' नविन वर्षाचा संकल्प यंदा तरी पुर्ण करायचा असेल, तर हा खात्रीशीर उपाय निवडा

नविन वर्षाचा संकल्प यंदा तरी पुर्ण करायचा असेल, तर हा खात्रीशीर उपाय निवडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दरवर्षीप्रमाणे याही नवीन वर्षाला आपण नक्कीच काहीतरी संकल्प केला असेल.

 

the indian express

 

उदाहरणार्थ, कोणी तर नक्कीच संकल्प केला असेल की या वर्षात मी वजन नक्कीच कमी करेन. पण लगेच शेजाऱ्यांनी आणलेल्या केकमुळे तो संकल्प पूर्ण झाला नाही, मग मग काय दिवसभर देखील हा संकल्प टिकू शकला नाही.

“करूया पुढच्यावर्षी पुन्हा प्रयत्न असंच होतं नेहमी” त्यामुळे आपण या वरती काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.

 

IHIRE

 

जर संकल्प टिकला नाही तर लगेच पुढच्या पुढच्या वर्षीची वाट बघायची काय गरज?

कदाचित तुम्ही तुमचा संकल्प पुढच्या सोमवारी परत सुरु करू शकाल आणि जर तुम्ही परत संकल्प सांभाळण्यात अपयशी ठरलं तर पुढचा सोमवार आहेच की! पुढच्या काही दिवसात तुम्हाला परत तुमचा संकल्प निष्ठेने पाळण्याची संधी प्राप्त होणार आहे.

या पद्धतीला ” आरोग्यदायी सोमवार ” असं म्हणतात. या संकल्पनेमुळे संपूर्ण आठवडाभरासाठी तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता छान आहे की नाही कल्पना. जाणुन घेऊयात ह्या कल्पनेबद्दल अधिक विस्ताराने.

 

youtube.com

 

रॉन हर्नांडीझ जे “आरोग्यदायी सोमवार” या संकल्पनेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते या संकल्पनेबद्दल सांगताना म्हणतात, ” नागरिकांनी त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा ही आमची खरी अपेक्षा आहे.

तुम्ही नवीन वर्षाचा संकल्पाबद्दल विचार करत असाल तेव्हा तुम्ही फक्त एकाच दिवसाचा विचार करता, याचा अर्थ वर्षातून फक्त एक दिवस आणि जर तुम्ही तुमच्या संकल्पात अपयशी ठरलात तर तुम्ही पुढच्याच वर्षीचा विचार करू लागता पण, जर हा संकल्प आठवड्यानुसार ठरवण्यात आला तर तुमच्याकडे एका वर्षात 52 संधी असतील.

 

HealthcomU

 

या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी जर एखादा आठवडा तुमच्या कडुन संकल्प पाळण्यात नाही आला तर पुढील सर्व आठवडे तुम्ही नक्कीच संकल्प पाळाल आणि तुमच्यात बदल घडवण्यासाठी तुम्हाला वर्षभर वाट बघण्याची गरज नाही.

असा विचार करा की या सोमवारी तुम्ही तुमच्यात काही सकारात्मक बदल घडवाल.”

या आरोग्यदायी सोमवार संकल्पनेवर जोन्स हॉकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ च्या मदतीने एक संशोधन करण्यात आले.

 

hsph.edu

 

या संशोधनाअंती असे निष्पन्न झाले की बरीच लोकं सोमवारी आरोग्य विषयक माहिती अधिक प्रमाणात जाणून घेताना आढळून येतात. या संशोधनानुसार जर तुम्ही आठवड्याची सुरुवात प्रसन्नतेने केलीत तर  संपूर्ण आठवडा तुम्ही प्रफुल्लित रहाल आणि या सर्वांचा परिणाम तुमच्या कामावरती झालेला नक्कीच दिसेल.

“आरोग्यदायी सोमवार” मार्फत नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये 1000 प्रौढ व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आलं.

