' जानेवारीत फिरायला जाण्याची इच्छा आहे? ही घ्या ५ बेस्ट जानेवारी डेस्टिनेशन्सची यादी..!

जानेवारीत फिरायला जाण्याची इच्छा आहे? ही घ्या ५ बेस्ट जानेवारी डेस्टिनेशन्सची यादी..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

वर्षाची सुरुवात करताना प्रत्येकाची स्वतंत्र अशी बकेट लिस्ट तयार होते. मात्र लहान मोठ्या प्रत्येकाच्या यादीत हमखास सापडणारा कॉमन पॉईंट म्हणजे सहल. चित्तथरारक ट्रेकिंग असो वा संपुर्ण कुटुंबाच्या गोतावळ्याासह केलेली धम्माल, कारण कोणतेही असले तरी जानेवारी महिन्यातील गुलाबी थंडीचा मौसम दवडता कामा नये.

तुम्हालाही नव्या वर्षाचा उत्साह जाणवतोय ? मागील वर्षभरात धावपळीच्या रुटीनमध्ये राहून गेलेले विसाव्याचे क्षण आता नव्या वर्षात अनुभवायचेत ? कुटुंब, मित्र यांच्यासह नवी जागा एक्स्प्लोर करायचीय ? मग आता विचार करण्यात वेळ दडवण्यापेक्षा बॅग पॅक करण्याास सुरुवात करा,

पण आता सर्वात मोठा प्रश्न की जायचं कुठे ? डोन्ट वरी…! तुम्ही फक्त तयारी करा, कारण तुमच्यासाठी सहलीच्या सर्वोत्तम डेस्टिनेशन्सची यादी आम्ही घेऊन आलोय.

कमीत कमीत दिवसाात आणि मर्यादित खर्चात, पुरेपुर आनंद उपभोगण्यासाठी या लिस्टमधील कोणतेही एक ठिकाण निवडा आणि अविस्मरणीय अनुभवासाठी सज्ज व्हा… निळ्याशार अथांग समुद्रापासून ते गर्द वनराईपर्यंत, वेड लावणा-या निसर्गाच्या कुशीत शिरण्यासाठी यंदाच्या जानेवारी महिन्यात यापैकी किमान एका तरी ठिकाणाला भेट द्या.

…………

१.  जयपुर (राजस्थान)

 

gozocaabs.com

 

केसरीया बालम आवोरी, पधारो म्हारे देस, अशी आर्वजी हाक देणारं राजस्थान या थंडीत तुमची वाट पाहतयं. या गाण्यातील शब्दांप्रमाणेच राजेशाही पाहुणचाराचा आस्वाद घ्यायचा असेल, तर बॅग भरा आणि थेट जयपुरच्या दिशेने निघा.

राजे महाराजांचे महाल, भव्य महालातील राजेशाही थाट, दिमाखदार हवेल्यांमधील नृत्य… तुम्हालाही हा लॅविश अनुभव घ्यावासा वाटतोय ? मग जयपुर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. गुलाबी थंडीत या गुलाबी शहरात धमाल करण्यासाठी हजारो पर्याय उपलब्ध आहेत. लव इज इन दि एअर म्हणजे काय हे ठाऊक नसेल तर जोडीदारासह जयपुरला जावचं लागेल.

अमेर फोर्ट, सिटी पॅलेस, हवा महाल… वास्तव्याचे दिवस संपतील मात्र येथिल पर्यटन स्थळांची यादी संपणार नाही. महालांची भ्रमंती करताना डोळे दिपतील, आणि त्यानंतर राजस्थानी थाळीवर ताव मारताना जीभही सुखावेल.

 

beyaar.com

 

जयपुरच्या सहलीसाठी जानेवारी महिना निवडण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे द जयपुर लिट्रेचर फेस्टिव्हल ! पुस्तकांच्या जगात फेरफटका मारण्यासाठी यावेळी हजारो परदेशी पाहुणेही येथे येतात. 

भाषा कोणतीही असो, तुम्ही वाचनप्रेमी असाल वा कविता, शायरी याांची आवड असेल, तर मग जानेवारी महिन्यातील काही दिवस जयपुर सहलीसाठी राखून ठेवलेच पाहिजेत.

इतर ठिकाणांपेक्षा खास राजेशाही पद्धतीची निवासाची व्यवस्था, पारंपरिक लोकगीतावरील ठेका, फोटोग्राफीसाठी लाखो ठिकाणं, डोळे दिपविणारे महाल आणि सोबतीला गुलाबी थंडी….. असं कॉम्बिनेशन केवळ जानेवारी महिन्यातच मिळु शकेल.

