' हुशार असणारे लोकही अयशस्वी होतात, कारण या ८ गोष्टी त्यांना सतत मागे खेचतात..!

हुशार असणारे लोकही अयशस्वी होतात, कारण या ८ गोष्टी त्यांना सतत मागे खेचतात..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यश कोणाला नको असतं? आपण करत असलेले प्रयत्न ही यशस्वी होण्यासाठीच असतात, पण आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर माणूस अडखळतो, यशाच्या अगदी जवळ जाऊन पुन्हा शून्यावर येतो.

बऱ्याचदा तर असंही होतं की, आपण यश प्राप्त करतो, पण ते टिकून राहत नाही. यशाच्या शिखरावर जाऊन आपण अचानक खाली येतो.

यश सगळ्यांनाच हवं असतं, पण प्रत्येक वेळेस आपण यशस्वी होतोच असं नाही. अपयशी झाल्यानंतर अनेक माणसं खचून जातात. आजूबाजूच्या परिस्थितीला अपयशासाठी जबाबदार धरतात. हा माणसाचा मूळ स्वभाव आहे.

अपयश हाताळणं सोप्पं काम नाही. परीक्षेत वगैरे जरा कमी मार्क्स मिळाले तर, ‘तो काही फार हुशार नाहीये रे..’ असे डायलॉग आपल्याला ऐकू येतात. यशस्वी होणारी माणसंच हुशार असतात असा आपला साधारण समज आहे. परीक्षेत चांगले मार्क्स मिळावले म्हणून कोणीही हुशार होत नाही ही गोष्ट आपण विसरतो.

 

Failure in Business

 

“हुशार माणसांना कधीच अपयशाला सामोरं जावं लागत नाही”, “त्यांना कायम जिंकण्याचीच सवय असते” अशा आपल्या अनेक समजुती आहेत, पण खरी परिस्थिती मात्र वेगळीच आहे.

हुशार माणसं सुद्धा अपयशी होतात.. जाणून घेऊया त्यामागची कारणं..

१) नवीन मित्र न बनवणं

 

rang de basanti inmarathi

 

प्रत्येकाचेच लहानपणीपासूनचे मित्र असतात. ज्या लोकांना आपण आधीपासून ओळखतो त्यांच्यासोबत राहणं सोप्पं असतं. आपल्याला एकमेकांच्या सवयी माहिती असतात. अशा लोकांच्या आसपास वावरणं आपल्यासाठी सवयीचं असतं.

जुनी नाती महत्त्वाची असली तरी नवीन नाती जोडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जुन्या लोकांच्या संगतीत राहून आपण नवीन विचार करत नाही. तेच विषय पुन्हा पुन्हा उगाळले जातात.

नवीन लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या जुन्या गोष्टीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. नवीन कल्पना सुचतात. त्यामुळे, नवीन लोकांशी ओळखी वाढवणं गरजेचं आहे

२) परिस्थितील बदलाशी जुळवून न घेणं

 

change inmarathi

 

आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही सतत बदलत राहणारी आहे. ती कायम बदलणार आहे हे सत्य आपण मान्य केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण एकाच वातावरणात राहत असतो म्हणून या बदलाची आपल्याला सवय नसते.

परिस्थितीनुसार बदलणं गरजेचं आहे. नवीन परिस्थितीत आपल्याला नवीन कल्पना सुचू शकतात. त्यामुळे, बदलांना नाकारण्यापेक्षा त्या बदलात आपण आणखी कोणते प्रयत्न करू शकतो हा विचार करणं योग्य आहे.

परिस्थिती प्रत्येकवेळेसच अनुकूल असेल असं नाही, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. या बदलांमधूनच अनेक संधी उपलब्ध होतात.

३) प्रात्यक्षिकापेक्षा ते पुस्तकी ज्ञानावर भर देतात

 

history reaading inmarathi

 

आपल्याकडे “वाचाल तर वाचाल” असं म्हटलं जातं. ही म्हण योग्यच आहे. विविध विषयांवरील पुस्तकं ही वाचायलाच हवीत. पुस्तकांमुळे जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. ज्ञानात भर पडते.

ही गोष्ट खरी असली तरीही पुस्तकी ज्ञान आणि खऱ्या जगात खूप फरक आहे. पुस्तकी ज्ञानापुरतेच मर्यादित राहू नये. जगातील व्यवहाराची जाण असणं महत्त्वाचं आहे.

