' “जर्मन माणसे जगायला नालायक आहेत”- हिटलरचे शेवटचे उद्गार – InMarathi

“जर्मन माणसे जगायला नालायक आहेत”- हिटलरचे शेवटचे उद्गार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिटलर म्हटलं की आपल्यासमोर जगातील त्या क्रूरकर्मा हुकुमशहाची प्रतिकृती दिसते ज्याने हजारो लोकांना केवळ आपल्या महत्त्वकांक्षेपायी यमसदनी पाठविले. एखादा माणूस इतका क्रूर आणि पाषाणहृदयी कसा असु शकतो यावर विश्वास बसत नाही. पण सत्ता माणसाला झुकायला लावते. त्याच्या हातून अमानवी राक्षसी कृत्य घडवून आणते. अश्या या हिटलरची जिवाभावाची माणसं फार कमी होती बाकी इतर सर्व जणांना त्याच्या क्रूरपणाचा द्वेष होता. पण त्याच्यासमोर बोलायची कोणाची हिंमत व्हायची नाही.

(हे देखील वाचा: ‘त्याने’ हिटलरला सॅल्युट करण्यास नकार दिला होता!)

ज्याप्रमाणे एखाद्या असुराच्या पापांचे सर्व घडे भारतात आणि तो नरकात लोटला जाऊ लागतो त्याप्रमाणे हिटलरचा देखील अंत हळूहळू जवळ येऊ लागला आणि सत्ता हातून जाऊ लागली. हिटलर अधिकच व्याकूळ होऊ लागला आणि त्याने आपल्या अंतिम क्षणी पराभवाचे सर्व खापर जन्मभर त्याच्यासोबत उभ्या राहणाऱ्या जर्मन माणसांवर फोडले. जर्मनीच्या पराभवाने खचून गेलेल्या हिटलरने नाझी जनरलसमोर आकांडतांडव करत स्वत:ची हार दुसऱ्यांच्या माथी मारली.

hitler-marathipizza00

स्रोत

इंग्लंडच्या ‘द नॅशनल आर्काइव्ह’ या संस्थेने ‘एमआय-५’मधील गुप्तचर गाय लिडेल यांच्या प्रसिद्ध केलेल्या दैनंदिनीमध्ये ही गोष्ट उघड झाली आहे.

दारुण पराभवाने खचलेल्या हिटलरने गृहमंत्री हायन्रिच हिमलर आणि जमलेल्या इतर वरिष्ठ अधिका-यांसमोर आपली ही भावना बोलून दाखवली होती. या दैनंदिनीत संयुक्त गुप्तचर समितीने हिटलरच्या शेवटच्या क्षणांची सविस्तर माहिती नोंदवलेले पानही आहे.

(हे देखील वाचा: ज्यूंचा नरसंहार (Holocaust) : किती खरा – किती खोटा !?)

हिटलर साडेआठ वाजता बंकरमध्ये आला. तो अत्यंत खचलेला होता. त्याच्याबरोबर काही वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. हिटलरने बर्लिन सोडून जावे, अशी विनंती हिमलरने केली होती आणि अचानक हिटलरने आपल्या शैलीत मंत्रमुग्ध करणारे भाषण सुरू केले. मात्र, ते अत्यंत निराशाजनक होते.

hitler-marathipizza01

स्रोत

जर्मन माणसे शौर्याने लढली नाहीत. त्यामुळेच जर्मनीचा दारुण पराभव झाला. जर्मनी पराभवाच्या खाईत लोटली गेली. मला गरज असताना माझ्या जवळच्या प्रत्येक माणसाने माझा विश्वासघात केला आहे. जर्मन माणसे जगायला नालायक आहेत. माझा प्रत्येकानेच घात केला आहे. कोणीही मला सत्य सांगितले नाही. जर्मन शौर्याने लढले नाहीत आणि म्हणूनच त्यांचा पराभव झाला. हा पराभव माझा एकट्याचा नसून प्रत्येक जर्मन माणसाचा आहे.

अशी नोंद या पानावर आहे.

दारुण पराभव झाल्यामुळे मला आता मृत्यूच सर्व गोष्टींतून मुक्त करेल…

– असे हिटलरने तत्कालीन लष्करमंत्री अल्बर्ट स्पीअर यांना म्हटले होते.

भाषणानंतर हिटलर अधिकच निराश झाला होता. इतका की, त्याच्या हातापायाचे स्नायू नैराश्यामुळे आखडले होते. त्याला धड चालता येत नव्हते. निराशेपासून मुक्त होण्यासाठीच बर्लिनमधील एका बंकरमध्ये १९४५ मध्ये त्याने गोळ्या झाडून आत्महत्या केली.

hitler-marathipizza03

स्रोत

(हे देखील वाचा: एका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला !)

हिटलर हुशार होता, महत्त्वकांक्षी होता पण त्याने वर्चस्व आणि सत्ता मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडली. पुढे त्याचीच शिक्षा त्याला भोगावी लागली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?