' भारतातील या हॉंटेड जागा तुमचा भयपटाहून अधिक थरकाप उडवतील! – InMarathi

भारतातील या हॉंटेड जागा तुमचा भयपटाहून अधिक थरकाप उडवतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘ओ स्त्री कल आना.!’ राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटातल बुलेटिन डायलॉग. भूत-भुताटकीवर आधारित हा चित्रपट बहुतेक जणांनी पाहिला असेल.

तसं पाहिलं गेलं तर भूत-भुताटकी या काल्पनिक गोष्टी. तरी गावी गेल्यावर असे एक तरी आजोबा सापडतील ज्यांनी भुतासोबत कुस्ती खेळली असेल किंवा रात्री भुतासोबत बिडी शेअर केली असेल.

पण, भारतात आजही काही ठिकाणी अनैसर्गिक हालचाली जाणवल्याचे बहुतेक जणांनी अनुभवलं आहे. त्यांचं मत ग्राह्य धरलं तर तिथे भूत आहे किंवा आत्मा यांचा भास झाला आहे.

तर पाहूया, भारतातील अशी ठिकाणं जिथे भूत-भुताटकीचा लोकांना प्रत्यक्ष अनुभव आला आहे.

 

१. bhangarh किल्ला

 

bhangarh fort inmarathi
lakshmi sharath

 

राजस्थानच्या अलवर भागात वसलेला हा किल्ला. भूत-आत्मा हा विषय आहे आणि bhangarhचं नाव नाही असं होणार नाही.

असं म्हणतात की, इथे सूर्यास्त झाला की आत्मा जागे होतात. पुरातत्व विभागाने सुद्धा या किल्ल्यावर सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्ताच्या नंतर प्रवेश बंदी घातली आहे.

तर आख्यायिका अशी आहे की, तेव्हाच्या भानगड प्रदेशाची राजकुमारी रत्नावती हिच्यावर स्थानिक जादूगार/तांत्रिक सिंधू सेवडा/सिंघीया याचं प्रेम जडतं. काही तरी जादूटोणा करून राजकुमारीला वश करायचा त्याचा प्रयत्न फसतो आणि त्यातच त्याचा मृत्यू ओढवतो.

मरण्यापूर्वी तो शाप देतो,  “त्या प्रांताचा आणि राजकुमारीच्या परिवाराचा नायनाट होईल.” आणि झाले सुद्धा तसेच. युद्धात किल्ला अक्षरशः बेचिराख होऊन जातो आणि  राजपरिवाराची हत्या होते.

म्हणतात की, किल्ल्यातील त्या मृत आत्मा या सूर्यास्तानंतर जागे होऊन किल्ल्यात भटकत असतात. त्या आत्मा आपण पाहिले असं छातीठोकपणे सांगणारे बरेच भेटतील तिथे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

२. कुलधरा गाव, राजस्थान

 

kuldhara inmarathi

 

शापित गाव म्हणून फेमस आहे हे.  जैसलमेर पासून १४ किमी लांब असलेल्या या गावातसुद्धा सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर प्रवेश बंदी आहे.

२०० वर्षांपासून उजाड असलेल्या या गावात अचानक जवळपासच्या लोकांना इथे भूत-आत्मा असल्याचे जाणवू लागले. अन रात्री इथे जो गेला तो परत येतच नाही अशी समजूत आहे.

तसा या गावाचा इतिहास पण तसाच आहे.  १३ व्या शतकात राजपूत राजाच्या दिवाणाचा स्थानिक पालिवाल ब्राम्हणाच्या मुलीवर मन जडतं आणि तो लग्नासाठी मागणी घालतो. तेव्हा तर इंटरकास्ट मॅरेज करणं म्हणजे तर लोकांच्या डोक्यात सुद्धा यायचा नाही. अंमलबजावणी तर लांब.

तर प्रेमभंगाचा बदला म्हणून अव्वाच्या सव्वा टॅक्स त्या गावावर अप्लाय होतो.

आपल्याला तेवढा टॅक्स पे करणं जमणार नाही म्हणून गाववाले ते गाव सोडून शेजारच्या दुसऱ्या राज्यात सेटल व्हायचा प्लॅन करतात. कुलधरा सोबत जवळचे ८४ गाव रक्षाबंधनाच्या दिवशी रातोरात खाली होऊन जातात.

