' विष्णुचा अवतार असलेल्या या राजाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या ख-या ठरल्या आहेत.

विष्णुचा अवतार असलेल्या या राजाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या ख-या ठरल्या आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भविष्यात डोकाविण्याची आवड नाही, असा माणुस अगदी क्वचितच सापडतो. वर्तमानापेक्षाही भविष्यात रस घेऊन हात किंवा पत्रिका दाखविण्यासाठी ज्योतिषांकडे लागणा-या रांगा हे त्याचंच एक प्रतिक आहे.

ज्योतिष्य़विद्येच्या आधारे, भविष्याचं भाकित केलं जात असलं, तरी तुमच्या आयुष्यातचं नव्हे, संपुर्ण जगाच्या पटलावर कोणते बदल होणार, कुणाची सत्ता येणारं असं कुणी खात्रीशीररित्या सांगितलं तर त्याला हसून मुर्ख ठरविलं जाईल,

 

 

मात्र त्याचं प्रत्येक भाकित तंतोतंत खरं ठरलं तर ? निव्वळ अशक्य वाटणारी घटना घडल्याचे अनेक पुरावे इतिहासात सापडले आहेत.

आपल्या देशात भाकीत वर्तविणा-यांची संख्या काही कमी नाही, क्रिकेटच्या मॅचपासून निवडणुकांच्या निकालापर्यंत, प्रत्येक महत्वाच्या घटनेवेळी भविष्य वर्तविणारे आपलं डोकं वर काढतात, मात्र त्यापैकी मोजकेचं अजरामर होतात.

नॉस्ट्रॅडॅमस (१५०३-१५६६) या अभ्यासकाचे नावही भाकितांच्या यादीत अग्रगण्य आहे. फ्रेन्च उत्कांती, अटमबॉम्बसारखं अस्त्र, अडॉल्फ हिटलर यांसारख्या नेतृत्वाचा उदय यांपासून ते थेट २०११ साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यापर्यंत, अनेक घटनांचे भाकीत त्यांनी केले असल्याचे दाखले दिले जातात.

वेळोवेळी या घटना घडल्यानंंतर, त्यांची भाकीतं समोर आल्याने त्यांचं महत्व सातत्याने सिद्ध होत गेलं,

 

 

मात्र त्यांनी भाकीत करण्याच्या एक, दोन नव्हे तर तब्बल चारशे वर्षांपुर्वी इंडोनेशियातील एक राजा अशा प्रकारची भाकीतं करत असल्याचे पुरावे अनेक अभ्यासकांना सापडले आहेत.

११३५ ते ११५७ या कालावधीत केदिरी येथे राज्य करणारा राजा जयाभय (jayabaya) हा अत्यंत लोकप्रिय राजा म्हणून ओळखला जात होता. भविष्यवाणी हा त्यांचा गुण होताच, मात्र ते भगवान विष्णु यांच्या वंशातील असल्याचे

त्याचे नेतृत्व, प्रजेशी असलेेलं नातं, राज्याचा सर्वागिण विकास करण्याची पद्धत यांमुळे त्यांच्या कार्यकाळानंतर पुढील अनेक वर्ष अनेक पिढ्या त्यांचा सन्मान करत होत्या.

कोणं होते राजा जयाभय

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – सर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत!

इंडोनेशियातील राजकुळात जन्मलेले राजा जयाभय ही त्यांची वरकरणी ओळख असली, तरी त्यांच्या कुळाबाबत अनेक समज रुढ आहेत. त्याचे वडील गेंद्रायणा यांनी पांडवांचे वंशज युदयनचा मुलगा असल्याचा दावा केला होता,

पांडवांच्या कुळातील अर्जुन,परिक्षित यांच्या पुढील काही पिढ्यांमध्ये जयाभय यांचा जन्म झाला असल्याची नोंद अनेक ठिकाणी आढळते.

ब्रह्मदेवाचे ते खापरपणतु असल्याचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे, तर काही अभ्यासकांनी ते विष्णुदेवाच्या कुळातील असल्याचे ठाम मत व्यक्त केलं आहे.  याबाबत अभ्यासकांमध्ये मतमतांतरे असली तरी त्यांचा , त्रिदेवांच्या वंशावळीतील त्यांचं स्थान असल्याचं सर्वांनी मान्य केलं आहे.

किंबहुना, त्यांचा जन्म या कुळात झाला असल्यानेच, त्यांचे भाकीत खरं ठरत असल्याचा संबंधही अनेकांनी व्यक्त केला आहे.

