' गोपीनाथ मुंडे यांनी उघडकीस आणले दाऊद आणि शरद पवारांचे संबंध...?

गोपीनाथ मुंडे यांनी उघडकीस आणले दाऊद आणि शरद पवारांचे संबंध…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शरद पवार हे भारताच्या राजकारणातलं मोठं नाव. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असणारे शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव मानलं जातं. राज्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेबद्दल पवार यांच्या भूमिकेकडे नेहमीच सगळ्यांचं लक्ष असतं.

अलीकडच्या निवडणुकांमध्येही आणि राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेमध्येही त्यांचा मोठा वाटा होता. आयसीसीचे अध्यक्षपद, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या भूषवणाऱ्या शरद पवार यांच्यावर थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असण्याचेही आरोप करण्यात आले होते.

 

sharad pawar inmarathi

 

अलीकडेच संजय राऊत यांनी दाऊदशी संपर्क झाल्याचे विधान केल्यावर पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरील हे आरोप ताजे झाले. हे आरोप केले होते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी.

त्यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. काय होते हे आरोप आणि काय होती गोपीनाथ मुंडे यांची भूमिका? जाणून घ्या, या लेखाच्या माध्यमातून… 

 

 

दाऊद इब्राहिम हे भारताच्या विरोधातील दहशतवादी कारवायांमधील हे मोठं नाव. १९९३ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी त्याचा थेट संबंध उघड झाला आहे. या हल्ल्याआधी १९९२ मध्ये मंत्रीमंडळातील काही व्यक्तींकडून आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीयांकडून दुबई येथे वारंवार संपर्क करण्यात आल्याचे उघड झाले होते.

===

हे ही वाचा – शरद पवारांना लाख शिव्या घाला, पण त्यांच्यासारखी “विद्या”नगरी कुणीच उभारली नाही… हे मान्य करा!

===

sharad pawar dawood inmarathi

 

तत्कालीन विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात या मुद्द्यावरून घणाघाती आरोप केले होते. निवडणुकांच्या प्रचारामध्येही हाच मुद्दा चांगलाच गाजला होता.

महानगर टेलिकॉमच्या उघड झालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल ते १९ जून १९९२ या दरम्यान सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळातील १२ कार्यालयांमधून दुबईतील वेगवेगळ्या फोन नंबरवर ११३ वेळा संपर्क करण्यात आला होता.

११-६ या कार्यकालीन वेळामध्ये या क्रमांकावर वारंवार संपर्क करण्यात आले होते. त्यानंतर गृह खात्याकडून याची चौकशीसुद्धा करण्यात आली होती.

याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकारवर जहरी टीका केली होती. त्याचबरोबर या संपर्क करणाऱ्या व्यक्ती शरद पवार यांच्याशी संबंधित असून शरद पवार यांचा थेट दाऊदशी संबंध असल्याचे आरोपसुद्धा त्यांनी केले होते.

राजकीय पक्ष आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा संबंध जोडत मुंडे यांनी त्याकाळी प्रचारसभा आणि संपूर्ण निवडणूक गाजवून सोडली होती. त्याचबरोबर निवडणूकीमध्ये जिंकून सरकार स्थापन झाल्यास दहशतवादाशी असलेले पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे संबंध उघड करू असे त्यांनी जाहीर केले होते.

 

sharad gopinath inmarathi

===

हे ही वाचा – “मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे

===

त्याचाच फायदा होऊन शिवसेना आणि भाजपचे सरकार १९९५ मध्ये स्थापन झाले होते. या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गोपीनाथ मुंडे यांनी घेतली होती.

उपमुख्यमंत्री पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला. तपासानंतर उघड झालेल्या यादीमध्ये अनेक पवार समर्थकांची नावे होती. त्यामुळे दाऊद कनेक्शनशी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव जोडले जात होते.

यामध्ये पद्मसिंह पाटील, अरुण मेहता, जावेद खान, अजित पवार, मदन बाफना, रमेश दुबे, पुष्पां हिरे यांसारख्या अनेकांचा समावेश होता. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध पवार असा थेट सामना बघायला मिळाला. त्यावेळी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीसुद्धा हे प्रकरण गाजले होते.

गोपीनाथ मुंडे यांना विरोधकांनी हे क्रमांक उघड करण्याचीसुद्धा मागणी केली. त्यावेळी तपास आणि गुप्ततेचे कारण देत हे नंबर उघड करण्यात आले नाहीत. यासाठी गुप्तहेर खाते आणि रॉ लासुद्धा पत्रव्यवहार करून मुंडे यांनी तपास करण्यास सांगितले.

एखाद्या राज्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे रॉ ची मदत तपासासाठी घेण्यात आली असावी.

या झंझावाती प्रकरणामुळे मुंडेवरही विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. मुंडे यांनी केलेले आरोप राजकीय आकसापोटी असल्याची टीका विरोधकांनी केली होती. त्याचबरोबर सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आरोप फेटाळून लावले होते.

 

sharad pawar munde dawood

 

“मंत्र्यांनी राज्याची व्यवस्था सांभाळायची असते स्वतःच्या कार्यालयाची नाही” अशी टीका पद्मसिंह पाटील यांनी केली होती, तर “मुंडे यांनी एका आठवड्यात आरोप सिद्ध करावे,आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडतो आणि सिद्ध झाले नाहीत तर मुंडे यांनी राजकीय संन्यास घ्यावा” अशी जहरी टीका मेहता यांनी केली होती.

मेहता यांनी मुंडे यांना अब्रूनुकसानीबद्दल कोर्टात खेचण्याचा इशारासुद्धा दिला होता.

दुबईमधील स्थानिक हॉटेल्स, इमारती याशिवाय काही लोकल सेवा येथे हे फोन कॉल्स करण्यात आले होते. मंत्र्यांच्या कार्यालयातून हे फोन गेले असले तरीही त्यांच्याशिवाय इतरही लोकांना या फोन्सचा ऍक्सेस असल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडला होता.

त्याचबरोबर मुंडे यांना खुले आव्हानसुद्धा दिले होते. मात्र मुंडे यांनी त्यावेळी आरोपांची मालिका कायम ठेवली होती. दाऊद प्रकरणाचा तपास करून त्याचा छडा लावण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले होते.

शरद पवार यांच्या असाही आरोप केला जातो की, दाऊद इब्राहिमने सरेंडर करण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र मुख्यमंत्री असताना पवार यांनी भूमिका न घेतल्याने त्यावर कृती होऊ शकली नाही.

शरद पवार यांच्यावर असे अनेक गंभीर आरोप झालेले आहेत. मात्र प्रत्यक्षात आजही इतकी वर्षे ते देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत.असं असलं तरीही आजही दाऊद यांच्याबद्दल झालेल्या आरोपांमुळे शरद पवारांकडे संशयाची सुई कायम राहते.

प्रत्यक्षात त्यांचं दाऊद कनेक्शन आणि हे टेलिफोन प्रकरण गुलदस्त्यातच असलं तरीही वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा पुन्हा दे लोकांसमोर येत आहे हे निश्चित…!

===

हे ही वाचा – हा पत्रकार नसता तर दाऊदचा ‘तो’ फोटो कधीच आपल्यासमोर आला नसता!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?