' समाजात यशस्वीरित्या वावरणारे लोक या ७ गोष्टींचे काळजीपूर्वक भान राखतात!

समाजात यशस्वीरित्या वावरणारे लोक या ७ गोष्टींचे काळजीपूर्वक भान राखतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपण इतरांशी कसे वागतो यावर आपले सामाजिक आयुष्य अवलंबून असते. सर्वांमध्ये मिसळून राहणारी, प्रत्येकाचा आदर करणारी व्यक्तीच आजच्या सामाजिक आयुष्यामध्ये यशस्वीपणे वावरू शकते आणि अशाच व्यक्ती सर्वांना हवीहवीशी असते.

जेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींमध्ये मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे आणि समोरच्या व्यक्तीला अपेक्षित विषय आपण मांडतो आहोत का या सर्व घटकांवर तुमचं सोशल लाइफ अवलंबून आहे.

 

socialising inmarathi
istockphoto.com

 

चला तर मग या लेखामध्ये जाणून घेऊयात सोशल वातावरणात यशस्वीपणे वावरणारे लोक अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतात त्यामुळे ते यशस्वी ठरतात.

१. तुमचा श्रोता समजून घ्या :

 

good listner inmarathi
wikihow.com

 

श्रोता म्हणजे फक्त भाषणावेळी जाणून घ्यायची बाब नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्येदेखील या घटकाची नितांत काळजी घेतली गेली पाहिजे. तुम्ही कोणासोबत आहात या गोष्टीचे भान तुम्हाला नेहमीच असायलाच हवे.

उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्‍यांसोबत असता तेव्हा त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे वागणूक देता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे सोबत असता तेव्हा त्यांच्याशी अदबीने आणि आदराने वागता या वागणुकीतील फरकाची जाणीव तुम्हाला इतरांपासून वेगळी प्रतिमा तयार करण्यास मदत करते.

२. इतरांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करा :

ही बाब तुम्हाला नवीन वातावरणामध्ये स्थायिक होण्यासाठी नक्कीच मदत करेल. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा नवीन नौकरी चालू करता किंवा नवीन सोशल सर्कलमध्ये जाता तेव्हा या गोष्टीचा आधारेच तुम्ही इतरांसोबत चांगले संबंध ठेवू शकाल.

३. नवीन अनुभवांसाठी आणि व्यक्तींसाठी नेहमी तयार रहा :

 

challenges inmarathi

 

ही बाब तरुण व्यक्तींसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. मुख्यतः जेव्हा तुम्ही नवीन संस्कृतीमध्ये जाता तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला खटकू शकतात तेव्हा, सुरुवातीला या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. नवीन ठिकाणी कदाचित तुमच्यापेक्षा जास्त समंजस आणि क्षमता असलेली व्यक्ती आजूबाजूला वावरत असू शकते.

त्यामुळे प्रत्येकाशी विनयशीलतेने संवाद साधा, प्रत्येकाचा आदर ठेवा. कदाचित सुरुवात कठीण जाईल पण विनयशीलता या परिस्थितीत सर्वात महत्वाचे शस्त्र आहे आणि अशा वावरामुळे तुम्हाला नवीन गोष्टी अधिक प्रभावीपणे शिकण्यास मदत होईल.

४. कुठल्याही समूहाला उद्देशून वक्तव्य टाळावे :

 

hate speech inmarathi

 

आपण सोशल लाईफमध्ये जगताना नेहमी संयम बाळगायला हवा त्याहीपुढे कुठल्याही घटकाबद्दल किंवा समुहाबद्दल टिपणी करणे किंवा त्यांना उद्देशून काही बोलणे या गोष्टी टाळण्याची एका बुद्धीमान माणसाला नितांत गरज असते.

कारण अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात एका समूहाचा रोष स्वतःवरती ओढून घेऊ शकता.

५. तुमच्यातील सामाजिक संवेदनशीलता जपा :

 

sensitivty inmarathi

 

याबाबतीत मात्र तुम्ही अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे कारण या त्या गोष्टी असतात ज्यांची तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता. या गोष्टींमुळे अनेक वेळी व्यक्तीबद्दल आकस निर्माण होण्यास मदत होते.

उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कामात खूपच व्यस्त आहात आणि तुमचा एखादा सहकारी तुम्हाला काही बोलण्याचा प्रयत्न करतोय अशावेळी तुम्ही त्याला उत्तर दिल्यानंतरही तो तुमच्याशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल तर, त्याने त्याच्या सामाजिक संवेदना वर काम करण्याची आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.

याच गोष्टी आपणही पाळाव्यात जेणेकरून आपली प्रतिमा ही स्वच्छ राहील.

६. दैनंदिन आचरणामध्ये आदर व्यक्त करणाऱ्या शब्दांचा वापर करा :

 

social manners inmarathi

 

आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये आपण एकमेकांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा आदर आपण नेहमीच शब्दांमध्ये व्यक्त करत असतो. कुठलीही मदत केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणणे म्हणजेच त्याने केलेल्या मदतीबद्दल आपण आदर व्यक्त करणे होय.

अशा आदर व्यक्त करण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत होते.

७. इतरांच्या आनंदामध्ये आनंद शोधणे :

 

learn to be happy inmarathi

 

सामाजिक आयुष्यामध्ये वावरताना अनेक वेळी असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा व्यक्ती खूप आनंदी असतो आणि तुम्ही कदाचित त्याक्षणी दुःखी असाल.

अशावेळी त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद शोधणे हे आपले कर्तव्य आहे आणि हा आनंद त्याच्यासाठी शब्दांमध्ये नक्की व्यक्त करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?