 

 

राजा जयाभय यांची न्यायाची पद्धत आणि समृद्ध शासन यांमुळे त्यांची नोंद जगातील यशस्वी राज्यकर्त्यांच्या यादीत करण्यात आली आहे. जयाभय यांची राणी पत्नी देवी साराच्या यांनी देवी जयाभय, प्रेमस्ति देवी, देवी प्रमुनी आणि देवी ससंती या अपत्यांना जन्म दिला होता.

११५७ मध्ये त्यांनी भारतीय महाकाव्य महाभार

ताचे पुनर्लेखन करणारे पुस्तक इम्पु (संत) सेदा दान इम्पु पनुलु यांची निर्मिती केली. हिंदू साहित्यांसाठी केदारी साम्राज्याचे युग हा  सुवर्णकाळ होता. राजाने स्वतः सेरात जयाबाया, सैराट प्रणितीवाक्य आणि इतर सारख्या भविष्यवाण्यांची पुस्तके प्रकाशित केली होती.

भविष्यवाणी

नोस्ट्रेडॅमस यांनी भविष्यवाणी प्रकाशित केल्यानंतर, समजाकडून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात होत्या,  काही लोकांना असं वाटलं की नॉस्ट्राडामस हा भूताचा चाकर, गुलाम आहे, किंवा अनेकांनी त्यांना वेडा ठरविले.

त्यांच्यावर जशी टिका झाली, त्याचप्रमाणे समाजातील उच्चभ्रु लोकांनी त्यांच्या भविष्यवाणीकडे गांभिर्याने पहात, ते अजरामर असल्याचं ठरविलं.

मात्र राजा जयाभय यांच्या भविष्यवाणीबाबत टिका व्यक्त केली जाण्याचा प्रश्नच नव्हता.  त्रिदेवांचे वंशज म्हणून त्यांना असलेलंं महत्व, त्यांच्याविषयी समाजाला वाचणारी भक्ती आणि राजा ही त्यांची भुमिका यांमुळे त्यांची भाकीतं ही कायमच प्रमाण मानली गेली,

त्यांची भाकीत ही खरी होत असल्याने त्यावर शंकाा उपस्थित झाली नाहीच, मात्र अध्यात्मिकदृष्टया त्यांना असलेलं महत्व लक्षात घेता, त्यांच्या पुस्तकांनाही त्यांच्याइतकंच महत्व देण्यात आलं आहे.

 

 

इंडोनेशियावर डच लोकांचे राज्य असेल, हे त्यांचे भाकीत खरं ठरलं, त्याप्रमाणे सुमारे ३०० वर्ष डचांंनी इंडोनेशियावर राज्य केल्याचं इतिहास सांगतो. त्यानंतर १९४२ मध्ये  1942 मध्ये इंडोनेशियात डचांचा जपानी सैन्याने पराभव केल्यानंतर ही राजवट संपुष्टात आली.

जयाभय राजाने आधुनिक इंडोनेशियाच्या नेतृत्त्वाची भविष्यवाणी नोटोनेगोरोच्या ऐवजी सैल टर्म अशी केली. याचा शब्दशः अर्थ देशाचा प्रशासक असा होता.  त्यांनी हा शब्द का वापरला याविषयी कोणतेही स्पष्टीकरण नसल्यामुळे या मुद्द्याचे बरेच भिन्न अर्थ लावले गेले आहेत.

आधुनिक काळात इंडोनेशियात जो नेता बनला तो एक सर्वशक्तिमान “राजा” नसून तो देशातील जनतेला उत्तर देणारा “प्रशासक” असेल हे त्यांचे भाकीत अखेर खरे ठरले.

इंडोनेशियाच्या नेतृत्वाबाबत त्यांचे आणखी एक भाकीत, म्हणजे जावा. इंडोनेशियन्स लोकांच्या मतांनुसार ही एक व्यक्ती असून जगाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेला हा प्रशासक असेल, घोड्यांहूनही वेगवान असलेला, कणखर अशी ही व्यक्ती असल्याचे भाकीत जयाभय यांनी त्यांच्या पुस्तकाव्दारे केले आहे.

 

 

जयाभय यांच्या मते, या महान नेत्याच्या आयुष्याची सुरुवात कठीण होईल. तो बर्‍याच अडचणी, अपमान आणि दारिद्र्यावर विजय मिळवेल. परंतु प्रामाणिकपणा आणि दृढ मनामुळे त्यांचा कायमच विजय होईल.

जगात सुव्यवस्था, सुसंवाद आणि न्याय परत मिळवण्यासाठी दुःखाच्या काळोख युगात नीतिमान राजा जन्माला येईल.

राजा जयाभय यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याने त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास दृढ झालाचं, मात्र पांडवांच्या कुळातील त्यांचं स्थान, विष्णुंचे वंशज ही ओळख या बाबी आजही वलयांकीत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – “येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?