' चाळीशीनंतर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आजपासूनच या ८ गोष्टींवर काम करा.. – InMarathi

चाळीशीनंतर पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून आजपासूनच या ८ गोष्टींवर काम करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

असं म्हणतात की, विशीतले दिवस हे धडपडीचे, मेहनतीचे असतात. कॉलेजच्या दिवसांमध्ये भरपूर मज्जा-मस्ती झालेली असते. आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतोच.

प्रत्येकाची सुखी जीवनाची व्याख्या खूप वेगळी असते, पण साधारणपणे चाळीशीत स्वतःचं घर असावं, एखादी गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या स्वप्नापेक्षा कदाचित तुमचं स्वप्न वेगळं असू शकतं, पण कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची गरज ही असतेच.

मराठीत “एक दिवस तूप खाऊन रूप येत नसतं.” अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही कोणतीही गोष्ट एकच दिवस केलीत तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. यासाठी सातत्य, चिकाटी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

“इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” हे तुम्ही ऐकलं असेलच. तुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.

चाळीशीत जाऊन जर तुम्हाला सुखी, आनंदी आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आतापासूनच मेहनत घ्यायलाच हवी. या सवयी आतापासूनच फॉलो करा आणि चाळीशीनंतर निवांत आयुष्य जगा.

 

१) वाचण्याची सवय लावा

 

study book reading exam inmarathi

 

असं म्हटलं की “वाचाल तर वाचाल”. वाचन म्हटलं की अनेकांना कंटाळा येतो. अगदीच कोणीतरी जबरदस्ती एखादी गोष्ट वाचायला सांगितली तर आपण लगेच गुगल करतो किंवा मोबाईलवर वाचतो. हातात पुस्तक घेऊन वाचण्याची सवय आपण गमावून बसलो आहोत.

हल्ली तर रोजचा पेपर सुद्धा आपण मोबाइलवरच वाचतो, पण हे वाचन काही खरे वाचन नव्हे. हातात पुस्तक घेऊन ते तासनतास वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. विचारांना प्रगल्भता येते.

वाचनाची सवय ही एका दिवसात लागण्यासारखी नाही. त्यामुळे, रोज किमान १० मिनिटं एखादं पुस्तक वाचण्याची सवय लावा.

 

२) रोजनिशी लिहा

 

diarywriting

 

अनेकांना ही गोष्ट खूप कंटाळवाणी वाटते. आपल्याला आता त्या गोष्टीचं महत्त्व लक्षात येत नसलं तरीही स्वतःची प्रगती जाणून घेण्यासाठी ही गोष्ट आहे.

आपली ध्येयं कोणती आहेत, त्यावर आपण कसं काम केलं पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या रोजनिशी मधून मिळतील. डायरी लिहिल्याने मनावरील ताण सुद्धा कमी होतो.

दिवसभर कोणती कामं झाली, कोणती बाकी आहेत हिशोब ठेवण्यासाठी डायरी लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी दिवसभरातील घडामोडींची नोंद करण्याची सवय लावा.

 

३) आरोग्याची काळजी घ्या

 

suppelment-inmarathii

कॉलेजकाळात आपण आपल्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतो. अभ्यास, मित्र, मज्जा-मस्ती याकडे आपलं जास्त लक्ष असतं. कॉलेज संपल्यानंतर लगेच नोकरी शोधण्याची घाई असते.

आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की, आपण आपल्या तब्येतीची हेळसांड करतो. एक लक्षात घ्या, जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही इतर १०० गोष्टी करू शकता. त्यामुळे, आरोग्याची योग्य काळजी घ्या.

भरपूर पाणी प्या. सकस आहार घ्या. जेवणाची वेळ चुकवू नका. आहारात पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश करा. बाहेरचं खाणं टाळा.