 

२  हंपी

 

wikipedia.org

 

सहलीसाठी अधिक दिवसांची सुट्टी मिळत नसेल तर मोजक्या दिवसात पुर्ण होणा-या सहलींच्या यादीत हंपीचं नाव घेतलंच पाहिजे. जानेवारी महिन्यातील थंडीत हंपीच्या प्रत्येक देवळात, शिल्पांमध्ये डोकाविणारा सुर्याचा पहिला किरणं पाहण्याचं सौंदर्य तुम्हाला अनुभवल्यशिवाय कळणार नाही

कमी गर्दीचं हे ठिकाण तुम्हाला निवांत सहलीचा आनंद देईलचं, मात्र एका वेगळ्यात शांततेची प्रचितीही तुम्हाला जाणवेल. खळाळणारी नदी, एका बाजुस गर्द झाडी आणि दुसरीकडे डोळे दिपविणार मंदिर.

मंदिरांसह वैविध्यपूर्ण लेणी, अनेक निसर्गरम्य ठिकाणं यांच्यासह ओपन मार्केट हा आगळावेगळा प्रकार म्हणजे महिलांसाठी पर्वणीच.

 

flickr.com

 

खरेदीची आवड असणा-यांना आणि नसणा-यांनाही शॉपिंगचा धमाल अनुभव देणारी ही मार्केट्स सवलतीच्या दरात अनेक वस्तुंचा खजिना तुमच्यासमोर घेऊन येतात. येथील प्रत्येक हॉटेल्स ही पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात बांधण्यात आल्याने येथिल वास्तव्याचा प्रत्येक क्षण तुम्हाला मनसोक्त जगता येतो.

 

३  मुन्नार (केरळ)

clubmahindra.wordpress.com

 

यंदा डिसेंबर महिना ओसरला असला तरी थंडीची  वाट पाहणा-या शहरवासीयांपेैकीच तुम्ही एक आहात ना ? मग थंडीवरील तुमच्या नाराजीचं उत्तर आहे केरळमधील मुन्नार

हुडहुडी भरविणा-या थंडीची केवळ स्वप्न पाहण्यापेक्षा ती प्रत्यक्ष अनुभविण्यासाठी मुन्नार ही सर्वोत्तम जागा आहे. मुळातच केरळ म्हटलं की, पारंपरिक कौलारी घरात समोर येणारी वाफाळती कॉफी, पांढराशुभ्र डोसा, चटकदार सांबार.

 

gozocabs.com

 

ऑथेन्टिक चवीच्या व्हेज – नॉन व्हेज खाद्यपदार्थामुळे खव्वैयांची चंगळ आहेच, मात्र येथिल घाटाघाटांचा रस्ता बाईकस्वारांसाठी धमाल ठरतो. चहाच्या मळ्यात फोटोग्राफी करण्यासाठी, कुडकुडणा-या गरमागरम कॉफी पिण्यासाठी, निसर्ग डोळ्यात साठविण्यासाठी चार ते पाच दिवस मुन्नारसाठी राखून ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही.

 

३. : चेन्नई (तामिळनाडू)

 

 

पारंपरिक कल्चरचा आस्वाद घेण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे चेन्नई, निसर्गरम्य ठिकाणांसह मनसोक्त खरेदी म्हणजे दुग्धशर्करा योग, सिल्कच्या साड्यांचे माहेरघर अशी ओळख असलेल्या चेन्नईच्या बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यानंतरचं ही सहल ख-या अर्थाने पूर्ण होते .

चैन्नईच्या आसपासच्या शहरांमध्येही अनेक नयनरम्य ठिकाणं असून उत्तम वाहतुक व्यवस्थेच्या आधारे या सगळ्याच ठिकाणांना भेट देता येऊ शकते.

 

 

विविध रंगांचे मोठमोठे फुगे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. फुग्यांचा फेस्टिव्हलही असतो हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? तमिळनाडूच्या चेन्नई शहरात एका ‘इंटरनॅशनल बलून फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात येतं. त्यामुळे जानेेवारी महिन्यात चैन्नईची सहल सर्वार्थाने खास ठरते. परदेशी फुगेप्रेमींचाही यामध्ये सहभाग असतो.

