' वरवर पाहता साधा वाटणारा आणि त्यामुळे lightly घेतला जाणारा “थकवा”, गंभीर आजार असू शकतो! – InMarathi

वरवर पाहता साधा वाटणारा आणि त्यामुळे lightly घेतला जाणारा “थकवा”, गंभीर आजार असू शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानसिक आणि शारीरिक थकवा येणे ही एक गंभीर समस्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निर्माण झालेली आहे. त्याची अनेक कारणे आहेत आणि जर हे सतत सुरू राहिलं तर आपल्यालाच त्याचा पुढे खूप त्रास होऊ शकतो.

मुळात हा प्रश्न निर्माण झालाय तो आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे. आपल्या खाण्याच्या वेळा, झोपेच्या वेळा यांचं गणित बिघडले आहे. तसेच कामाच्या ठिकाणचा मानसिक ताण आणि कमी शारीरिक हालचाल ही महत्त्वाची कारणे आहेत.

 

tiredness inmarathi
everyday health

 

थकवा येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे म्हणजे आपल्या शरीरातील उर्जा कमी होणे. शरीरात ऊर्जा येते ती ग्लुकोजमुळे आणि कार्बोहायड्रेट्समुळे.  त्यापासूनच शरीरात निरनिराळी हार्मोन्स तयार होतात.

म्हणजे, आपल्या स्वादुपिंडात(pancrea) इन्शुलिन हे हार्मोन तयार होतं आणि ते इन्शुलीन शरीरातील साखर नियंत्रित करतं. जर आपलं खाणं नीट नसेल किंवा अतिगोड पदार्थ खायची सवय असेल तर मात्र आपल्या शरीरातील साखर वाढते आणि आपल्याला मधुमेहाचा सामना करावा लागतो.

वाढलेल्या ताणामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब वाढतो आणि एकूणच आपलं स्वास्थ बिघडतं. चला तर मग हा ताण, थकवा कमी करण्यासाठी काय करता येईल हे पाहू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

खाण्याच्या सवयी

 

eating habits inmarathi

 

 

शरीरातील ताण कमी करण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जेवण. आपण काय खातो आणि कसं खातो याचा खूप महत्त्वाचा संबंध आपल्या शरीराशी आहे. त्यावरुनच आपल्या शरीराचे पोषण होतं.

आपल्या शरीरातील सगळ्या यंत्रणा या एकमेकांना जोडलेले असतात म्हणजे आतड्याला त्रास झाला तर त्याचा परिणाम मनावर होतो म्हणून योग्य प्रमाणात खाणं महत्त्वाचा असतं.

प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते म्हणून एक डाएट एकाला चालतं तर दुसऱ्याला चालत नाही त्यासाठी आपल्या शरीराची माहिती आपल्याला असणं जरुरीचं आहे.

बऱ्याच जणांची समजूत असते की डाएट म्हणजे काय तर बेचव खाणं, केवळ सूप सलाड खाणं, उपासमार करून घेणं. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. आपल्या शरीराची प्रकृती, वजन, शारीरिक रचना, कोणता आजार आहे का आणि आपल्या कामाचं स्वरूप याला अनुसरून आपला आहार असावा.

 

water inmarathi

आपण पाणी किती पितो हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरासाठी साधारणपणे अडीच ते तीन लिटर पाणी आवश्यक आहे. पाणी जास्त पिल्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होण्यापासून वाचतं.

तसंच चहा, कॉफी सारखी उत्साहवर्धक पेय फक्त दिवसभरातून दोन कप घेतली तर खूप उपयुक्त आहेत, पण जर आपण दिवसभरातून सात आठ कप चहा कॉफी घेत असू तर ते निश्चितच घातक आहे.

त्याचा परिणाम आपल्या झोपेवर आणि भुकेवर होतो म्हणून ऑफिसमध्ये वगैरे उगीचच चहा पिणे टाळावं.

 

tea-coffee1-inmarathi
nuffoodsspectrum.in

 

सकाळचा नाश्ता हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हापासून सकाळी कुठून काही खाईपर्यंत जवळजवळ बारा तास जातात आणि आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते.

म्हणून पौष्टिक नाश्ता (हेल्दी ब्रेकफास्ट) खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये फळं,अंडी आणि कार्बोदके यांचा समावेश असावा. ब्रेड खात असाल तर तो मल्टीग्रेन किंवा व्हीट ब्रेड असेल तर उत्तम.

 

breakfast inmarathi
harvard health

 

तसंच जेवणाच्या वेळा कधीही टाळायचा नाहीत उगीच विनाकारण जेवण न करता चहा पिणे कॉफी घेणं हानिकारक आहे. जेवणातही आपला आहार हा चौरस असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.

साधारणपणे पोळी भाजी हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, दही ताक यांचा समावेश असावा. कधीकधी तीन वेळेला भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने ६ वेळा खाल्लं तरी चालेल. त्यामळे कॅलरीज नीट वापरल्या जातील.

कधीही क्रॅश डाएट करायचा नाही त्यामुळे काय होतं की एक सात आठ दिवस आपण क्रॅश डाएट करतो,आणि आपल्या शरीराचं गणित बिघडवतो.

यामध्ये बऱ्याचदा न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते. आपल्या शरीराला आवश्यक असलेली प्रथिने विटामिन्स, कार्बोदके पुरवली जात नाहीत.