तेव्हा पासून हे गाव उजाड आहे. पण, या कथेचा आणि भुताचा काय संबंध आहे अजून क्लीअर नाही झालं आहे. ही कथा मात्र तिथे

दुसरं म्हणजे वास्तुशास्त्र. इतिहास पहिला तर हे गाव लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या काठावर वसलेलं होतं.  वास्तुशास्त्रानुसार, ज्या भागाच्या नैऋत्य आणि ईशान्येकडील भागात किंवा भागाखाली पाण्याचा संचय असेल तर तिथे हवेचा दाब हा यअनैसर्गिक असतो.

त्यामुळे अनैसर्गिक घटनांना तिथे जास्त वाव असतो.उदाहरणार्थ, अनैसर्गिक मृत्यू. त्यामुळे हे गाव रिकाम झालं असू शकतं.

आता यातलं नेमकं खरं काय ते कोणीच सांगू नाही शकत, पण स्थानिकांना विचारात घेतले तर इथे भूत आहेत असं हमखास ऐकायला मिळेल.

 

३. कुर्सीयांग, बंगाल

 

Kurseong inmarathi
weekendthrill

 

इंग्रजी मान्यतेनुसार कर्सीचा अर्थ होतो शाप.  यावरूनच या भागाला कर्सीयांग/कुर्सीयांग म्हणतात.

बोर्डिंग शाळेसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी बरेच आत्महत्या झालेले आहेत. फेरफटका मारताना इथे माणसांची हाडं मिळाल्याचे अनुभव अनेकांना आहेत.

डिसेंबर ते मार्च च्या सुट्टीच्या दरम्यान इथल्या व्हिक्टोरिया बॉईज स्कुल मध्ये कोणी चालत असल्याचा भास होतो. तर कुर्सीयांगच्या जंगलात डोकं नसलेलं धड फिरताना बऱ्याच जणांनी पाहिलं आहे.

४. दमस/ड्युमस बीच, गुजरात

 

beach inmarathi
nativeplanet

 

या किनाऱ्याच्या काळ्या वाळूमध्ये असंख्य रहस्य दडले असल्याचा दावा केला जातो. या बीचच्या जवळच एक दफनभूमी आणि स्मशानभूमी आहे. अंत्यसंस्कार विधी याठिकाणी केले जातात.

असं म्हणतात ज्याचा लवकर मृत्यू झाला अशा अतृप्त आत्मा इथे भटकत असतात. कोणी संध्याकाळी हुंदके देऊन रडण्याचे आवाज ऐकले आहेत तर कोणी नावाने हाक मारत असल्याचा भास बऱ्याच जणांना झाला आहे.

 

५.जतींगा, आसाम

 

Jatinga-Assam-India inmarathi
ourtripguide

 

आसामच्या दक्षिणेला वसलेलं हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने अतिशय नटलेलं आहे, पण जतींगा या निसर्ग सौंदर्याऐवजी भलत्याच गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या अमावस्येच्या रात्री इथे पक्षी सामूहिक आत्महत्या करतात आणि ही घटना दरवर्षी घडते.!

साधारण संध्याकाळी सात ते रात्री दहाच्या दरम्यान जिथे प्रकाश असेल तिथे पक्षांच्या थवेच्या थवे खाली जमिनीवर कोसळतात. हे का होतं याचं अजून कोणाला थांगपत्ता लागलेला नाही.

विख्यात पक्षीतज्ञ सलीम अली यांनी देखील या घटनेचा अभ्यास केला, पण ते देखील कोणत्या ठोस अशा निष्कर्षावर नाही जाऊ शकले.

 

६. लंबी देहर माईन्स, मसुरी

 

mussoorie inmarathi

 

उत्तराखंड म्हणजे देवभूमी.  त्यात मसुरी म्हणजे नैसर्गिक विविधतेने नटलेले ठिकाण, पण याच मसुरीमध्ये लंबी देहर ही चुन्याची शापित खाण आहे.

म्हणतात की, या खाणीच्या आजूबाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या आपोआप रस्ता सोडून आऊट ऑफ कंट्रोल होतात आणि अपघाताचे कारण बनतात. कधी कधी तर लोकांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज सुद्धा येतो.

