' अर्धवट स्क्रिनशॉट काढताय..? जाणून घ्या, “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या सोप्या स्टेप्स..  – InMarathi

अर्धवट स्क्रिनशॉट काढताय..? जाणून घ्या, “फुल-पेज” स्क्रिनशॉट काढण्याच्या सोप्या स्टेप्स.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्या मोबाईलचा जमाना आहे. मोबाईल नसताना कोणाला कॉल करायचा असेल तर आपण लँडलाईन फोन वापरायचो. एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर कॅलेंडरवर लिहून ठेवायचो. एवढंच नव्हे तर घरात सामानाची यादी करायला वेगळी वही असायची.

हिशोबांसाठी कॅल्क्युलेटर असायचं, व्हिडीओ कॉलसाठी लॅपटॉप किंवा वेबकॅमचा ऑप्शन होता पण, आता या सगळ्या गोष्टी एकाच मोबाईलवर करणं शक्य झाला आहे.

 

using Mobile while eating InMarathi

 

फक्त वर सांगितलेल्या गोष्टीच नाही तर आपण हल्ली शॉपिंगसुद्धा मोबाईलवरच करतो. घरातल्या वाणसामानापासून ते अगदी दिवाळीच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी मोबाईलद्वारे ऑर्डर करता येतात. मोबाईलमुळे सगळं जग जवळ आलं आहे ही मात्र खरी गोष्ट आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

याच मोबाईलमधली सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे “स्क्रिनशॉट”. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला एखादी गोष्ट दाखवायची असेल तर आपण पटकन “स्क्रिनशॉट” काढून पाठवतो. एवढंच नव्हे तर जी गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि भविष्यात उपयोगी पडणार आहे अशा माहितीचाही आपण “स्क्रिनशॉट” काढून ठेवतो.

स्क्रिनशॉट म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून मोबाईलच्या स्क्रीनचा त्याने स्वतः काढलेला फोटो म्हणता येईल पण, प्रत्येक फोनमध्ये स्क्रिनशॉट काढण्याची पद्धत वेगळी आहे.

mobile-inmarathi02
surepointspy.com

 

बऱ्याच मोबाईल फोन्समध्ये आवाज वाढवण्याचं आणि पॉवरचं बटण एकत्र दाबलं की स्क्रिनशॉट येतो. हल्लीच्या फोन्समध्ये “स्क्रिनशॉट” असा वेगळा ऑप्शन पण आहे.

 

take-screenshot-iphone-x inmarathi

 

कित्येकवेळेस असं होतं की, सिंगल स्क्रीनचा स्क्रिनशॉट पुरत नाही. फुल-स्क्रीन किंवा स्क्रोलिंग स्क्रीनशॉटची गरज असते. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीपेक्षा वर किंवा खाली स्क्रोल केल्यावर जे संभाषण दिसतं त्याचा एकच स्क्रिनशॉट आपल्याला काढता येतो.

OnePlus किंवा Xiaomi च्या फोन्समध्ये फुल-पेज स्क्रिनशॉट काढण्याची सोय आहे, पण ज्यांच्या मोबाईलमध्ये ही सोय नाही ते काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करून फुल-पेज स्क्रिनशॉट काढू शकतात…जाणून घेऊया या सोप्या स्टेप्स.. 

 

screenshot inmarathi
youtube.com

 

१) प्ले- स्टोअरवर फुल-पेज स्क्रिनशॉट घेण्याचे अनेक अ‍ॅप्स आहेत. त्यातील LongShot हे अ‍ॅप डाउनलोड करा.

२) ते अ‍ॅप उघडल्यानंतर, अ‍ॅपला स्टोरेज वापरण्याची अनुमती द्या.

 

screenshot inmarathi 2

३) Auto Capture वर क्लिक करून नंतर ओके दाबा.

४) ‘Use service’ वर क्लिक करून नंतर Allow दाबा.

५) blue capture बटणावर क्लिक करून “Start Now” म्हणा.

६) ज्याचा स्क्रिनशॉट काढायचा आहे त्या स्क्रीनवर जा.

७) Start केल्यानंतर आपोआपच स्क्रीन स्क्रोल होईल.

 

scrolling screenshot inamarathi

 

८) लॉंगशॉट मिळाल्यानंतर फोनच्या वरच्या बाजूला क्लिक करा.

९) सेव्ह करण्याआधी तुम्हाला लॉंगशॉट ऍडजस्ट करता येईल.

१०) सेव्ह बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेज सेव्ह करता येईल.

 

सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये कसा घ्यावा “फुल-पेज” स्क्रिनशॉट ..?

 

samsung inmarathi
pocket lint

 

Galaxy S8, Galaxy S9 या फोन्समध्ये लॉन्ग स्क्रिनशॉट घेण्याची सोय आहे. त्यासाठी पुढील स्टेप्स बघा..

१) Advanced settings मध्ये जाऊन Smart capture ऑन करा.

२) ज्या स्क्रीनचा स्क्रिनशॉट घ्यायचा आहे तिथे जा आणि नंतर नॉर्मल आपण जसे स्क्रिनशॉट घेतो तसा घ्या.

३) त्यानंतर स्क्रीनच्या खाली येणाऱ्या Scroll capture वर क्लिक करा.

४) तुम्हाला जिथपर्यंतचा तिथे पोहोचेपर्यंत Scroll capture दाबत राहा.

 

LG स्मार्टफोनमध्ये असा घ्या “फुल-पेज”  स्क्रिनशॉट.. 

 

LG inmarathi
LG

 

LGच्या G6 पासून पुढील फोन्समध्ये फूल पेज स्क्रिनशॉट घेता येतो.

१)  तुमच्या आवडीचे वेब पेज ओपन करा.

२)  नोटिफिकेशन बार खाली घेऊन Capture + दाबा.

३) वेब पेजवर परत येऊन उजव्या कोपऱ्यात खाली Extended सिलेक्ट करा.

४) आता स्क्रीन स्क्रोल होईल. तुम्हाला हवी ती माहिती मिळाली की, तुम्ही ही प्रक्रिया थांबवू शकता.

५) डाव्या हाताला वरती सेव्हचा ऑप्शन येईल.

लॉन्गशॉट कसा घ्यावा या प्रश्नाचं उत्तर या लेखातून नक्कीच मिळालं असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?