त्यातील फक्त काहीजणांचं म्हणणं होतं की ते नवीन वर्षाचा संकल्प वर्षभर पाळु शकतात. त्यातील बाकी वीस टक्के लोकं फक्त दोनच आठवडे हा संकल्प पाळु शकली आणि काहीजण मात्र संकल्प सुरू करूनही त्याचे जलद फायदे होत नसल्याने त्यांनी संकल्प सोडून दिला

 

enterpreneur

 

आणि यातील एक फार मोठा वर्ग असे सांगत होता की प्रत्येक सोमवारी आपला संकल्प परत चालू करण्याची ही संकल्पना त्यांना पटली आहे आणि ते ही संकल्पना नक्कीच वापरू इच्छितात. जेणेकरून त्यांना त्यांचा संकल्प पूर्ण करण्यात मदत होईल.

आपल्यापैकी कोणालाही ही संकल्पना नक्कीच आवडेल. समंथा हेलर ज्या ” न्यू न्यूयॉर्क ” शहरात एक डायटीशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना देखील ही कल्पना खूपच आवडली.

आठवडाभरासाठी आपण कुठलं तरी ध्येय ठरवतो ही गोष्ट त्यांच्यासाठी कौतुकास्पद होती. आपल्याला आठवडाभरात आपले ध्येय साध्य करायचे असल्यामुळे आपण ते अधिक तत्परतेने साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो असे समंथा यांना वाटतं.

 

facebook.com

 

त्या म्हणतात,” ही कमी काळातील ध्येयं अधिक वास्तववादी असतात. ती ध्येयं साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत नाहीत आणि त्यासाठी वर्षभर वाट देखील बघावी लागत नाही. या पद्धतीमुळे तुम्ही तुमचं आठवडाभराच टाईम टेबल तयार करू शकता.

अगदी महत्त्वाच्या गोष्टींचं, अगदी लहान-लहान गोष्टींचं देखील आणि यामुळे त्या गोष्टी साध्य करणे जास्त सोपे जाईल.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आठवडाभराच्या आहाराचे नियोजन केले तर आठवडाभर हे नियोजन सांभाळणे एका व्यक्तीसाठी नक्कीच कठीण काम नाही.”

कदाचित असेही घडू शकते की तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत या आठवड्यामध्ये पोचू शकला नाहीत. अशावेळी तुम्ही मागच्या आठवड्याचा आढावा घेऊन काही गोष्टींवर अंकुश आणू शकता.

 

 

जेणेकरून तुमचा पुढचा आठवडा मात्र अगदी तुमच्या नियोजनाप्रमाणे व्यतीत होईल.

जर तुम्ही एखाद्या आठवड्यात तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर हरकत नाही तुम्ही कुठे कमी पडलात या गोष्टीचा विचार करावा.

पुढच्या आठवड्यासाठी मात्र पुन्हा उभारी घ्यावी. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशाच्या काळामध्ये स्वतःला समजून घ्यावं नाहीतर संपूर्ण संकल्पच कोसळण्याची दाट शक्यता असते.

परिवर्तन ही कालांतराने घडणारी गोष्ट असते, परिवर्तन कधीच जलद गतीने घडत नाही. हळू-हळू तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला दिसत जाईल. तुम्हाला तुमच्यातील बदल जाणवतील पण यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देणं गरजेचं असतं.

 

power of change.com

 

प्रत्येक आठवड्याची सुरुवात ही आपल्याला खूपच बोरिंग वाटू लागते याचं कारण म्हणजे आजच्या या धकाधकीच्या युगात आपली असणारी दिनचर्या होय. उद्या जर सोमवार असेल तर रविवारी रात्रीपासूनच आपल्याला आळस येऊ लागतो आणि मग या मुळे आठवड्याची सुरुवात ही खूपच निराशाजनक होते

आणि यामुळे आपल्या आठवडाही फलदायी ठरत नाही. हे सर्व चक्र मोडण्यासाठी वर दिलेले उपाय तुम्ही नक्की करून बघायला हवेत, प्रत्येकाला याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?