===

हे ही वाचा – टेन्शनमध्ये आहात? कठीण प्रसंगात मन शांत, एकाग्र ठेवण्याच्या ६ टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील

===

४) स्वतःच्या क्षमतांवर ते विश्वास ठेवत नाहीत

हुशार माणसं अनेकदा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाहीत. स्वतःला कमी लेखतात. स्वतःच चुकीचं समीक्षण करतात.

 

startup failed-marathipizza

 

खरंतर, स्वतःचं ध्येय मिळवण्याची क्षमता त्यांच्यात असते, पण ‘मी हे करूच शकणार नाही, माझ्याकडून पूर्ण होणार नाही.’ असा विचार ते करतात आणि सगळंच गमावून बसतात.

प्रत्येक गोष्ट योग्यच झाली पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो. ही गोष्ट वाचायला खूप छान वाटते, पण प्रत्यक्षात मात्र या गोष्टीचे वाईट परिणाम जास्त होतात. “प्रत्येक गोष्ट ठविक पद्धतीनेच झाली पाहिजे” या हट्टापायी माणसाची प्रगती खुंटते.

नकारात्मक विचार करण्यापेक्षा “मी करेन” असं सतत स्वतःला बजावा.

५) ते एका निश्चयावर ठाम राहत नाहीत

 

too-many-goals-med-web inmarathi

 

एखादी व्यक्ती मुळातच हुशार असेल आणि कष्ट घेणारी असेल तर त्या व्यक्तीच्या समोर अनेक संधी उपलब्ध असतात. स्वबळावर ती व्यक्ती कुठेही आपलं स्थान निर्माण करू शकते.

वाचताना ही गोष्ट खूप छान वाटते, पण जी व्यक्ती ही अनुभवते तिलाच यामागचा त्रास समजू शकतो. आपल्यासमोर अनेक गोष्टी करण्यासारख्या असल्या की नेमकी कोणती गोष्ट करावी हे आपल्याला सुचत नाही.

“सगळ्याच गोष्टी ट्राय करून बघू” या नादात एकही गोष्ट धड होत नाही आणि आपल्याला समजत नाही की, आपण नेमकं कशात आपले १००% प्रयत्न दिले पाहिजेत. एका निर्णयावर ठाम न राहता सतत बदलण्याची सवय मनाला लागते.

६) चुका टाळण्याचा प्रयत्न

 

mistake inmarathi 1

 

चूक ही माणसासाठी उत्तम शिक्षिका असते. त्यामुळे, चुकांकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. “आपल्या हातून चूक झाली म्हणजे खूप मोठं काहीतरी पाप घडलं” असं त्यांना वाटतं.

“आपण हुशार आहोत तरीही आपल्याकडून कशी चूक झाली?” याचाच ते जास्त विचार करतात. त्या चुकांमधून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवत नाहीत. चूक सुधारून पुढे प्रयत्न करण्यातच खरं यश सामावलेलं आहे.

===

हे ही वाचा – आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं स्वतःत रुजवून घेतलीत तर जीवनात अशक्य काहीच नसेल

===

७) ते खूप विचार करतात

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करणं योग्यच आहे, पण अती विचार माणसासाठी घातक आहे. हुशार माणसं अनेकदा ही चूक करतात आणि अपयशी होतात.

फार खोलात जाऊन विचार केल्याने आपण फक्त विचारच करत राहतो. ती गोष्ट कृतीत उतरवत नाही. त्यामुळे कमी विचार आणि जास्त प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

नको त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलण्यात काहीच अर्थ नसतो.

 

frustrated women inmarathi

 

८) ते रिस्क घेत नाहीत

 

 

जेव्हा आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात तेव्हा आपण त्यातला सुरक्षित पर्याय निवडतो. हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे हुशार माणसं फार रिस्क घेत नाहीत. समोर जे काम आहे तेच चांगल्या पद्धतीने करून आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन ठेवतात.

जर तुम्हाला असामान्य काम करायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःच्या सुरक्षित कोशातून बाहेर येण्याची गरज असते. रिस्क प्रत्येक गोष्टीत आहे. ती घेतली तरच आपण हातातली गोष्ट न गमावण्यासाठी प्रयत्न करू.

बऱ्याचदा असंही दिसून येतं की, हुशार माणसांचा EQ कमी असतो. ते स्वतःच्या भावना पूर्णपणे ओळखू शकत नाहीत. हेही त्यांच्या अपयशाचं कारण आहे.

===

हे ही वाचा – सावधान : तुम्ही नेहमी अपयशी ठरणाऱ्या या १३ प्रकारच्या व्यक्तींपैकी तर नाही आहात ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?