तर आख्यायिका अशी आहे की, या चुन्याच्या खाणीत झालेल्या अपघातात एकाच वेळी ५०,००० कामगारांनी आपले प्राण गमावले आणि त्यांच्या आत्मा इथे भटकत असतात.

त्यांच्या ओरडण्याचा आवाज हा इथे होत असतो आणि तेच गाड्यांच्या अपघाताला कारणीभूत आहेत असा समज आहे.

 

७. अग्रेसेन की बावली, दिल्ली

 

agarsen ki baoli inmarathi
wiki

 

राजधानीत असलेले हे ठिकाण म्हणजे एक शिडीयुक्त विहीर आहे.

हे भीतीदायक यासाठी आहे की, इथल्या विहिरीमध्ये काळ पाणी होत जे इथे येणाऱ्या लोकांना भुलवायचं आणि आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं. पाण्याचा तळ एकदा गाठला की परत यायला पर्याय नाही.!

आता विहीर पूर्णपणे सुकून गेली आहे. तरी शिड्या उतरून जेव्हा विहिरीच्या तळाजवळ जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं आकाश दिसेनासा होतं आणि वटवाघूळ आणि पक्षांच्या कर्कश आवाजाने वातावरण गढूळ होऊन जातं.

इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना असा अनुभव आला की, इथे एखादी सावली त्यांचा पाठलाग करत आहे.

 

८. रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद

 

ramoji inmarathi
traveltriangle

 

आता तुम्ही म्हणाल इथे कसलं आलं भूत आणि प्रेत?  तर बऱ्याच जणांना माहीत नसेल की, रामोजी फिल्म सिटी एका युद्धभूमीवर उभं आहे. लाखो सैनिकांच्या कबरीवर सध्या ते थाटात उभं आहे.

अचानक दिवे फुटणे, शूट दरम्यान स्टंटमॅनचा अपघात होणे, स्त्री कलाकारांचे कपडे फाटणे अशा अनेक चित्रविचित्र घटना इथे घडतात.

पण, रोजच्या असणाऱ्या आर्थिक व्यवहारामुळे या घटना बाहेर चर्चिल्या जात नाही, पण ज्यांच्या सोबत या घटना घडल्या ते परत काय इथे फिरकले नाहीत.

 

९.डिसुझा चाळ, मुंबई

 

D’Souza-Chawl-Mahim-–inmarathi
innoza.in

 

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात देखील अशी ठिकाण आहेत म्हटल्यावर आश्चर्य तर वाटणारच.

तर डिसुझा चाळीची कथा अशी आहे की, इथे जवळच असलेल्या विहिरीत एक स्त्री अपघाताने पाणी भरताना पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून हा भुताटकीचा खेळ तिथे चालू झाला.

रात्री-अपरात्री एक स्त्री त्या विहिरीजवळ तेथील स्थानिकांना वावरताना दिसते. कधी कधी तर जोरजोरात ओरडण्याचा देखील दावा केला जातो.

 

१०. मुंबई हायकोर्ट

 

highcourt inmarathi
India.com

 

सुनसान जागा, निर्मनुष्य रस्ता अशा ठिकाणी तर भूत असतं हे माहित होतं. पण कोर्टात पण भूत असतं?

म्हणतात की,  जेव्हा जेव्हा कोर्टात मर्डरची केस चालू असते, तेव्हा तेव्हा हे भूत या केससाठी हजर असतं. कुठल्याशा चुकीच्या मर्डर केस मध्ये मृत्यूदंड दिलेल्या अपराध्याची ती आत्मा आहे असं म्हटलं जातं.

या व्यतिरिक्त ठाण्यातीलच बेरिंग कंपनी, मेरठ मधील जीपी ब्लॉक, पुण्यातील शनिवारवाडा, दिल्लीचे संजय वन असे ठिकाण आहेत जिथे भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत.

तर ही आहेत भारतातली काही ठिकाणं जी भूत-प्रेत सारख्या घटनांमुळे प्रसिद्ध झाली आहेत. वरील घटना सत्य आहे की नाही याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या कथांवर किती विश्वास ठेवावा याबद्दल साशंकताच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

वरील गोष्टी, घटना ऐकीव आणि चर्चिल्या जाणाऱ्या आहेत. या घटना सत्य आहेत असा दावा करण्याचा किंवा अशा घटनांना पाठिंबा देण्याचा आमचा हेतू नाही.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?