' मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत

मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताचा मध्यकालीन इतिहास हा मुघल साम्राज्याचा इतिहास आहे.

१६ वं शतक ते १८ वं शतक या कालखंडात मुघलांनी राज्य केलं. त्यांचा राजकीय इतिहास, त्यांच्या लढाया सगळ्यांना माहीत आहेत. पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल विशेषतः त्यांच्या आयुष्यातील बायका, मुली यांच्याबद्दल फारसं माहीत नाही.

 

 

म्हणजे एखादी नूरजहान, जोधाबाई माहीत असते. पण बादशहाच्या मुली कशा असतील, त्यांचं आयुष्य कसं होतं याविषयी फार कमी माहिती आहे.
आता बादशहाच्या मुली म्हणजे सगळी सुखं असणारच. पण या दिसायला सुंदर, दागदागिन्यांनी मढलेल्या, अत्तर खसच्या सुगंधात राहणाऱ्या, उंची वस्त्रे घालणाऱ्या या मुलींच्या आयुष्यात एक कमतरता कायम होती. त्यांचे काजळ घातलेले सुंदर डोळे नीरस भासत. त्याचं कारण म्हणजे त्यांचं लग्न.

त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सोडा, पण लग्न न करताच राहावं लागत असे. आणि लग्न झालं तरी ते फक्त जवळच्या नातलगातच करावं लागतं.
असं म्हणतात की, अकबर बादशहाने ही प्रथा सुरू केली. अर्थात याबद्दल कुठेही काही पुरावा नाही,

 

==

हे ही वाचा : ही आहे मुघलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफरची ६वी पिढी!

==

म्हणजे अकबरनामा, जहांगीरनामा, शहाजहाननामा,औरंगजेबाची बखर यात याबाबत कुठलाही उल्लेख नाही…मग हे मिथक आलं कुठून ? एकतर ही एक अफवा असेल किंवा त्या मुलींच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा असा अर्थ घेतला गेला असेल..

पण सगळ्याच मुली लग्न न करता राहिल्या नाहीत, ज्यांची लग्नं झाली ती मात्र आपल्या जवळच्या नातलगांमध्ये,

खरं सांगायचं तर रक्तसंबंधामध्ये….चुलत, सावत्र अशाच संबंधांमध्ये.
इस्लाममध्ये बहुपत्नीत्त्वाला मान्यता असल्यामुळे अकबर बादशहाची पण बरीचं लग्न झालीत. त्यात त्याच्या दोन पत्नी रुकाया बेगम आणि सलिमा बेगम या त्याच्या चुलत बहिणीचं होत्या.

 

 

बाकी अकबर बादशहाने हिंदू राजकन्या जोधाबाईशी सुद्धा लग्न केले. अकबर बादशहाच्या ज्या मुली होत्या त्यांची लग्न झाली, पण एका मुलीचं आरम बानूचं मात्र लग्न झाल नाही. ती आपल्या भावाकडे म्हणजेच जहांगीरकडे त्याच्या मृत्यूपर्यंत राहिली.

अकबरानंतर आलेला जहांगीरचा पण असाच इतिहास आहे. त्याच्या तीन बायका या त्याच्या चुलत बहिणीचं होत्या.

त्याच्या मुलींपैकी एक सुलताना निसाबेगमचं लग्न झालं नाही, कारण जहांगीरचे लहान भाऊ दानियल आणि मुरादची मुलं हिच्यापेक्षा वयाने खूप लहान होती.

निसाबेगम ही नूरजहानची सावत्र मुलगी. असं म्हणतात की नूरजहाँने हिला खूप त्रास दिला, कारण हिचा सख्खा भाऊ खुसरूने जहांगीरविरुद्ध बंड पुकारले होते.नंतर जहांगीरने खुसरू आणि त्याच्या बेगमला नजरकैदेत ठेवल्यावर त्याच्या मुलांचा सांभाळ निसाबेगमनेच केला होता

.

 

जहांगीरच्या धाकट्या मुलीचं लग्न दानियलच्या मुलाबरोबर झाला. त्यांचा संसार तसा सुखाचा झाला, पण नंतर त्याला जहांगीरने मारलं. म्हणून तिने अशी इच्छा व्यक्त केली की तिची कबर जहांगीरच्या जवळ न ठेवता आजोबा अकबर बादशहाच्या कबरीजवळ असावी. आणि तशी ती आहे सिकंदराबाद येथे.

