' सिंगल पेज रेझ्युम असावा का, असेल तर कसा असावा? जाणून घ्या १००% यशस्वी करणाऱ्या सिंगल पेज रेझ्युमच्या बेसिक टिप्स..!

सिंगल पेज रेझ्युम असावा का, असेल तर कसा असावा? जाणून घ्या १००% यशस्वी करणाऱ्या सिंगल पेज रेझ्युमच्या बेसिक टिप्स..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नोकरीच्या मुलाखतीला जाण्याआधी तयारी करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे तुमचा रेझ्युम. तुमची संपूर्ण माहिती अपडेटेड स्वरूपात मुलाखत घेणाऱ्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आणि त्या व्यक्तीवर पहिल्याच भेटीत छाप पाडण्यासाठी हा रेझ्युम उपयोगाचा ठरतो.

मात्र पहिल्यांदा मुलाखत देणाऱ्यांना योग्य रेझ्युम कसा असावा? याची योग्य माहिती मिळत नाही. बऱ्याचदा भरपूर माहिती आणि एका पेक्षा जास्त पानांचा रेझ्युम तयार करून मुलाखतीच्या वेळी तो सादर केला जातो. मात्र दुर्दैवाने चांगला रेझ्युम असूनसुद्धा केवळ मोठा असल्याने तो मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीकडून वाचला जात नाही.

 

one_page_resume inmarathi
skillroads.com

 

वेळेअभावी, त्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रेझ्युम हा एका पानाचा असावा आणि त्याची मांडणी आकर्षक असावी असं तज्ञांचं मत आहे. रेझ्युम कसा असावा, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, आदर्श रेझ्युम म्हणजे काय, १००% यशस्वी करणारा रेझ्युम तयार करण्यासाठी काही बेसिक टिप्स जाणून घेऊया..

करिअर बिल्डरद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ६५% एचआर किंवा नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांची पसंती ही एका पानाच्या रेझ्युमला असते. अनेकदा दोन किंवा त्यापेक्षा जास्त पानाची माहिती असणाऱ्या उमेदवाराचा रेझ्युम बघितलासुद्धा जात नसल्याची नोंद यामध्ये दिसून येते. आठ ते दहा वर्षांचा अनुभव तसेच विविध पुरस्कार आणि इतर माहिती असल्यास एका पानापेक्षा मोठा रेझ्युम योग्य ठरतो.

मात्र, अनेकदा दोन तीन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारसुद्धा भरपूर माहिती मांडण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात मोठा रेझ्युम तयार करतात. प्रत्यक्षात एक पानाचाच रेझ्युम असणे योग्य ठरते. अनेकदा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुमचा रेझ्युम पाठवल्यानंतर तीन चार अधिकाऱ्यांकडे तो पाठवला जातो, त्याचबरोबर अनेकदा या सर्व रेझ्युमच्या प्रिंटआउट काढल्या जातात.

या सर्व घटकांचा विचार करता रेझ्युम एका पानाचा असणे आवश्यक ठरते.

 

good resume inmarathi
UX collective

 

आवश्यक माहितीचा समावेश

 

good resume inmarathi 1

 

अनेकदा नोकरीचा विचार न करता संपूर्ण माहिती शेअर करण्याचा प्रयत्न रेझ्युममध्ये केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या आयटी कंपनीतील नोकरीसाठी तुमच्या सांगितिक ज्ञानाचा उपयोग होणार नाही तरीही त्याचा समावेश अनेक जण रेझ्युममध्ये करतात. त्यामुळे विनाकारण रेझ्युम मोठा होतो.

त्यामुळे केवळ आवश्यक माहितीचा समावेश रेझ्युममध्ये केला पाहिजे. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, इतर कौशल्य आणि एखाद्या कंपनीसाठी तुम्ही योग्य उमेदवार कसे याचा समावेश एका पानाच्या रेझ्युममध्ये असला पाहिजे.

 

सिंगल पेजच का?

 

good resume inmarathi 2
wise step

 

कल्पना करा की, तुम्ही एका कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जात आहात, त्यावेळी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला दिवसभरात अनेकांची मुलाखत घ्यायची आहे. अशावेळी एका पानाच्या रेझ्युमवर नजर टाकून चटकन मुलाखतीसाठी आलेल्याची सविस्तर माहिती मिळवणे शक्य होते.

याशिवाय अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती एका पानामध्ये व्यवस्थित मांडणी करून मांडणे शक्य असते त्यामुळे एकाच पानाचा रेस्युम शक्यतो असावा.

 

पॅराग्राफचा वापर नको

 

Use-bullet-points-on-resume inmarathi
wisestep

 

रेझ्युममध्ये स्वतःबद्दलची माहिती समाविष्ट करताना सलग लेखन करण्यापेक्षा सोप्या पद्धतीने मांडणी करणे आवश्यक आहे. एकसंध पॅराग्राफचा वापर टाळून त्याऐवजी बुलेटस , नंबर्स, टेबल्स याचा वापर करून आकर्षक मांडणी करणे आवश्यक आहे.

