केरळच्या ह्या देवाला लागतो चॉकलेटचा नैवेद्य!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

देव म्हटला की त्याच्या भेटीला जाताना त्याला अर्पण करायला काहीतरी वस्तू म्हणा किंवा नैवेद्य म्हणा घेऊन जावा लागतो. म्हणून देवाला नैवेद्य म्हणून आपण सामान्य गोष्टी घेऊन जातो जसे की फुलं, फळ आणि त्या देवाचा आवडता एखादा पदार्थ असेल तर..!

उदाहरणार्थ गणपतीला मोदक आवडतो म्हणून आपण त्याला मोदकाचा नैवेद्य दाखवतो, परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की, आपल्या भारतात एक असं मंदिर आहे जेथील देवाला चॉकलेट आवडते आणि म्हणून त्याला चॉकलेटचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

केरळातील थेक्कन पलानी बालसुब्रमण्यिम मंदिरात देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त हा चॉकलेटचा नैवेद्य दाखवतात.

या मंदिरात भक्तांना हाच नैवेद्य प्रसाद म्हणून देण्यात येतो. केरळातील अलपूझ्झा गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरातील देवाला म्हणूनच मंच मुरुगन या नावानं ओळखले जातं. मुरुगन मंदिरात कोणत्याही जाती, धर्माची लोकं चॉकलेटचे खोके आशिर्वाद मिळवण्यासाठी अर्पण करतात. त्यामुळंच परिक्षेच्या महिन्यांमध्ये लहान मुलं मुरुगन चरणी माथे टेकवण्यासाठी एकच गर्दी करतात.

balasubramania-temple-marathipizza01

स्रोत

पुष्पांजली किंवा अर्चना केल्यानंतर जसं फूलं आणि चंदन प्रसाद म्हणून भक्तांना परत देण्यात येतं तसंच अर्पण केलेली चॉकलेटही प्रसाद म्हणून परत देण्यात येतात. भक्तांचा तूळा भरणासाठीही चॉकलेटचा वापर करण्यात येतो. देशातील इतर राज्यातील तसेच परदेशातील भक्तही खूप मोठ्या संख्येने चॉकलेटचे बॉक्स घेऊन या मंदिरात दर्शनासाठी येतात.

सुरुवातीला फक्त लहान मुलंच बालमुरुगनला चॉकलेटचा खाऊ आणत असत. पण आता सगळ्या वयोगटातील लोकं चॉकलेटचा नैवेद्य दाखवतात. तमिळनाडूतील पलानी येथील मुरुगनच्या मंदिरात नियमीत दर्शनाला जाणाऱ्या एका निस्सीम भक्ताच्या स्वप्नात आणि त्यांनी त्याला मंदिर बांधण्याचं सांगितलं अशी आख्यायिका प्रचलीत आहेत.

 

balasubramania-temple-marathipizza02

स्रोत

चॉकलेट प्रसाद म्हणून अर्पण करण्याची प्रथा नक्की कधी सुरु झाली हे मात्र कुणालाच सांगता येत नाही. या मंदिरातील मूर्ती “बाल” मुरुगनची असल्यानं कुणाच्या तरी सूपीक डोक्यातून चॉकलेटचा प्रसाद दाखवावा अशी कल्पना सूचली असण्याची शक्यता वर्तवली जाते.

कधी केरळला भेट दिलीत तर या अनोख्या मंदिराला जरूर भेट द्या आणि हो, चॉकलेट घेऊन जायला विसरू नका !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?