'हसा आणि हसवा; २०१९ सालात सुपरहिट ठरलेल्या मिम्सचा खजिना

हसा आणि हसवा; २०१९ सालात सुपरहिट ठरलेल्या मिम्सचा खजिना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इंटरनेवर व्हायरल होणारे मिम्स न वाचता पुढे गेल्यांच कधी तुम्हाला आठवतंय ? बहुतांश जणांचं यावर उत्तर नाही असंच असेल,

राजकारणापासून ते रस्त्यांवरील खड्ड्यांपर्यंत… विषय कोणताही असला तरी त्यावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारी मिम्स आपल्याला खळखळून हसवितात.

हल्ली तर एखाद्या घटनेपेक्षा त्यावरील मिम्स अधिक लवकर व्हायरल होतात, मिम्स पाहताना, ते सुचणा-यांच्या अफाट कल्पनाशक्तीचे भरभरून कौतुक करून नेटेक-यांकडून त्याला दादही दिली जाते.

जगात कुठेही एखादी घटना घडली, की त्यावर तात्काळ सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात,

मिम्सने मागील काही काळात सोशल माध्यमांमध्ये प्रचंड धुमाकुळ घातलाय.

 

 

काय आहे मिम्सची भानगड

या मिम्सची सुरुवात नेमकी झाली केव्हा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं 1976 मध्ये. जीवशास्त्र आणि उत्क्रांतीचा अभ्यास करणारा एक शास्त्रज्ञ रॉबर्ट डॉकिन्स याने मिम्स हा शब्द पहिल्यांदा वापरला होता असं मानलं जातं.

त्याच्या मते मिम्स हे एखाद्या गुणसूत्र अर्थात जीन्सप्रमाणे आहेत. जीन्सच्या माध्यमातून जशी काही वैशिष्टय़ं आईवडिलांकडून मुलांकडे जातात तसेच मिम्स हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणारे सांस्कृतिक घटक आहेत.  पण हल्लीच्या काळात मिम्स या शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झालाय. हल्ली मिम्स म्हणजे इंटरनेटवर लोकप्रिय झालेला एखादा व्हिडीओ किंवा खोचक टिपणी म्हणजे मिम्स असा समज झाला आहे.

२०१९ साली घडलेल्या विविध घटनांवर भाष्य करणारी ही मिम्सची सफर

 

२०१९ साली लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांची रणधुमाळी अनुभवली. त्यावेळी निवडणुका आणि मतदान या विषयांवर भाष्य करणा-या मिम्सचा पाऊस पडला होता. त्याचाच हा एक उत्तम नमुना.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुहेतील धारणा हा विषय आजही चवीने चघळला जातो. त्यामुळे मोदींची ध्यानधारणा सुरु होण्यापुर्वीच या मिम्सनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली, तुम्हाला ती गुहा सापडली का ?

 

 

 

अरविंद केजरीवाल आणि मोदी यांच्यातील शाब्दिक चकमक आपल्याला नवी नाही, मोदींनीं केजरीवाल यांना कधी `आप’लंसं केलंच नाही, तर राहुल गांधी हा मिम्सचा विषय अनेक सोशल माध्यमांवर ट्रेडिंग मध्ये होता आणि अजुनही आहे.

 

 

 

हा घ्या आणखी एक धमाल नमुना…

 

 

बजेट जाहीर झाल्यानंतर मध्यमवर्गीयांना नेमकं हेच वाटत असेल का ?

 

 

पॉलिटिकल मिम्सचा कंटाळा आलाय ? नेटेक-यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, राजकारणात रुची नसणा-यांनाही हे मिम्स नाराज करत नाहीत.

 

 

मेंदुला थोडा ताण द्या म्हणजे अर्थ नक्की कळेल…

 

 

२०१९ साली केवळ महाराष्ट्रातील आणखी एक मोठी घटना म्हणजे अतिवृष्टी, घटना निश्चितच गंभीर असली, तरी जुनमध्ये दाखल झालेल्या पावसाने मुक्काम लांबविल्याने नेचेक-यांनीही त्यावरही टिकास्त्र सोडलं. या मिम्समधील प्रवाशांप्रमाणे तुमचीही यंदाच्या पावसाळ्यातील एखादी आठवण आहे का ?

 

 

पर्यावरणाचं रक्षण केल नाही, तर पुढच्या पावसाळ्यात या रिसॉर्टची सफर अनुभवा, (अर्थात विनामुल्य)

 

 

मुंबइकरांनो, स्टेशन ओळखा…

 

 

शाळेभवती तळे साचून सुट्टी मिळेल का ? या प्रश्नाचं उत्तर देताना यंदा भोलानाथही कंटाळला.

 

 

रणवीरच्या फॅशनची थट्टा करा किंवा त्याचे डायहार्ट फॅन असाल, हे पाहिल्यावर हसु येणारचं…

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापेक्षाही चर्चेत होते ते संजय राऊत, प्रतिक्रिया निगेटिव्ह असो वा पॉसेटिव्ह, घरात राऊत, बाहेर पाऊस हे वाक्य म्हणजे नेटेक-यांचे घोषवाक्य बनलं होतं.

 

 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत मिम्स व्हायरल होत असताना डोनाल्ड ट्रमलाही मुभा दिली नाही.

 

 

२०१९ च्या मिम्समध्ये विराट कोहली आणि गणपत गायतोंडे यांचा उल्लेख झाला नाही, तर मिम्सची यादी पुर्ण होणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?