'शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!

शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारताच्या स्पेशल फोर्सेस या थेट भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. भारताच्या याच स्पेशल फोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्कोस

marcos-Indian-Navy-commandos-marathipizza

स्रोत

मरीन कमांडोजचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मार्कोस! हे भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून ओळखले जाते. ही फोर्स कोणत्याही दुर्गम भागामध्ये ऑपरेशन पूर्णत्वास नेऊ शकते परंतु मरीन एनव्हाररमेंटमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. १९४७ पासून मार्कोस देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दहशतवाद्यांशी लढणे, नौदला सोबत युद्धात सहभाग आणि संकटात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये मार्कोसने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. शत्रू देश आणि दहशतवाद्यांमध्ये मार्कोसची मोठी भीती आहे. वेळोवेळी मार्कोस इतर देशांसोबत स्पेशल ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होते.
पारा कमांडोज

para-commandos-marathipizza

स्रोत

भारताच्या सर्वोत्तम स्पेशल फोर्सपैकी एक फोर्स म्हणजे पारा कमांडोज ! भारतीय लष्कराचे युनिट म्हणून १९६५ मध्ये या फोर्सची स्थापना करण्यात आली. होस्टेज रेस्क्यू, काउंटर टेररिज्म, पर्सनल रिकवरी यांसारख्या परिस्थिती हाताळण्यामध्ये त्यांनी महारथ संपादन केली आहे. या फोर्समधील जवळपास सर्वच कमांडोजना भारतीय लष्कराच्या पॅराशुट रिजिममधून निवडले जाते. या फोर्समधील कमांडोजना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी अतिशय खडतर ट्रेनिंग मधून जावे लागते. १९७१ आणि १९९९ च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धामध्ये पारा कमांडोजने लक्षणीय कामगिरी केली होती. १९८४ मधील कुप्रसिद्ध ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये देखील या फोर्सचा सहभाग होता.
घातक फोर्स

ghatak-commandos-marathipizza

स्रोत

नावाप्रमाणेच ही फोर्स अतिशय घातक आहे. आपल्या पायदलातील सर्वात खतरनाक सैनिकांची ही फौज आहे. घातक फोर्स शत्रूच्या गोटात शिरून तेथील माहिती मिळवून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे.

 

फोर्स वन

force-one-commando-marathipizzaस्रोत

फोर्स वन ही भारताची नुकतीच बनवण्यात आलेली स्पेशल फोर्स आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सरकारने फोर्स वनची स्थापना केली. या फोर्सचं काम आहे मुंबई शहराला संरक्षण देणे. जगातील सर्वात चपळ आणि शक्तिशाली फोर्स मध्ये फोर्स वनचा समावेश केला जातो कारण ही फोर्स केवळ १५ मिनिटांत कोणतेही परिस्थिती आपल्या नियंत्रणाखाली आणू शकते.
कोबरा

cobra-commandos-marathipizza

स्रोत

नक्षलवादी दहशतीला ठेचून काढण्यासाठी बनवण्यात आलेली ही स्पेशल फोर्स सी.आर.पी.एफ. चे विशेष युनिट आहे. The Commando Battalion for Resolute Action(COBRA) ची स्थापना २००८ साली करण्यात आली होती. दाट जंगलात, डोंगररांगत नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी यांना विशेष ट्रेनिंग देण्यात येते.

भारताच्या या शूर फोर्सेसची ताकद आहेत त्यामध्ये असलेले भारताचे शूर वीर ! त्यांच्या धाडसाला आणि कर्तुत्वाला सलाम !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?