==

हे ही वाचा : मुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या या लढाईचा रक्तरंजित इतिहास अंगावर रोमांच उभे करतो

==

जहांगीर बादशहा नंतर आलेल्या शहाजहानच्या मुलींची म्हणजे रोशन आरा आणि आलम आरा यांची लग्न झाली नाहीत. याच कारण म्हणजे जहांगीरने आपल्याला कोणी शत्रू निर्माण होऊ नये म्हणून आपल्या सगळ्या भावांना, त्यांच्या मुलांना, नातवडांना मारून टाकलं. त्याच्या सगळ्या सावत्र भावांना संपवलं. त्यामुळे त्यांना लग्नासाठी योग्य मुलगा उरलाच नाही.

नंतर आलेल्या औरंगजेबाच्या मुलींची पण लग्नं त्याच्या भावाच्या मुलांशीच झाली. आणि मुघल सल्तनतमध्ये ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू राहीली. आणि अकबराने ही प्रथा सुरू केली हा समज दृढ झाला.

 

 

थोडक्यात काय तर या बादशहांच्या काही मुलींची लग्नं झाली नाहीत तर काहींची आपल्याच घरातील नातेसंबंधात झाली…याचं कारण काय असेल ? यांच्या योग्य जोडीदार मिळत नव्हते का ? अकबराने असा नियम का केला असेल ?

तर तसं नव्हतं ,एकतर अकबराला त्याच्या मेव्हण्याने आणि जावयाने त्याच्याविरुद्ध केलेलं बंड मोडून काढावे लागले होते.

आपल्याच घरात असं शत्रुत्व निर्माण होतंय ते केवळ हिंदूस्थानचा आलमगीर होण्याच्या इच्छेतून, हे कळून त्याने असा निर्णय घेतला असावा. कारण अकबराचा मेव्हणा आणि जावई हे काही त्याचे जवळचे नातेवाईक नव्हते.

बाहेरून आलेली ही माणसं सत्तेसाठी काहीही करतील म्हणून असा निर्णय घेतला गेला असावा. घरातच शत्रुत्व निर्माण होऊ नये म्हणून मुळापासून कारणचं उखडून टाकायचं ठरवले गेले असेल.

 

मुघलांचं एक होतं की काहीही झालं तरी साम्राज्य आपल्याकडेच राहिलं पाहिजे. मग तो जावई असला तरी आपल्याच नात्यातला म्हणजे रक्तसंबधातला असावा.
आणखी एक कारण होते ते म्हणजे, हे पडले सम्राट, यांच्या तोडीचा नातेसंबंध यांना मिळणं कठीण. आताच्या भाषेत सांगायचं तर स्टेटस ला सुट होणारा मिळणं कठीण.

आणि आपल्या मुलींनी आणि बहिणींनी आपल्यापेक्षा खालच्या स्तरातील लोकांशी लग्न करणं त्यांना कमीपणा देणारं होतं.
तिसरं म्हणजे हे बादशहा स्वतः हिंदू राजकन्येबरोबर लग्न करायचे. पण आपल्या बहिणी, मुली यांचं लग्न हिंदू राजपुत्राबरोबर त्यांना मान्य नव्हतं.

एकतर धर्माचा, धर्मांतराचा प्रश्न होता आणि हिंदू धर्मातील सती प्रथा, विधवेच जगणं अशा प्रथा. आणि हिंदू धर्मात विधवेला कोणत्याही प्रकारचे अधिकार नसत. पण मुघल साम्राज्यात हमीदाबानू पतीच्या निधनानंतरही मलिका ए आझम बनली.

==

हे ही वाचा : महाराणी ताराबाई : औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळविणारी मर्दानी!

==

 

तिला तिचा मान मिळाला..त्यामुळं मुघल राजकन्यांना, आपल्याच घरातील जवळच्या नातेवाईकाशी लग्न करणे किंवा लग्नच न करणे असे पर्याय होते.

पण या सगळ्यात त्या मुलींची मात्र होरपळ झाली. आपल्या वडील, भाऊ यांच्या महत्वाकांक्षेपायी यांना मनासारखं जगता आलं नाही हे मात्र खरं…राजकन्या म्हणून जन्माला आलेल्या पण राणी म्हणून मरणं मात्र त्यांच्या नशिबात नव्हतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?