेखील तणावमुक्त रहाल.

 

९. विश्वास

 

couple inmarathi
loksatta

 

प्रत्येक नात्याची सुरुवात आणि शेवट हे फक्त एका कारणामुळे होते आणि ते कारण म्हणजे विश्वास. होय, तुम्ही तुमच्या पार्टनर वर विश्वास दाखविल्यामुळेच त्याच्याशी लग्न केलेले आहे ही गोष्ट ध्यानात घ्या.

प्रत्येकाचं वैवाहिक आयुष्य हे काही चांगलं असेलच असे नाही परंतु आपलं नातं नेहमी चांगलं राहावं यासाठी एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे.

सुखी वैवाहिक आयुष्य व्यतीत करण्यासाठी वर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?