' महागड्या जीमपेक्षा, घरी-ऑफिसमध्येही फीटनेस राखण्याच्या १० सोप्प्या टिप्स! – InMarathi

महागड्या जीमपेक्षा, घरी-ऑफिसमध्येही फीटनेस राखण्याच्या १० सोप्प्या टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज तरी जीमला जाईन, पण ऑफिसमध्ये अचानक काम आलं ?

ऑफिसमध्येच दमायला झालंय पण जीमला कधी जाणार ?

 

weakness in office InMarathi

 

कामाच्या व्यापामुळे जीमला न जाण्याची तुमचीही कारणं अशीच आहेत का ?

त्यासाठी रोज व्यायाम करायलाच हवा पण आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये व्यायाम न करण्याची अनेक कारण मिळू शकतात, पण या कारणांवरती पर्याय शोधून आपण आपल्या आरोग्याची निगा राखलीच पाहिजे.

आता आपल्यातील बरेच जण म्हणतील,” मला रोज ऑफिस असतं मग मी केव्हा जाऊ जिमला आणि व्यायाम केव्हा करू.”

व्यायाम करावासा वाटतोय पण ऑफिसचं कारण सांगून तुम्ही पळवाट शोधताय  असं कधी तुमच्या बाबतीत झालंय?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

किंवा अनेक जणांचा असा देखील प्रॉब्लेम असेल की आमच्याकडे जिम फारच महाग आहे मग अशा महागड्या जिमला जाण्यापेक्षा आणि कारण देण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या ऑफिसमध्येच व्यायाम करू शकलात तर?…

 

Gym Work InMarathi
India Today

होय, तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन कामांच्या दरम्यानच हा व्यायाम करू शकता. कसा करायचा हा व्यायाम जाणून घेऊयात.

आपल्याकडे रूढार्थाने असे म्हटलं जातं, की जो दिवसभर बसून असतो त्याचे वजन नक्कीच वाढतं. त्यामुळेच खालील व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नक्की करून बघायला हवेत.

१. जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा रस्त्यामध्ये तुम्हाला व्यायाम करता येईल का असा विचार करा.

उदाहरणार्थ, तुम्ही ऑफिसला जाताना चालत जाऊ शकता किंवा सायकल देखील चालवत जाऊ शकता जेणेकरून रस्त्यामध्ये तुमचा बऱ्यापैकी व्यायाम होईल.

 

bycycle ride inmarathi

 

तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन टेबल वरती कामच करणार असल्यामुळे तुम्हाला सकाळच्या या व्यायामाचा फार काही फरक पडणार नाही. पण ही कल्पना मात्र तेच लोक आमंलात आणू शकतात जे ऑफिस पासून काही अंतरावरती राहात आहात आहेत,

पण मग जे ऑफिस पासून लांब राहतात त्यांनी कशाप्रकारे व्यायाम करावा तर, जर तुम्ही कारने ट्रॅव्हल करत असाल तर तुमची कार तुमच्या पार्किंगच्या सर्वात लांब असणाऱ्या कोपऱ्यात पार्क करावी जेणेकरून तुमचं चालण्यामध्येच व्यायाम होऊन जाईल.

 

walking inmarathi

 

जे लोकं पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात त्यांनी एक किंवा दोन स्टॉप आधीच उतरावं आणि तेथून चालत प्रवास करावा जेणेकरून तुमचा योग्य प्रकारे व्यायाम होईल.

२. पायऱ्यांचा वापर करा

घरापासून ऑफिसपर्यंत सगळीकडेच लिफ्ट असल्याने पाय-या चढणं ही क्रिया हल्ली आपण विसरत चाललो आहोत.

 

walking steps inmarathi

 

पण ऑफिसचा मजला गाठण्यासाठी मात्र पाय-याच वापरा, कारण पायऱ्यांचा वापर केल्याने तुमच्या शरीरातील जास्तीच्या कॅलरीज बर्न होतील ज्यांना पाय-या चढणं  खूपच कठीण वाटत असेल त एकावेळी दोन पायऱ्या चढाव्यात जेणेकरून तुम्हाला ते अंतर खूप वाटणार नाही आणि तुमचा व्यायाम देखील पद्धतशीर होईल.

३. स्वतःशी स्पर्धा करायला शिका

तुम्ही दिवसातून किती पाणी पिता? सरासरी प्रत्येकाने दिवसातून किमान दोन लिटर तरी पाणी प्यायला हवे जेणेकरून आपले शरीर तंदुरुस्त राहील.

 

Young Woman Drinking Water by Sea

 

तुम्ही स्वतःला चॅलेंज करा की तुम्ही दिवसातून दोन लिटर पाणी नक्कीच पिता येईल. अगदीच अवघड वाटत असेल तर तुम्ही दोन लिटर पाण्याचे देखील टप्पे करू शकता.

उदाहरणार्थ, तुम्ही दोन लिटरची क्षमता असलेली एक बाटली तुमच्यासोबत ठेवतील तर त्याचे समान चार भाग करा.

प्रत्येक भागावर ती दहा वाजता, बारा वाजता, दोन वाजता हे वेळापत्रक लिहा आणि कामासोबतच तुमचे हे देखील टार्गेट तुम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असायला हवे.

४. बैठे व्यायाम

ऑफिसमध्ये आल्यापासून आपली खुर्ची आणि त्यापुढील लॅपटॉप हेच आपलं जग असतं,

मात्र तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये काहीवेळ बैठे व्यायामांना द्यायला हवा. त्यासाठी आलार्म सेट करा जेणेकरून तो आलार्म तुम्हाला व्यायाम करण्याची आठवण देत राहील.

