' उत्पन्न कमी असो वा अधिक, तुमच्या उत्तम आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचे ५ प्रकार! – InMarathi

उत्पन्न कमी असो वा अधिक, तुमच्या उत्तम आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचे ५ प्रकार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

फास्टफूड प्रमाणेच या फास्ट लाईफस्टाईलच्या नादात सध्याची तरुण पिढी कुठेतरी अतिशय कृत्रिम आयुष्य जगत असल्याची टिका केली जाते, पण स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल, तर  नव्या जीवनशैलीपासून दूर जाणं शक्य नाही हे देखील तितकंच खरं आहे.

 

 

मल्टिनॅशनल कंपनी मध्ये नोकरी, उंची हॉटेलात होणाऱ्या पार्ट्या, मॉल संस्कृती आणि महिन्यातून एक विकेंड तरी बाहेर फिरणं यामुळे गलेलठ्ठ पगार असून सुद्धा या भरमसाट खर्चात सेव्हिंग न होणं हा या तरुण पिढीसमोर उभा राहिलेला एक गहन प्रश्न आहे,

पण या प्रोब्लेम्सवर उपाय सुद्धा आपल्या डोळ्यासमोरच असतात पण आपल्याला ते दिसत नाहीत किंवा आपण त्या उपायांकडे गांभीर्याने कधी बघत नाही.

 

 

वॉरेन बफे यांना जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जातं, ते फक्त त्यांच्या इन्व्हेस्टमेंट डिसीजन्स मुळेच..

आजच्या काळात मोबाईल ही आपल्याला एक चैनीची गोष्ट वाटते किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखली जाते, पण वॉरेन बफे आजच्या काळात सुद्धा मोबाईल शिवाय त्यांचं आयुष्य अगदी आनंदाने जगतात,

===

हे ही वाचा श्रीमंत व्हायचंय? एका जाणकार माणसाचा सल्ला, फक्त ५ टिप्स!

===

मोबाईल सारख्या फुटकळ गोष्टींमध्ये जर ते इन्व्हेस्टमेंट करत बसले असते तर कदाचित या शिखरावर ते पोहचू शकले नसते.

त्यांची श्रीमंती ही फक्त संपत्ती किंवा पैसाआडका इतकीच मर्यादीत नाही तर या सगळ्याचा त्यांनी केलेला सुयोग्य वापर ही त्यांची खरी संपत्ती आहे, आणि विशेषकरून सध्याच्या तरुण पिढीने ही गोष्ट लवकरात लवकर आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे,

 

 

फक्त पैसा कमाविणं आणि तो खर्च करण याला श्रीमंती म्हणत नाही, तर त्या पैशाची योग्य ठिकाणी होणारी गुंतवणूक आणि पुढच्या काळात त्याचा मिळणारा मोबदला यालाच तुमची खरी संपत्ती म्हणतात आणि हे सगळं कसं शक्य आहे त्यासाठी खालील काही टिप्स आपल्याला नक्कीच मदत करतील!

१  कमी खर्चिक जीवनशैली

आपल्या जीवनशैलीशी कुठेही तडजोड न करता अगदी कमी खर्चात सुद्धा आपण सुंदर आयुष्य जगू शकतो! ते म्हणतात ना, आपणच आपल्या गरजा वाढवतो तसंच त्या गरजा कमी कारायची जवाबदारी सुद्धा आपलीच असते हे आपण सोयीस्करपणे विसरतो.

उंची ब्रँडेड कपडे, महागड्या गाड्या, मोठमोठ्या हॉटेल्स मधल्या पार्ट्या यावर नियंत्रण ठेवणं. आपल्याच हातात आहे. ज्यातून भविष्यात सर्वात जास्त फायदा होणार नाही अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवून ठेवू नका.

 

 

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कामाईपेक्षा अधिक खर्च कधीही आपल्याला धोक्यात नेऊ शकतो, हे कायम लक्षात ठेवा.

सध्याची पिढी ही Installment (हफ्ते) यावर खूप अवलंबून असते जे अत्यंत धोकादायक आहे, म्हणजे स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त किमतीच्या गोष्टीत पैसे गुंतवणे यामुळेसुद्धा हे सेव्हिंग्सचे प्रॉब्लेम वाढीस लागतात.

 

 

२. कामामधून आवश्यक असलेला ब्रेक किंवा थोडी विश्रांती

सतत काम केल्याने सुद्धा खूप तणाव येतो आणि हाच तणाव कमी करण्यासाठी गरजेचा असतो तो ब्रेक, आणि हा ब्रेक किंवा विश्रांती घेण्यासाठी काय तुम्हाला वेगळं काही करायचं नसतं.