 

४) व्यायाम करा

 

Exercise Inmarathi

 

व्यायाम करणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे ही गोष्ट आपल्याला माहित आहेच, पण तरीही आपण व्यायाम करायचा कंटाळा करतो. शरीराला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर व्यायाम हा आवश्यक आहेच.

व्यायाम म्हणजे दिवसातून तुम्ही दोन तास जिमला गेलंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरबसल्या काही ठराविक योगासनं करू शकता. दिवसातून १० मिनिटं चालणं हादेखील एक उत्तम व्यायाम आहे.

ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर न करता तुम्ही जिन्याचा उपयोग करू शकता. एवढंच नव्हे तर अगदी खुर्चीत बसून पण तुम्ही विविध प्रकारचे व्यायाम करू शकता. याने तुमच्या स्नायूंना बळकटी मिळेल.

 

५) नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा

 

chichore inmarathi

अनेकांना नवीन लोकांमध्ये मिसळण्याची भीती असते. आपण एखाद्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर ते आपल्याविषयी काय विचार करतील, त्यांना आपण आवडू की नाही असाच विचार आपण करतो.

कधीकधी ही भीती एवढी मोठी असते की आपण नवीन लीकांनमध्ये जातच नाही. नवीन मित्र जमवण्याचा प्रयत्नच करत नाही. जुन्या मित्रांमध्ये राहणं ही गोष्ट प्रत्येकालाच आवडत असते, पण जुन्या लोकांसोबत नवीन मित्र जोडणं महत्त्वाचं आहे.

नवीन मित्र जमावल्याने आपण वेगळे विचार करायला शिकतो. एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. पब्लिक स्पिकिंग स्किल्स सुधारतात. या गोष्टीचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल.

 

६) मेहनत करण्याची तयारी ठेवा

 

Hardwork Inmarathi

 

यश ही सहज मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागते. जर तुम्हाला चाळीशीत सुखी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला आता मेहनत घेणं भाग आहे. मेहनतीत चिकाटी आणि सातत्य ठेवा. 

आपल्या डोळ्यांसमोर एकच ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या साधनेचा विचार करा. पुढे मिळणाऱ्या चिरकाल सुखासाठी तुम्हाला आता कदाचित काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. त्याचं दुःख करून घेऊ नका.

आयुष्यात काहीतरी असामान्य करायचं असेल तर मेहनत ही घ्यावीच लागते. त्यामुळे मेहनतीशिवाय पर्याय नाही ही गोष्ट मनात पक्की रुजवा. आळस हा येणार येणार आहे, पण तो झटकून तुम्ही कामाला लागू शकलात तर त्यातच तुमचं खरं यश आहे.

 

७) लोकांना खोट्या आशा दाखवू नका

false hopes inmarathi

 

बऱ्याच लोकांना “नाही” म्हणता येत नाही. आपल्या नाही म्हणण्याने समोरची व्यक्ती दुखावली जाईल असा विचार ते करतात आणि स्पष्ट शब्दात नाही न सांगता समोरच्याला आशा देतात.

असं वागणं म्हणजे आजचा मृत्यू उद्यावर ढकलण्यासारखं आहे. त्यामुळे एखादी गोष्ट जर तुम्हाला जमणार नसेल तर त्याबाबत समोरच्याला स्पष्ट सांगा. कोणाच्याही अपेक्षांचं ओझं घेऊ नका.

आपल्याला एखादी गोष्ट जमणार आहे की नाही याचा विचार करा आणि मगच ती गोष्ट करा. जमणार नसल्यास समोरच्याला स्पष्टपणे आणि विनम्रतेने “नाही” सांगा. “नाही” म्हणण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका.

 

८) आर्थिक बाबींकडे लक्ष द्या

 

saving inmarathi

 

चाळीशीत जर तुम्हाला काम करण्याची इच्छा नसेल तर तेव्हा सुखी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला आजपासून पैसे साठवावे लागतील.

फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फन्ड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

चाळीशीनंतर सुखी आयुष्य जगायचं असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?