'आर्मी ऑफिसरच्या खांद्यावरील सन्मान चिन्हांमध्ये त्यांचे रँक दडलेले असतात

आर्मी ऑफिसरच्या खांद्यावरील सन्मान चिन्हांमध्ये त्यांचे रँक दडलेले असतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

कोणत्याही देशाची सुरक्षा त्या त्या देशाच्या सैन्यावर अवलंबून असते. कोणता देश किती शक्तिशाली आहे, हे त्या देशाकडे असलेल्या सैन्यबळावरून लक्षात येते. जेवढे मजबूत त्या देशातील सैन्य असेल तेवढाच तो देश अभेद्य राहील. याच कारणामुळे प्रत्येक राष्ट्र आपल्या सैन्यावर भरमसाठ खर्च करुन त्यांना बलशाली बनवतं.

भारताकडे तीन प्रकारची सेनादले आहेत – भारतीय लष्कर, भारतीय वायुदल आणि भारतीय नौदल.

यापैकी भारतीय लष्कर सर्वात महत्त्वपूर्ण असून देशाची सर्वांगीण सुरक्षा यांच्याच खांद्यावर असते. कोणत्याही एका संस्था वा ऑर्गनायझेशनमध्ये ज्याप्रमाणे खालून वर प्रत्येकाला जबाबदाऱ्या आणि पद नेमून दिलेली असतात त्याचप्रमाणे भारतीय लष्करामध्ये देखील खालून वर प्रत्येकाला रँक्स नेमून दिलेले आहेत. आज याच रँक्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

army-ranks-marathipizza00

तुम्ही एखाद्या सैनिकाचा ड्रेस पाहून त्याचं रँक काय आहे, हे ओळखू शकता त्यासाठी तुम्हाला त्याच्या खांद्यावर असणाऱ्या विशिष्ट सन्मानचिन्हाबद्दल माहिती असायला हवी.

सिपाही/जवान

army-ranks-marathipizza01

लष्करात भरती झाल्यावर एखाद्या सैनिकाला सर्वप्रथम सिपाही पदाचा रँक मिळतो. NDA किंवा IMA मधून उत्तीर्ण झाल्यावर थेट एखाद्या अधिकार पदाचा रँक मिळतो, परंतु सामान्य भरती प्रक्रीयेमधून सैन्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीला सिपाही रँक मिळतो.

 

लान्स नायक

army-ranks-marathipizza02

बढती झाल्यावर सिपाही लान्स नायक म्हणून ओळखला जातो. त्याच्या रँकची ओळख होते त्याच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर असलेल्या लाल बाणावरून !
नायक

army-ranks-marathipizza03
नायक रँक मिळाल्यावर सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर एक लाल रंगाचा बाण जोडला जातो.

हवालदार

army-ranks-marathipizza04
हवालदार रँकवर बढती झाल्यावर खांद्याच्या सन्मानचिन्हावर अजून दोन लाल रंगाच्या बाणांची भर पडते.

 

नायब सुभेदार

army-ranks-marathipizza05

सिपाही पासून हवालदार पर्यंतची रँक्स येतात other अर्थात इतर या श्रेणीमध्ये! यानंतर सैनिक JCO म्हणजेच ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर बनतो. यासाठी देखील लेखी परीक्षा द्यावी लागते. या JCO च्या अगोदरचे पद असते नायब सुभेदार! नायब सुभेदार रँक मिळणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर लाल रंगाच्या बाणाचा आकार बदलून तो सरळ पट्टीच्या आकारामध्ये येतो. सोबतच त्यावर एक स्टार देखील असतो.

 

सुभेदार

army-ranks-marathipizza08
या रँकची ओळख होते खांद्याच्या सन्मानचिन्हावर असलेल्या दोन स्टारच्या माध्यमातून!
सुभेदार मेजर

army-ranks-marathipizza07
या रँकची ओळख होते खांद्याच्या सन्मानचिन्हावर असलेल्या एका मोठ्या अशोक स्तंभाने !

लेफ्टनंट

army-ranks-marathipizza09
येथून अधिकारी रँकला सुरुवात होते. एका लेफ्टनंटची ओळख होते त्याच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर असलेल्या दोन स्टार वरून , परंतु यावर लाल रंगाची पट्टी नसते.
कॅप्टन

army-ranks-marathipizza10
कॅप्टन पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर तीन स्टार असतात.
मेजर

army-ranks-marathipizza11
अनेकांचा असा गैरसमज असतो की मेजर हा रँक कॅप्टनपेक्षा छोटा आहे परंतु असं नसतं. मेजरच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर मोठे अशोक स्तंभ असते.
लेफ्टनंट कर्नल

army-ranks-marathipizza12
लेफ्टनंट कर्नलच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर एक अशोक स्तंभ आणि एक स्टार असतो.
कर्नल

army-ranks-marathipizza13
दोन स्टार आणि एक अशोक स्तंभ कर्नल पदावर असणाऱ्या सैनिकाची ओळख करून देते.
ब्रिगेडियर

army-ranks-marathipizza14
ब्रिगेडियर पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर तीन स्टार आणि एक अशोकस्तंभ असते.
मेजर जनरल

army-ranks-marathipizza15
सैन्यात एका वेळेला ८ मेजर जनरलची नेमणूक केलेली असते. मेजर जनरल पदावर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर तलवार आणि थोड्या वेगळ्या प्रकारचे अशोकस्तंभ असते.
लेफ्टनंट जनरल

army-ranks-marathipizza16
या रँकवर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर वरच्या बाजूला अशोक स्तंभ आणि खालील बाजूला तलवार असते.
जनरल

army-ranks-marathipizza17
जनरल पदावर अतिशय सक्षम व्यक्तीची नेमणूक केली जाते. या रँकवर असणाऱ्या सैनिकाच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर एक अशोकस्तंभ त्याखाली दुसरे वेगळ्या रचनेचे अशोकस्तंभ आणि शेवटी तलवार असते.
फिल्ड मार्शल

army-ranks-marathipizza18
लष्करामध्ये फिल्डमार्शल हे सर्वात वरचे पद आहे. फिल्ड मार्शलच्या खांद्याच्या सन्मानचिन्हावर एक अशोक स्तंभ, त्या खाली तलवार असते आणि या तलवारीच्या चिन्हाभोवती फुलांच्या माळाच्या रचनेमधील विशिष्ट नक्षी असते.

आता पुढल्या वेळेस जेव्हा कधी लष्करातील सैनिकाशी तुमची भेट होईल तेव्हा त्याच्या ड्रेसवरील खांद्याच्या सन्मानचिन्हावर नजर टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांना कोणता रँक मिळाला आहे.

प्रतिमा स्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “आर्मी ऑफिसरच्या खांद्यावरील सन्मान चिन्हांमध्ये त्यांचे रँक दडलेले असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?