' आळशीपणावर मात करून फिट राहण्यासाठी या १० टिप्स नक्की फॉलो करा..

आळशीपणावर मात करून फिट राहण्यासाठी या १० टिप्स नक्की फॉलो करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नववर्षात जीमची शोधाशोध सुरु केलीत ? महागडे पॅकेज घेतलं, पण जीममध्ये जाण्याचा कंटाळा येईल अशी भीती वाटतेय ? मग काळजी नको, कारण अशी भीती वाटणारे तुम्ही एकटे नाही.

 

 

नव्या वर्षांत बरेच जण संकल्प म्हणून व्यायामाला सुरवात करतात. पण हा उत्साह नव्याचे नऊ दिवसांपुरता मर्यादित राहतो.

दहाव्या दिवसापासून पुन्हा पहिले पाढे ५५ होतात.

दहाव्या दिवशी गुलाबी थंडीत एवढे सकाळी उठून व्यायामाला जायला अगदी जीवावर आलेलं असतं. यामागे कारणे बरीच आहेत पण सध्या आपण त्यातील काही महत्वाची आणि त्यावरील सोपे उपाय काय आहेत हे बघूया.

 

१) नवे प्रकार ट्राय करा

असं म्हणतात की आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे रोजचा व्यायाम. रोज रोज एकच का व्यायाम करायचा असा कंटाळा आला असल्यास त्यावर सोपा उपाय म्हणजे व्यायाम प्रकारात बदल करा.

 

malika arora yoga inmarathi

 

कंटाळा  टाळण्यासाठी सोमवारी एक, मंगळवारी दुसरा असा दारा दिवशी एक एक प्रकार करू शकता.

या मध्ये तुम्ही एक दिवस वेट ट्रेनिंग, एक दिवस कार्डिओ, एक दिवस क्रॉस फिट,जॉगिंग, एक दिवस योगासने, झुंबा, बॉलिवूड डान्स,सायकलिंग, ट्रेकिंग असे भरपूर प्रकारे तुम्ही व्यायाम करू शकता.

 

२) उद्दिष्ट ठेवा

व्यायाम करण्यासाठी डोळ्यासमोर रोज एक उद्दिष्ट्य असंलं की आपोआप प्रेरणा मिळते. ही व्यायामाची प्रेरणा नेमकी असावी.

व्यायाम करण्यासाठी एखादे उद्दिष्ठ नसेल तर व्यायामाचा कंटाळा नक्कीच येऊ शकतो.

एखाद्याने वजन कमी करणं, एखाद्याला मोठ्या ट्रेक जायचं असेल, एखादीला सतत फिगरमध्ये राहायचे असेल, एखाद्याला केवळ फिट राहण्यासाठी अशी कोणतीही कारणं असु शकतात.

असे असल्यास तुम्ही व्यायाम नेमाने आणि खंड न पाडता करू शकता.

 

हे ही वाचा – कुणीही करू शकेल इतके सोपे ८ व्यायामप्रकार मधूमेहापासून १००% दूर ठेवतात…

त्यामुळे या नव्या वर्षात व्यायम करण्याचा निर्णय घेत असाल, तर त्यापुर्वी आपल्याला व्यायम नेमक्या कोणत्या कारणासाठी करायचाय, दररोज व्यायाम केल्याने आपल्याला कोणता फायदा साध्य करायचा आहे, याचा पुर्ण विचार करा, आणि आपलं लक्ष्य पक्कं करूनच व्यायामाला सुरुवात करा.

 

३) जोडीदाराची साथ अनुभवा

प्रत्येकाला रोज नवीन काही तरी शोधण्याची उर्मी असते, तशी व्यायामाला जाण्यासाठी देखील तुम्ही एखादा किंवा एखादी पार्टनर शोधू शकता. व्यायमाचा प्रकार कोणताही असला तरी जोडीला साधीदार असेल तर मग मजा काही औरंच.

 

 

यावर्षीचे कपल गोल्स पूर्ण करण्यासाठी त्याची सुरुवात व्यायामापासून करणं बेस्ट ऑप्शन ठरेल. नवरा-बायको, बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड यांना एकमेकांसोबत दिवसभराची फ्रेश सुरुवात करता येईल.

एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण असल्यास तर टफ कॉम्पिटिशन असते. थोडक्यात व्यायामासाठी जर तुमच्या बरोबर तुमचा जोडीदार असेल तर व्यायाम करायला थोडेसे मोटिव्ह मिळाल्यासारखे वाटते.

 

४) रहा फिट

एका संशोधनानुसार, सातत्याने व्यायाम करणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत नेहमी उत्साही, ताकदवान, स्पष्ट विचारांच्या असतात. व्यायाम न केल्याने उलट शांत झोप मिळत नाही, नैराश्य अशा समस्यां येतात. याशिवाय कार्यालयीन कामामध्ये देखील रोज व्यायाम करणाऱ्यांचा परफॉर्मन्स उत्तम असतो.

 

 

व्यायामाने खरंतर छान ऊर्जा मिळते.एक्झोस झाल्यासारखे फिलिंग येत नाही. यासर्व कारणामुळे आपण व्यायाम एक दिवसही बुडविण्याची इच्छा करत नाही. यामुळे व्यायाम ही एक अतिशय चांगली सवय शरीराला लावून घ्या.

 

५) कल करे सो आज कर

टुमॉरो नेव्हर कम्स असं शेक्सपिअरने म्हटलंं आहे, त्यानुसार भविष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरवात ही लगेच करायची असते.

कल करे सो आज , आज कारे सो अब अशी आपल्याकडे हिंदीतील एक म्हण आहे. तरी सुद्धा बहुतेकांना सोमवार पासून व्यायामाला सुरवात करण्याची सवय असते. ही सवय देखील चांगली आहे. कारण यामुळे तुमची मानसिक तयारी होते.

