' खूप प्रयत्न करूनही वजन वाढत नाहीये? हे सोपे उपाय करा आणि वजन वाढवा

खूप प्रयत्न करूनही वजन वाढत नाहीये? हे सोपे उपाय करा आणि वजन वाढवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

संपूर्ण जगामध्ये वजन कमी असणे ही एक फार मोठी समस्या आहे. आपल्याकडेदेखील खूप मोठी लोकसंख्या अशी आहे जिचं वजन सरासरी वजनापेक्षा कमी आहे आणि मेडिकल भाषेत याला ‘अंडरवेट’ असं म्हणतात.

संपूर्ण जगामध्ये ही समस्या सध्या आढळून येत आहे त्यामुळेच की काय आपल्या टीव्हीवर देखील दिवसातून दोन वेळेस वजन वाढवण्यासाठी गोळ्यांची आणि उत्पादनांची जाहिरात मोठ्या प्रमाणावरती दाखवण्यात येते.

 

bmi inmarathi

 

रुढार्थाने आपल्याकडे असं म्हटलं जातं की वजन कमी असणं हे वजन जास्त असण्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे, पण खरं पाहिल्यास शारीरिक दृष्ट्या वजन कमी असणं हे देखील हानिकारकच आहे आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

तुम्ही ‘बी. एम. आय.’ या प्रसिद्ध पद्धतीने स्वतःच्या वजनाचा अंदाज घेऊ शकता ही पद्धत आजकाल इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला फक्त वजन, उंची, वय आणि लिंग इत्यादी माहिती भरावी लागते आणि जर तुमचा बीएमआय 18.5 पेक्षा कमी असेल तर लक्षात घ्या तुम्ही अंडरवेट आहात.

तुम्ही यामध्ये तुमच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊ शकता. आज देखील अनेक जण स्वतःचं वजन वाढवण्याचा खात्रीशीर पर्याय शोधत असतील. वजन बिनदिक्कतपणे वाढेल असे काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

१. दूध

 

contaminated-milk-inmarathi
lovindublin.com

 

दूध वजन वाढवण्यासाठी अमृत म्हणून पाहिलं जातं. दुधामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स असतात. दुधामुळे तुमची हाडंदेखील बळकट होतात. व्यायाम केल्यानंतर दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत.

दुधामध्ये फॅट, कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन यांचं मिश्रण असतं. दुधामुळे तुम्हाला मुबलक प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स देखील मिळतात, ज्यांना वजन वाढवायचं आहे आणि फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी इतर उत्पादनांपेक्षा दूध नक्कीच किफायतशीर ठरेल.

 

२. प्रोटीन शेक

 

protein shake inmarathi
eat this, not that

 

आज-काल बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन शेक उपलब्ध आहेत. प्रोटीन शेक मुळे वजन वाढवण्यास मदत होते. एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की काही शेकमध्ये साखर प्रमाणापेक्षा जास्त असते. अशाप्रकारचे शेक घेण्याआधी नक्की विचार करावा.

प्रोटीन शेक आज-काल ऑनलाइन देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या तब्येतीसाठी योग्य प्रोटीन शेक कुठला आहे याबद्दल नक्कीच विचारणा करावी.

 

३. भात

 

making rice-inmarathi
fifteenspatulas.com

 

एक वाटी भात आपल्या शरीरामध्ये 200 कॅलरीज उत्पन्न करतो. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी भात हा उत्तम पर्याय आहे. त्यासोबतच भात कार्बोहायड्रेटसाठी देखील एक उत्तम स्रोत आहे.

 

४. मांस

 

salmon-fish-inmarathi
bettycrocker.com

 

मांसाहारी लोकांसाठी हा फारच लज्जतदार पर्याय आहे कारण मांसामध्ये अनेक घटक आहेत ज्यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. यामध्ये न्यूट्रिशनचे प्रमाण इतर अन्नपदार्थापेक्षा जास्त असतं.

एका संशोधनाअंती आढळले आहे की, ज्या व्यक्ती वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये मांसाहार घेतात त्यांचं वजन इतर व्यक्तींपेक्षा लवकर वाढतं. त्यामुळे जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर वजन वाढविण्यासाठी मांसाहार हा सर्वात चांगला उपाय आहे.

 

५. ड्रायफ्रूट्स

 

dry-fruits InMarathi

 

आपल्या दैनंदिन आहारामध्ये ड्रायफ्रूट्स वापर करणे एक चांगली गोष्ट आहे. फक्त वजन वाढविण्यासाठीच नव्हे तर इतरही वेळी ड्रायफ्रुट्स आहारामध्ये वापरायला हवेत. वजन वाढविण्यासाठी तर ड्रायफ्रुट्सची मदतच होते मात्र ड्रायफ्रूट्स अशी वस्तू आहे जी आपण कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरू शकतो.