सगळे नेहमीच लवकरात लवकर स्थिर स्थावर कसं होता येईल याकडे लक्ष देतात पण त्याबरोबर कामाच्या व्यस्त शेड्युल मधून ब्रेक घेणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं.

 

 

हा ब्रेक म्हणजे काय तर, एखाद्या विकएंड ला छोटीशी बाहेरगावी ट्रिप काढण किंवा घरी बसून घरच्यांना वेळ देणे, यासाठी आपल्याला काय खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते अशातला भाग नाही, पण या अशा छोट्या छोट्या ब्रेक्स मुळे आपली कार्यक्षमता नक्कीच वाढते आणि मग आर्थिक बाजू सुद्धा भक्कम व्हायला मदत होते!

 

 

३. संरक्षणात्मक गुंतवणूक

सध्याच्या तरुण वर्गाला फास्ट पैसे हवेत त्यासाठी ते जो असेल तो मार्ग अवलंबायला तयार असतात, जसं उदाहरण द्यायच झाल तर शेयर मार्केट.

 

 

यात काहीच वाद नाही की सर्वात जास्त रिटर्न्स हे शेयर बाजारात गुंतवूनच मिळतात आणि नेमकी हीच गोष्ट तरुण लोकांना आकर्षित करते, पण त्यात असणारा धोका किंवा रीस्क याकडे ही लोकं दुर्लक्ष करतात आणि त्यात पैसे गुंतवून कधी खुश होतात तर कधी निराश होतात! आपण प्रोफेशनल गुंतवणूक करणारे नसल्याने किंवा त्याचा नीट अभ्यास न केल्याने असं होतं.

===

हे ही वाचा SIP किंवा FD मध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ध्यानात ठेवायलाच हव्यात! नाहीतर…!

===

 

त्यामुळे नेहमीच बचावात्मक गुंतवणूक करणे कधीही योग्य आणि जर शेयर मार्केटचा धोका पत्करून त्यात पैसे गुंतवायचे असतील तर त्याचा नीट अभ्यास करून आणि कोणतीही लालसा न बाळगता ते करणे जास्त योग्य ठरेल, शेअर्समध्ये गुंतवणे हे कधीच वाईट नाही पण त्यातला धोका लक्षात घेऊन गुंतवणूक करण्यातच शहाणपण आहे!

४. निरनिराळ्या उद्योगातून इनकम मिळवणे

नोकरदार वर्गाने नेहमीच त्यांना मिळणाऱ्या पगारात समाधान मानायला हवं असे अजिबात नाही, उलट आजची तरुण पिढी ही तंत्रज्ञानाच्या आधारे इतर उद्योग सुद्धा करू शकते आणि त्यातून चांगला मोबदला मिळवू शकते,

 

 

जसं की ऑनलाईन शिकवणी, किंवा एखादा छोटासा गृहउद्योग, किंवा रीकामी असलेली प्रॉपर्टी भाड्यावर देऊन त्यातून साईड इनकम मिळवणे किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेऊन तीचा वापर हा केवळ व्यावसायिक कारणांसाठी करणे अशा बऱ्याच गोष्टींमधून जास्तीची कमाई होऊ शकते,

गुंतवणुकीत विविधता आणण्यापेक्षा इनकम मध्ये विविधता आणली तर जास्त फायदा होऊ शकतो, कारण तुमची मिळकतच तुमचं भविष्य ठरवते आणि त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतील तर आयुष्य आणखीनच सुकर होते.

५. योग्य नियोजन

आपल्याकडे पैसा असतो, दर महिन्याला ठराविक रक्कमही आपल्याला मिळते, मात्र खर्चाचं गणित लक्षात घेऊन त्या पैशांच योग्य नियोजन करणं गरजेचं आहे.

 

 

अनेक खर्च हे करावेचं लागतात, ते टाळणं शक्य नसतं, मात्र आपला पगार, अन्य उत्पन्न आणि खर्च या सगळ्यातूून शिल्लक राहणाऱ्या रकमेचे सेव्हिंग तुम्ही किती स्मार्ट पद्धतीने करता यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे.

सेव्हिंसाठी पारंपरिक पर्यायांसह अनेक नवे पर्याय उपलब्ध आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती आहेत, मात्र गरज आहे, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायची…

 

saving money InMarathi

 

उद्याची चिंता करण्यासाठी आजचा दिवस वाया घालवु नका, मात्र भविष्य सुरक्षित ठेवण्यााच्या दृष्टिने आज किमान पहिले पाऊल उचला.

===

हे ही वाचा श्रीमंत व्हायचंय, पण कसं? जाणून घ्या.. श्रीमंतांच्या या १५ सिक्रेट सवयींमधून…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?