' विजेचं बिल पाहून घाम फुटतोय? वाचा वीज बिल कमी करण्याच्या परफेक्ट १३ टिप्स! – InMarathi

विजेचं बिल पाहून घाम फुटतोय? वाचा वीज बिल कमी करण्याच्या परफेक्ट १३ टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सामान्य व्यक्ती म्हटली की काटकसर ही येतेच, पण सध्याच्या फास्ट जगात आणि सोयीसुविधा वापरायच्या म्हटल्या की त्या काटकसरीकडे कानाडोळा करावा लागतो.

नाही म्हटलं तरी एका मध्यमवर्गीय घरात टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी, ३-४ मोबाईल फोन (फास्ट चार्जिंग वाले), इस्त्री, गिझर असतातच असतात आणि ही उपकरणे वापरायची म्हणजे तेवढाच विजेचा वापर सुद्धा येतो.

 

light bill inmarathi

 

आता महानगर म्हटल्यावर प्रति युनिट चार्ज पण त्याच हिशोबाने बसतो आणि एकूणच या सगळ्याचा भुर्दंड बसतो तो थेट खिश्यावर!

तर आपल्या काही छोट्या छोट्या कृतीने विजेचं बिल कसं कमी करता येईल याच्या ट्रिक्स, खास तुमच्यासाठी!

१. जनरल ट्यूबलाईट-बल्ब ऐवजी सिएफएल-एलइडीचा वापर :

 

led bulb inmarathi

 

सीएफएल किंवा एलडी नव्याने बाजारात आले तेव्हा भरपूर महाग होते. नंतर सरकारी अनुदान, वाढलेलं उत्पादन यामुळे त्यांच्या किमती आवाक्यात आल्या. सीएफएल-एलईडी सध्या ट्यूब/बल्ब पेक्षा २० ते ३०% वीज कमी घेते.

२. ट्यूब,बल्ब यावर बसलेली धूळ वेळोवेळी साफ करणं :

धूळ खात पडलेली प्रकाश देणारी उपकरणे त्यांच्या नॉर्मल वीज वापरापेक्षा ५०% वीज जास्त घेते. वेळोवेळी साफ करून उपकरणांची लाईफ देखील वाढेल आणि अकारण वीज वापर पण टळेल.

३. उपकरणांची देखभाल :

घरात जर एसी, वॉशिंग मशीन, फ्रीजसारखे इलेक्ट्रिक मोटर बेस उपकरणं असतील तर त्यांचं वेळोवेळी सर्व्हिसिंग करावे. अतिरिक्त लोडमुळे मोटरची वर्किंग एफीशीऐंसी कमी होते. ज्याचा फरक थेट वीज वापरावर पडतो.

 

ac service inmarathi

४. सेंट्रल एसीचा पर्याय बघा :

नवीन एसी बसवायचा विचार करत असाल तर सेंट्रलाईज एसीचा पर्याय निवडावा. खर्चिक सौदा असतो पण सामान्य एसीच्या मानाने सेंट्रलाईज एसी खोली थंड लवकर करते.

५. एसीचं तापमान २४° वर नियमित ठेवायचा प्रयत्न करावा :

जेवढं तापमान आपण कमी करू तेवढा एसीच्या कम्प्रेसरवर लोड येतो. परिणामी विजेचा वापर तिथे जास्त होतो. तसंही सरकार बाजारात नव्याने येणाऱ्या एसीचं तापमान २४° कॉन्स्टंट ठेवायच्या विचारात आहेच.

६. फ्रीजच्या दरवाज्याला असणारे रबर सील व्यवस्थित घट्ट असावी याची काळजी घ्यावी :

 

fridge rubber inmarathi

 

फ्रीजला असणारी कॉइल वेळोवेळी साफ करावी. कमीतकमी दोन महिन्यातून एकदा त्याच्यातून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

७. मोबाईल/लॅपटॉप यांचा वापर चार्जिंगला लावून टाळावा :

चार्जिंग – ड्रेनिंग या दोन्ही प्रोसेस एकाच वेळी तिथे होत असतात. यात बॅटरी ड्रेनिंगची प्रोसेस वेगात होत असते. मोबाईल/लॅपटॉपची बॅटरी यामुळे खराब होण्याची शक्यता देखील जास्त असते.

८. योग्य फॅनची निवड :

 

smart fans inmarathi

 

बाजारात सध्या स्मार्ट फॅन उपलब्ध आहेत. जिथे सामान्य फॅन फुल्ल स्पीडमध्ये चालताना ४५ वॅट वीज कंज्युम करतो तिथे स्मार्ट फॅन फक्त २८ वॅट घेते. थोडे महाग असतात पण लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट आहे.

९. सोलर एनर्जीचा वापर :

हा महाग पर्याय आहे, पण सरकारसुद्धा पुढाकार घेऊन त्यासाठी सबसिडी देत आहे. एकदा का सोलर सिस्टीम इन्स्टॉल केली की निदान १५ वर्ष तरी स्वछ ऊर्जेचा मोकळा सोर्स वापरायला उपलब्ध होईल.

 

solar energy inmarathi

१३.अपव्यय टाळा :

गरज असेल तेव्हाच उपकरणे वापरावी आणि शक्य होईल तेवढा विजेचा अपव्यय टाळावा.

थोडी काळजी, थोडी स्मार्ट चॉईस याने आपण विजेचा होणारा अतिरिक्त वापर टाळू शकतो. पर्यायाने वाढीव लाईटबिलावर पण नियंत्रण येईल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?