फुग्यांचा हा उत्सव पहायचा असेल, तर इंटरनेटवर मााहिती गोळा करून यंदाच्या जानेवारीत चेन्नईवारी कराचं

 

४. गुजरात

trivaltringal

 

महाराष्ट्रापासून सर्वाधिक जवळ असलेल्या गुजरातची सहल तुलनेने स्वस्त आणि मस्त आहे. या बहुरंगी सहलीत खव्वैयांची चंगळच आहेच, मात्र त्यासह गुलाबी थंडीचा अनुभवही घेता येईल.

कच्छचे विस्तीर्ण रण असो आणि त्याचवेळी सुरत, भरुच येथिल हिरव्यागार वनराईत नाचणारे मोर, हे दोन्ही वेगळे अनुभव एकाच सहलीत अनुभविण्यासाठी गुजरात भ्रमंतीला पर्याय नाही. रंगीत घागराचोली, बांधणीच्या साड्या यांचे शेकडो प्रकार केवळ खरेदी करण्यासाठीच नव्हे तर ते घडविणा-या कारागिरांनाही भेटण्याची संधी तुम्हाला मिळु शकते.

तेथे असलेल्या विविध टुरिंग गाईड्सच्या मदतीने मोजक्या दिवसात तुम्ही सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचे वेळापत्रक आखू शकता. उन्हाळा वगळता इतर सर्व महिन्यांमध्ये गुजरात सहल केली जात असली तरी जानेवारी महिन्याचा मुहुर्त निवडा कारण अहमदाबाद येथिल पतंग महोत्सव.

 

MyDesiLook

 

काय पो छे आरोळी ऐकली की पंतंगांच्या जगात आल्यासारखं वाटतं.  या पतंग महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे ‘कापडी पतंगी दिवे’. दिवसभर वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे कागदी पतंग उडवले जातात. रात्री चंद्राच्या साक्षीनं पतंगी दिवे उडवले जातात. ते पतंग उडताना पाहणं हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारंं असतं. अहमदाबादसह वडोदरा, सुरत, नाडीयाद, राजकोट येथेही महोत्सवांचे आयोजन केले जाते.

त्यामुळे एकंदिरित जानेवाारी महिन्यात गुजरातच्या कोणत्याही भागात असाल तर तुम्हीही पतंगाला ढील .देऊन या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत सहभागी होवु शकता.

 

५. गोकर्ण (कर्नाटक)

oyo

 

तळही दिसाावा, इतका निळाशार समुद्र, मऊ वाळु आणि चहुबाजुंनी पसरलेली विस्तीर्ण अशी नाराळाची झाडं…. वर्णनावरून परदेशातील एखादं महागड ठिकाण नजरेसमोर आलं ना ? पण यंदाच्या जानेवारी महिन्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता, आश्चर्याने थक्क होण्यापेक्षा जरा गुगलवर जाऊन गोकर्ण चीी माहिती घ्या.

कर्नाटकातील गोकर्ण हे ठिकाण पाहिल्यावर निसर्गाच्या शोधासाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.

चित्रात दिसणारा निळाशार अथांग समुद्र आणि हिरवीगर्द वनराई, सोबतीला अल्हाददायक थंडी…. वर्षभराचा शीण घालवणारी सुट्टी असावी तर अशी…

 

tripadvisor

 

दिवसभर निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्यानंतर संध्याकाळी समुद्रात डुंबण्याचा आनंद म्हणजे सुट्टीचे परफेक्ट वेळापत्रक. त्यासह हे ठिकाण भारतात असल्याने परदेशाच्या तुलनेत होणारा खर्चही कमी, त्यामुळे बजेटमधील ही सहल तुम्हाला निश्टित आनंद देऊन जाईल.

त्याच गोकर्णला ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि इतरही वॉटर स्पोर्ट्सचे शेकडो पर्याय उपलब्ध असल्याने ट्रेकर्सचा ओढा असतो. पंचतारांकित हॉटेल्ससह गेस्ट हाऊसपर्यंतचे अनेक पर्याय येथे उपलब्ध असल्याने तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला ही सहल अनुभवता येते.

वर्षातील पहिल्याच महिन्यात मनाजोगता हा निसर्ग अनुभविल्यानंतर पुढे वर्षभर मुड फ्रेश राहिलाा नाही तरच नवल. पुढे येणा-या धकाधकीच्या रुटीनमध्ये कुटुंबासाठी वेळ मिळणार नसेल, तर जानेवारी महिन्यातील हे खास क्षण दवडु नकाचं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?