' ही भारतीय रेल्वे स्टेशन्स आहेत पर्यटन स्थळांइतकीच स्वच्छ आणि सुंदर! – InMarathi

ही भारतीय रेल्वे स्टेशन्स आहेत पर्यटन स्थळांइतकीच स्वच्छ आणि सुंदर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगातलं चौथं सगळ्यात मोठं रेल्वेचं जाळ हे भारतात पसरलेलं आहे. उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला कन्याकुमारी पर्यत, पूर्वेला आगरतळा पासून ते पश्चिमेला भुजपर्यंत जवळपास १,१५,००० किमीचं ट्रॅकचं जाळ आहे.

८००० रेल्वे स्थानक आणि त्यावर धावणाऱ्या ४५० सुपरफास्ट एक्सप्रेस, देशातला एकूण ६५००० किमीचा भाग एकमेकांना जोडायचं काम चोख बजावत आहेत.

देशात पहिली ट्रेन धावली ती १६ एप्रिल १८५३ ला,बोरीबंदर ते ठाणेच्या दरम्यान. पहिली पॅसेंजर ट्रेन धावली ती १५ ऑगस्ट १८५४ ला हावडा ते हुगळी दरम्यान. तेव्हापासून ते आजतागायत भारतीय रेल्वे आपल्या कर्तृत्वाचे इमले रचत गेली आहे.

एकूण ११,००० रेल्वे या धावत आहेत आणि त्यात ७००० या पॅसेंजर ट्रेन आहेत. रेल्वेस्टेशन म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे अस्वच्छता, गर्दी येते. पण आज अशी काही रेल्वे स्टेशन्स आहेत जी अतिशय सुंदर आणि थक्क करणारी आहेत.

तर पाहूया भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेल्वे आणि रेल्वे स्थानकांबद्दल काही विशेष…!

१. आगरतळा रेल्वे स्टेशन

 

Agartala-Railway-Station inmarathi

 

त्रिपुराचा इतिहास दर्शवणाऱ्या उजयंता पॅलेससारखी हुबेहूब या स्टेशनची बांधणी करण्यात आलेली आहे.

आगरतळा ही स्वतंत्र भारताची पहिली अशी राजधानी आहे जी रेल्वेच्या संपर्कात सर्व प्रथम आली.

२. कामाख्या रेल्वे स्टेशन

 

kamakhya railway station inamarathi

 

गुवाहाटीमधलं दुसरं सगळ्यात मोठं स्थानक. या स्टेशनचं बांधकाम हे आसाम मधल्या प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरासारखं आहे.

३. हावडा जंक्शन

 

hawrah junction inmarathi

 

देशातलं सगळ्यात मोठं आणि जुनं रेल्वे स्टेशन म्हणून हावडा जंक्शन प्रसिद्ध आहे. विक्रमी २३ प्लॅटफॉर्मसह देशातलं सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असण्याचा रेकॉर्डसुद्धा हावडा जंक्शन होल्ड करत आहे.

 

४. गोरखपूर रेल्वे स्टेशन

 

gorakhpur inmarathi

 

जगातला सगळ्यात मोठा लांबीचा प्लॅटफॉर्म या स्थानकात आहे. १.३५ किमी एकूण लांबी या प्लॅटफॉर्मची आहे.

५. लखनऊ चारबाग रेल्वे स्टेशन

 

lucknow inmarathi

 

याच्या नावातच याची विशेषता आहे- ‘चारबाग’.  या स्टेशनच्या भोवती चार बागा आहेत. जेव्हा याचा एरियल व्यू पहाल तर बुद्धिबळाच्या पटासारखं याच स्ट्रक्चर दिसून येत.

मुघल, अवधी आणि राजपूत संस्कृतीची झलक या स्टेशनच्या बांधकामात दिसून येते.!

६. दिल्ली जंक्शन

 

delhi inmarathi

 

देशाच्या राजधानीतलं सगळ्यात जुनं स्थानक. दिल्ली म्हणजे लाल किल्ला…हीच ओळख दिसून यावी म्हणून दिल्ली जंक्शनचे बांधकाम सुद्धा लाल दगडमध्येच केलं गेलेलं आहे.

जगातलं सगळ्यात मोठं रूट रिलेच इंटरलॉकिंग सिस्टीम इथेच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

७. श्रीनगर रेल्वे स्टेशन

 

shrinagar inmarathi

 

काश्मीर म्हटलं की अक्रोडची मजबूत झाड आणि त्या झाडांच्या मजबूत लाकडांचं बांधकाम. श्रीनगर स्थानकाचे लाकडी बांधकाम हेच या अनोखी काश्मिरी शैलीचे प्रतिबिंब आहे.

८. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

 

csmt inmarathi

 

ऐतिहासिक, सगळ्यात जुनं, युनेस्को हेरिटेज असलेलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन. उपनगरीय रेल्वे वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक, दोन्हीचा सुरळीत इथून कंट्रोल केला जातो.