अनेक प्रकारचे पदार्थ आणि सॅलड आपण ड्रायफ्रूट च्या मदतीने तयार करू शकतो.

 

६. स्निग्ध पदार्थ

 

fat food inmarathi

 

स्निग्ध पदार्थ वजन वाढविण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांचा आहारात वापर असणे वजन वाढविण्यासाठी गरजेचे आहे. या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील कॅलरीजच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

कॅलरीज वाढविण्यासोबतच या पदार्थांमधून तुम्हाला ग्लुकोज देखील मुबलक प्रमाणात मिळते. शरीरामध्ये ग्लुकोज ग्लुकोजजेलच्या स्वरूपात तयार केले जाते, ज्यामुळे आपल्याला व्यायाम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होत राहते. अशा पदार्थांचा आहारामध्ये वापर करणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे.

 

या पदार्थांची यादी खाली दिलेली आहे: 

१. बटाटे
२. मका
३. ओट्स
४. रताळे
५. पास्ता, इतर.

 

७. प्रोटीन सप्लीमेंट

 

protein supplements inmarathi
times of india

 

आज-काल बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन सप्लीमेंट मोठ्या प्रमाणावर ती उपलब्ध आहेत. ज्या धावपटूंना आपले वजन वाढवायचे असते असे धावपटू या प्रोटीन सप्लीमेंटचा वापर करतात.

याच्या वापरामुळे तुमचे वजन तर वाढतेच पण तुमचे मसल देखील वाढतात, पण हे घेण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

८. डार्क चॉकलेट

 

Dark-Chocolate-inmarathi
stylecraze.com

 

डार्क चॉकलेटमध्ये अनेक प्रकारचे हेल्दी फॅट्स उपलब्ध असतात, यामध्ये अॅटीऑक्सीडेंट देखील असतात. ज्या व्यक्तीला आपले वजन वाढवायचे असेल त्याने कोकोआ घटक असणारे डार्क चॉकलेटचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करावा.

चॉकलेटच्या वापरामुळे तुमचे वजनात ७० टक्क्यांनी वाढ होऊ शकते असे संशोधनाअंती आढळले आहे. डार्क चॉकलेट आजकाल ऑनलाईन मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत. डॉक्टरांचा सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता.

 

९. प्रोटीन बार

 

protein bars inmarathi
wiki

 

आजकाल प्रत्येक सेलिब्रिटी या प्रोटीन बारचा वापर करताना आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये होल ग्रेन, नट्स आणि फळांचा वापर केलेला असतो. अनेक प्रोटीन बारमध्ये साखर प्रमाणापेक्षा जास्त असते अशावेळी चिकित्सक होऊन प्रोटीन बार निवडावे.

कमी साखरेचे अनेक प्रोटीन बार ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार त्यांचा आहारामध्ये समावेश करावा.

 

१०. अंडी

 

eggs-inmarathi02
livestrong.com

 

अंड्यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट आणि इतर अनेक न्यूट्रीयन्स्ट असतात ज्यांचा आपण आहारामध्ये नक्कीच समावेश करावा. ज्या व्यक्तीला आपले वजन वाढवायचे असेल त्याने आपल्या आहारामध्ये अंड्यांचा समावेश नक्कीच करावा.

 

११. तूप

 

ghee inmarathi
medical news today

 

आपल्याकडे असे मानले जाते तुपामुळे वजन वाढविण्यास मदत होते. हे खरे देखील आहे.  रोजच्या आहारामध्ये दोन चमचे तुपाचा समावेश केल्यामुळे तुमचे वजन नक्कीच वाढेल, कारण या तुपाच्या आहारामुळे तुम्ही जवळपास १२० कॅलरीज रोज शरीरामध्ये वाढवत आहात.

 

१२. लोणी

 

loni inmarathi

 

लोणी हेल्दी फॅट, प्रोटीन तसेच कॅल्शियम आणि कॅलरीजचा एक उत्तम स्रोत आहे. आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा वापर केल्यामुळे वजन वाढविण्यास नक्कीच मदत होते.

 

१३. दही

 

curd inmarathi

 

दहीदेखील तुमचे वजन वाढविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. अगदी साधे दही वापरावे कारण इतर दह्याच्या उत्पादनांमध्ये साखर अत्यंत जास्त प्रमाणात वापरलेली असते. जी तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते.

तुम्ही दह्यासोबत फळ आणि इतर ड्रायफ्रुट्सचा वापर देखील आहारामध्ये करू शकता.

हे आहेत ते पदार्थ ज्यांचा आहारामध्ये समावेश करून तुम्ही तुमचं वजन सुरक्षित पद्धतीने वाढवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?