 

 

बसल्या ठिकाणी तुम्हाला काही साध्या पद्धतीचे व्यायाम करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे ताणले गेलेले सर्व स्नायू तुम्हाला शिथील करता येतील

५. स्टॅंडिंग डेस्क चा विचार करा

आज-काल कॉर्पोरेट ऑफिस मध्ये या नवीन संकल्पनेबद्दल विशेष कुतूहल निर्माण झालं आहे.

 

 

या संकल्पनेवरती काही कॉर्पोरेट हाऊसेस काम देखील करत आहेत. एका संशोधनाअंती असे निष्पन्न झालं, की सलग दोन तास एकाच जागेवरती बसून काम केल्याने मानवी शरीरामध्ये आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.

 

 

मग या सर्व गोष्टींवर पर्याय शोधण्यासाठी ही नवीन संकल्पना उदयास आली आहे.

निरोगी राहण्यासाठी तुम्ही सुरुवातीचा अर्धा तास काम स्टॅंडिंग डेस्क संकल्पनेमध्ये करू शकता.

६. सॉफ्ट म्युझिक ऐका

लॅपटॉपवर काम करताना दिवसातील काही मिनीटं सॉफ्ट म्युझिक ऐकायला काहीच हरकत नाही.

हेडफोन्सच्या मदतीने हा व्यायाम केला, तर इतरांना त्रास न देता शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स  वाटेल.

 

 

कामाचं टेन्शन, टार्गेट, डेडलाईन्सचं प्रेशर, ऑफिसमध्ये झालेली वादावादी, अशा सगळ्या परिस्थितीतही मन आणि बुद्धी शांत ठेवायची असेल, तर हा व्यायाम कराच.

जेणेकरून तुमच्यामध्ये कुठल्याही इतर नकारात्मक सवयी शिरणार नाहीत. काम करत असताना तुम्ही तुमचं शरीर कणखर आणि निरोगी राहणे एका चांगल्या भविष्यासाठी गरजेचे आहे.

७. लंच ब्रेकचे टाइमटेबल

प्रत्येक ऑफिसमध्ये दुपारचा किमान एक तास लंच ब्रेकसाठी दिला जातो. त्यातील अर्धा तास जेवणासाठी वापरला तर उरलेल्या अर्धा तासाचे काय करता?

 

bethesda magazine

 

लंच ब्रेक मधील वेळ तुम्ही सर्वच वापरता असं नाही त्यामुळे झटपट लंच करून तुम्ही ऑफिस मधील जिमचा वापर करू शकता किंवा तुम्ही कुठेतरी लॉंग वाकला देखील जाऊ शकता.

या वेळेचा सदुपयोग केल्यामुळेच तुम्ही तुमच्या फिटनेस गोल पर्यंत पोहोचू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा.

८. व्यायाम होण्यासाठी ऑफिसमध्ये देखील तुम्ही अनेक कल्पनांचा वापर करू शकता. जसे की प्रिंट आउट काढण्यासाठी तुम्ही तुमची कागदपत्र सर्वात लांबच्या प्रिंटर कडे देऊ शकता.

 

 

जेणेकरून तुम्हाला तुमच्या डेस्क पासून उठून त्या प्रिंटर पर्यंत चालत जावे लागेल आणि या मधल्या काळामध्ये तुमचा सहज व्यायम होईल.

या काळामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे व्यायाम चालत चालत देखील करू शकता रोज, जेणेकरून तुमचे ताणले गेलेले स्नायू शिथिल होतील या प्रकारच्या व्यायामामुळे तुमचा कामातील उत्साह देखील नक्कीच वाढेल.

९. तुम्ही सर्वप्रथम तुमच्या ऑफिसमधील तुमच्या डेस्कचा अभ्यास करायला हवा कारण डेस्क मध्ये देखील तुम्ही एक प्रकारे व्यायाम करू शकता.

 

office-gym-Inmarathi

 

आपण आपला डेस्क लावताना अशा पद्धतीने लावलेला असतो जेणेकरून आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि वस्तू आपल्या हाताच्या जवळच असतील आणि आपल्याला जास्त हालचाल करू लागू नये. पण व्यायाम करण्यासाठी आपल्याला नेमकं याच्या उलट करायचं आहे,

आपल्याला ज्या गोष्टी सर्वात जास्त प्रमाणात लागतात किंवा ज्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्या आपल्या हाता पासून काही अंतर दूर ठेवाव्यात जेणेकरून त्या गोष्टी घेताना आपल्याला हालचाल करायची संधी मिळेल आणि दिवसभरात नकळत आपला भरपूर व्यायाम होईल.

१०.  ऑफिसला जातानाच जिम साठी लागणारं सर्व साहित्य सोबत घेऊन जा, म्हणजे जींम टाळण्याचंं कारणचं मिळणार नाही.

जेव्हा ऑफिस सुटेल तेव्हा घरी जायच्या आधी तुम्ही जिमला जावं आणि हीच कल्पना तुम्ही तुमच्या काही मित्रांना देखील सांगून ठेवा.

 

 

जेणेकरून तेदेखील तुमच्यासोबत ऑफिसमधुनच जिमला येतील आणि तुमचे ध्येय तुमच्या लक्षात राहील. तुम्ही ध्येयापासून ढळणार नाहीत.

ज्याला अशा प्रकारचे व्यायाम करायचे असतील त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये हे प्रयोग नक्कीच करून बघावेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?