९. हबिबगंज रेल्वे स्टेशन

 

habibgunj inmarathi

 

भोपाळ मध्ये वसलेलं हे सुंदर स्थानक. लांब, निमुळती, तीन मजली इमारत हे या स्थानकाची विशेषता.

१०. कटक रेल्वे स्टेशन

 

cuttack inmarathi

 

किल्ल्यासारखं बांधकाम असलेलं अतिशय सुंदर असं बांधकाम कौशल्याचं उदाहरण म्हणजे कटक स्थानक. जगातल्या अनेक रेल्वे स्थानकांच्या बांधकामामागे याच स्थानकाच प्रतिबिंब पाहण्यात येतं.

११. चेन्नई सेंट्रल स्थानक

 

chennai inamarthi

 

जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा मिळालेलं देशातलं अजून एक स्थानक. ब्रिटिश बांधकाम शैली ‘गॉथिक रिवायवल’ पद्धतीने या स्थानकाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. पाश्चिमात्य बांधकाम शैली ठळकपणे येथे दिसून येते.

या स्थानकाची विशेषता म्हणजे याच नाव. चेन्नई सेंट्रल हे याच रोजच्या उल्लेखाचं नाव. अधिकृत नाव आहे, पुरात्ची थलैवर डॉ.एम.जी.रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन. देशातलं सगळ्यात मोठं नाव असलेलं स्टेशन.!

१२. वाराणसी जंक्शन

 

varanasi inmarathi

 

उत्तर भारतातलं रेल्वेचं केंद्र म्हणून हे स्टेशन प्रसिद्ध आहे.

अनेक प्रार्थनिय स्थळांना भेट देण्यासाठी याचं स्थानकात उतरावं लागत. गमतीने याला देशातलं सगळ्यात पवित्र स्टेशन देखील म्हणतात.

१३. खडगपूर रेल्वे स्टेशन

 

kharagpur inmarathi

 

देशातलं आणि बंगाल मधलं अजून एक जुनं आणि दमदार स्टेशन.

जगातला तिसरा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म इथेच. १०७२ मीटर एकूण लांबी असलेला हा प्लॅटफॉर्म २०१३ पर्यत सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असलेला स्थानक होत. नंतर गोरखपूर स्टेशनने याला ओव्हरटेक केलं.

१४. कोल्लम जंक्शन

 

kollam inmarathi

 

त्रावणकोरचे महाराज श्री मुलम तिरुनल राम वर्मा यांनी १९०४ ला या स्थानकाची निर्मिती केली. दक्षिण भारतातील जुन्या स्थानकांमध्ये याचा समावेश होतो.

जगातला दोन नंबर सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म याच स्थानकांमध्ये. जवळपास १.१ किमी लांबी असलेला हा प्लॅटफॉर्म गोरखपूर नंतर दुसरा मोठा प्लॅटफॉर्म असलेला स्थानक आहे.

१५. काचेगुडा रेल्वे स्टेशन

 

kacheguda railway station inmarathi

 

गॉथिक पद्धतीने बांधलेलं अजून एक सुंदर स्थानक. तत्कालीन हैद्राबादच्या निजामाने याची निर्मिती केली. इस्लामिक आणि ख्रिस्ती संस्कृतीचा मेळ याच्या बांधकामात दिसून येतो. मिनार आणि घुमट यांच्या अफलातून संगमाने या स्थानकाच्या सौंदर्यात अजून भर घातली आहे.

भारतीय रेल्वेच्या या थक्क करणाऱ्या गोष्टी सुद्धा वाचा…

१. आसामच्या दिब्रूगड पासून ते दक्षिणेत कन्याकुमारी पर्यंत धावणारी विवेक एक्स्प्रेस ही देशातली सगळ्यात लांब प्रवास करणारी एक्स्प्रेस आहे. जवळपास ८३ तासात ही एक्स्प्रेस ४२८६ किमीच अंतर पार पाडते. 

२. हावडा-अमृतसर एक्स्प्रेस हिला सर्वाधिक ११५ थांबे आहेत.

३. जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे ब्रिजचं बांधकाम हे जम्मू मध्ये चिनाब नदीवर चालू आहे. आयफेल टॉवरच्या जवळपास दुप्पट याची उंची असणार आहे.

४. दरवर्षी भारतीय रेल्वेच्या कमाईमध्ये १५% ची भरघोस वाढ होत असते.

भारतीय रेल्वे ही स्वतःमध्ये एक विशेष गोष्ट आहे. रेकॉर्ड्स, बांधकाम हे तिचे पैलू…! दिवसभरात करोडो प्रवाशांचे वहन करणाऱ्या भारतीय रेल्वेचे हे काही ठराविक वैविध्य….!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?