पॅराग्राफचा वापर करून लेखन केल्यावर तुमच्या रेझ्युममधील महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष जात नाही. शिवाय रेझ्युम मोठासुद्धा वाटतो त्यामुळे शक्यतो लेखन करताना पॅराग्राफचा वापर टाळला पाहिजे.

 

तुमच्या स्किल्सचा समावेश

 

job interview featured
Sage SkillsMap

 

एखाद्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी तुम्ही योग्य उमेदवार आहात हे पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या स्किल्स तुमच्या रेस्युममध्ये उत्तमप्रकारे मांडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वतंत्र सेक्शनकरून तुमच्यातील स्किल्स, तुम्हाला अवगत असलेले ज्ञान, त्यासाठी घेतलेले प्रशिक्षण याची मांडणी केली पाहिजे.

व्यवस्थित पद्धतीने तुमच्या स्किल्सचा समावेश केल्यावर निवड करणाऱ्या व्यक्तीला तुमच्यातील गुणांची माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे योग्य उमेदवार म्हणून निवड होण्यासाठी निश्चितच तुम्हाला मदत होऊ शकते.

तुमच्या क्षमता त्याचबरोबर तुमच्या कामाचे ज्ञान तसेच तुमच्यातील वैशिष्ट्ये आणि तुम्ही एखाद्या जागेसाठी कसे योग्य आहात याबद्दलची माहिती कंपनीला तुमच्या रेझ्युममध्ये व्यवस्थित मिळण्याची आवश्यकता आहे.

 

उपलब्ध लेआऊट आणि  वापर

 

resume-design-template-minimalist-cv-business-layout-vector-job-applications_inmarathi

 

सध्याच्या घडीला तुमचा रेझ्युम आकर्षक आणि चांगला दिसावा यासाठी इंटरनेटवर चांगले लेआऊट आणि सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. या लेआऊटचा वापर करून तुम्ही कमी जागेमध्ये आकर्षक पद्धतीने मांडणी करून तुमचा रेझ्युम सजवू शकता. यासाठी इंटरनेटवर अनेक लेआउट मोफत उपलब्ध आहेत.

रेझ्युम ठराविक पद्धतीमध्येच असावा, किंवा त्याची रचना विशिष्ट असावी असा कोणताही नियम नाही. त्यामुळे आवश्यक माहिती उत्तमप्रकारे मांडण्यासाठी या तयार लेआऊटचा वापर करता येऊ शकतो.

मात्र याचा वापर करताना वापरले जाणारे फॉन्ट, त्यातील रंगसंगती याचाही विचार करून वापर केला पाहिजे. त्याचबरोबर सर्वत्र सहज उपलब्ध असतील अशा Arial , Times New Roman अशा फॉन्टचा वापर केला पाहिजे. 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

१) रेझ्युम शक्यतो ए४ साईजमध्ये तयार करावा.

२)  झूम न करता स्पष्ट वाचता येईल असा फॉन्ट साईझ आणि फॉन्ट रेझ्युमसाठी वापरावा.

३) रेझ्युममध्ये आवश्यक तितकीच माहिती समाविष्ट केली पाहिजे , मांडणी मुद्देसूद मांडली पाहिजे.

४) कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याची कला रेझ्युमसाठी आवश्यक आहे.

५) व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका रेझ्युममध्ये टाळाव्यात.

६) रेझ्युम तयार केल्यानंतर इमेल करताना तो पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवावा यामुळे तुमची माहिती समोरच्या व्यक्तीला बदलता येत नाही. जर कंपनीकडून वर्ड स्वरूपामध्ये टेक्स्ट फाईल मागितली असेल तरच रेझ्युम डॉक्युमेंट स्वरूपात शेअर करावा.

७) रेझ्युममध्ये शेवटी तारखेचा उल्लेख असावा, यामुळे भविष्यात अपडेट करताना तुम्हाला माहिती मिळवणे सोपे जाते.

 

resume inmarathi
cleverism.com

 

थोडक्यात एका पानाचा, योग्य मांडणी केलेला आणि उत्तम रचना केलेला रेझ्युम हा आदर्शमानला जातो.

त्यामुळे वर मांडलेल्या मुद्द्यांचा योग्य विचार करून तयार केलेला रेझ्युम तुम्हाला नोकरीच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. रेझ्युम म्हणजे आपली ओळख असते.

बायोडेटाच्या माध्यमातून ती व्यक्ती कशी आहे ह्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे ते चित्र अधिकाधिक प्रभावशाली बनवणे महत्त्वाचे ठरते.

कित्येक वेळा उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही बायोडेटा नीट बनवता न आल्याने नोकरीची संधी हातून जाते. त्यामुळे उत्तम आणि आकर्षक रेझ्युम तयार करून लोकांसमोर मांडला पाहिजे हे नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?