जास्त हेल्दी डायट कसा येईल येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आहारामध्ये फळ, भाज्या, कडधान्य यांचा समावेश केला पाहिजे तसंच तेलकट पदार्थ किंवा तुपकट पदार्थ यांचा वापर कमी केला पाहिजे तसंच जंकफूड आणि फ्रोझन फुड यांचा वापर टाळला पाहिजे.

 

balanced diet inmarathi
firstcry parenting

 

मीठ आणि साखरेचे प्रमाण आपल्या आहारात कमी असायला पाहिजे.

आपल्या आहारात स्थानिक खाद्यपदर्थांचा समावेश असाव. मांसाहार करत असाल तर मासे, चिकन यांचा समावेश आपल्या जेवणात करायला हरकत नाही. पण ते खूप मसालेदार करणं टाळलं तर जास्त चांगलं.

महिलांमध्ये आयर्नची कमतरता खूप निर्माण होते. भारतातल्या बऱ्याचशा मुली ॲनिमियाग्रस्त असतात. त्यासाठी आयर्नयुक्त भाज्या, फळं, रेड मीट यांचा समावेश त्यांच्या आहारात असला पाहिजे.

 

झोपेचे वेळापत्रक

 

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

 

झोप ही खूप महत्त्वाची असते. कमी झोपेमुळे बऱ्याचदा थकवा जाणवतो. सामान्यपणे माणसाला साधारणतः आठ तास झोप आवश्यक आहे. झोप व्यवस्थित लागण्यासाठी रात्री वा संध्याकाळच्या वेळेस कॉफी सारखी पेय न घेणे उत्तम.

झोप लागावी म्हणून झोपेच्या गोळ्या घेणं तर अजूनच घातक कारण ठराविक दिवसानंतर त्या गोळ्यांचा परिणाम कमी होतो.

झोपेच्या आधी कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं म्हणजे मोबाईल आणि टीव्ही न पाहिलेली बरी…त्यापेक्षा तुम्ही एखादं पुस्तक वाचन किंवा चांगली झोप लागावी म्हणून श्वासाचे काही प्रकार करणे हे जास्त चांगलं.

ओंकाराचा जप किंवा योगनिद्रा सारखे प्रकार जर येत असतील तर ते केलेले केव्हाही उत्तम.

 

जीवनशैली

 

shahid kapoor 1 inmarathi

 

सिगारेट,दारू, तंबाखू यासारख्या पदार्थांपासून लांब राहिलेलंच बरं. सिगारेटच्या व्यसनांमुळे आपली फुफ्फुस किंवा लंग्ज काम करेनाशी होतात. कारण शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.

दारू किंवा इतर कोणत्याही ड्रग्जच्या व्यसनामुळे थकवा, निराशा आणि हतबलता यांचा सामना करावा लागतो.

तुमच्या शारीरिक हालचाली थोड्या थोड्या वेळाने सतत होत आहेत ना याची दक्षता मात्र घेतली पाहिजे एकाच ठिकाणी खूप वेळ न बसता मध्ये मध्ये उठून थोडसं चाललं किंवा आपले हात पाय थोडे स्ट्रेच केले तर ते आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त आहे.

 

walking-elderly-inmarathi
welthuis.nl

 

आठवड्यातून किमान तीन दिवस तरी योगा आणि रोज एक तास चालणं केलं पाहिजे. चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे पण आपल्या शरीरात थकवा जाणवतो.

कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसात जर तुम्हाला तणावाचा सामना करावा लागत किंवा कामाचं प्रेशर खूप असेल तर तुमच्या बॉसशी किंवा संबंधित व्यक्तीशी बोलून ताण हलका करायचा प्रयत्न करायला हवा.

मानसिक कारण

 

stress inmarathi

 

माणूस बऱ्याचदा स्वतःहूनच, पुढे जायच्या स्पर्धेतून टेन्शन आणि स्ट्रेस घेतो. आणि मग डिप्रेशन, थकवा या सगळ्याचा सामना करतो. हे सगळं कमी करायचं असेल तर काही relaxation techniques शिकली पाहिजेत.

खूपचं टेन्शन असेल तर एखाद्या कौन्सेलरचा सल्ला घ्यावा.

योगाभ्यासातील प्राणायाम शिकून घ्यावा. श्वासाचा नीट अभ्यास केला पाहिजे. खूप थकवा जाणवतोय असं वाटलं तर ठरवून किमान दहा वेळा तरी दीर्घश्वसन केलं पाहिजे. दीर्घ श्वसनचा खूप फायदा होतो.

 

meditation inmarathi

 

सोशल मीडिया वर वेळ घालवणे, टीव्ही वरच्या बातम्या, निरर्थक debate पाहण्यापेक्षा तो वेळ घरातल्या माणसांबरोबर व्यतीत करावा.

आपला एखादा छंद जोपासणं केव्हाही चांगलं

 

music-stress-reliever-inmarathi
amo.org.au

 

कधीकधी आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्यावा म्हणजे पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे, कधी गाणी लावून नाचणे, बागेत काम करणे त्यामुळेसुद्धा आपल्याला ताजंतवानं वाटू शकतं.

कधी मित्रमंडळींबरोबर घालवलेला वेळ आणि फुटलेले हसू यामुळे पण आपली ऊर्जा वाढते. पण कधीकधी कुणाला काही असलेल्या आजारामुळे पण डिप्रेशन, थकवा जाणवू शकतो त्यावेळेस योग्य वैद्यकीय सल्ला घेणे सर्वोत्तम.

चला तर मग आनंदी राहण्यासाठी आहार, विहार खाद्य, व्यायाम यांचा योग्य मेळ घालून जीवन जगू या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?