 

 

 

पहिल्यांदाच व्यायामाला सुरवात कारणार असाल तर शक्यतो सकाळच्यावेळी करावी. कारण जसा दिवस पुढे सरकतो तशी आपल्याला व्यायाम न करण्याची विविध कारणं मिळतात.

 

६) प्राधान्यक्रम ठरवा

दिवसभरात कामांचा प्राधान्यक्रम ठरवताना व्यायामाला नेहमी पाहिले स्थान द्या. ही दिवसाची सुरुवात करण्याची छान सवय आहे. जरी तुमच्या प्राधान्यक्रमातील एखादं काम झालं नाही तरी व्यायाम नक्कीच पूर्ण होण्यासारखा आहे.

 

कधीही सलग दोन दिवसांपेक्षा जास्त खंड पडू देऊ नका. एखाद्या दिवशी आराम करणं योग्य असतं, मात्र सलग दोन दिवसापेक्षा जास्त आराम नको. हा नियम न पाळल्यास तुमच्या दिनक्रमावर वाईट परिणाम होऊ शकतो.

 

७) तुमच्या आवडीनिवडीचा विचार करा

तुम्ही स्वतःच्या व्यायामासाठी घेतलेले छोटे कष्ट असतील तरी त्याचे श्रेय स्वतःला द्यायला विसरू नका. यामुळे दिवसेंदिवस तुम्हाला व्यायामाला प्रेरणाच मिळते.

तुमच्या आवडीनिवडींचा विचार करून व्यायाम प्रकार निवडा. तुम्हाला जर वेट ट्रेनिंग आवडत नसेल तर दुसरा प्रकार निवडा. एखाद्यावेळी त्या व्यायाम प्रकाराची जागा किंवा वातावरण आवडू शकत नाही. अशा गोष्टींचा देखील विचार करा.

 

 

तुम्ही व्यायाम करताना नक्की कोणते घटक तुम्हाला व्यायामापासून परावृत्त करतात त्याचे मूल्यमापन करून व्यायामाचे नियोजन करा. जसे की, एखाद्याला जॉगिंगची आवड असते पण थंडीमुळे पळायचा कंटाळा येऊ शकतो.

आठवड्यातून निदान सहा दिवस तरी व्यायाम करा. जर तुमची व्यायामाची संकल्पना एखादा मैदानी खेळ खेळणे असेल तर तो शक्यतो रोज खेळा. हा खेळ महिन्यातून दोन किंवा तीन वेळाच खेळणे पुरेसे नाही.

 

८) रहा फ्रेश

जर तुमच्याकडे व्यायाम आणि त्यानंतर शॉवर घ्यायला वेळ नसेल तर असे व्यायाम प्रकार शोधा ज्यामुळे नंतर तुम्हाला शॉवर घेण्यची गरज पडणार नाही. काही जण दर आठवड्याला आव्हानात्मक वेट ट्रेनिंग सेशन करतात पण त्यानंतर घाम येत नाही.

काही जणांच्या मते व्यायाम करून घाम येणे हे आव्हानात्मक समजतात मात्र, व्यायाम करूनही घाम न येणे हे देखील तितकेच आव्हानात्मक आहे.

तुम्ही व्यायामासाठी जेवढे कष्ट घेता त्याबरोबरच या व्यायामाची नोंद ठेवणारी गॅजेट्स, ऍक्सेसरीज, कपडे, इत्यादींवर खर्च करत असाल तर तो फार वायफळ समजू नका. जर या गोष्टींनी व्यायामाला मदत होणार असले तर नक्की घ्या.

 

exercises Inmarathi

 

व्यायाम करताना त्याकडे एखाद्या खास दिवसाची तयारी म्हणून बघा. जसे की एखाद्या ब्राईडला लग्नात सुंदर दिसण्यासाठी, एखाद्या तरुणाला सादरीकरण करताना हँडसम दिसायचे असते त्यासाठी, एखाद्याला तणावाच्या स्थितीत आरोग्य चांगले राहाण्यासाठी उपयोगी पडू शकते.

 

९) व्यायामाची माहिती मिळवा

काही जणांच्या व्यायमाच्या संकल्पना विचित्र असतात. पाच मैल पळालो किंवा दोन तास सायकल चालवली म्हणजेच व्यायाम होतो असे नाही तर दहा मिनिटे चालायला गेलात तरी तो व्यायाम म्हणूनच गणला जातो.

जे जे शक्य होईल ते व्यायाम प्रकार अजमावा. काही जण मॅरेथॉनच्या तयारीसाठी व्यायामाला सुरवात करतात.

 

 

१०) व्यायामाची साधने आणि त्याच्या जागा नियोजित ठेवा.

कधी कधी एखादी रोजची वस्तू सापडली नाही तरी इतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी न थांबता घराबाहेर पाडा. कारण एखादे छोटे कारण सुद्धा व्यायाम करण्यापासून तुम्हाला परावृत्त करू शकते.

आनंदी राहण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भरपूर झोप आणि नियमित व्यायाम हाच आहे. त्यामुळे शक्यतो व्यायाम चुकवू नका. आनंदी राहण्याचा हा एकच उपाय आहे असे नाही पण बहुतेक संशोधनातून हे सिद्ध झाले की,  आनंदी राहण्याची ही सुरवात राहू शकते.

 

waste Exercise InMarathi

 

नियमित व्यायाम केला तर तुम्ही स्वतःमध्ये बरेच चांगले बदल घडवू शकता.

या शिवाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे काही इतर संकल्प करता ते सिद्धीस नेण्यास ही व्यायामाची मदत होते.

===

हे ही वाचा – फक्त ५ मिनिटं हा व्यायाम केलात, तर आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटतील

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?