' सूट-बूट-जॅकेट…! “नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करतं?” – InMarathi

सूट-बूट-जॅकेट…! “नरेंद्र मोदींच्या कपड्यांवर सरकार किती खर्च करतं?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कपड्यांवरून अनेकदा समोरची व्यक्ती कशी असेल? याचं अनुमान आपण काढत असतो. पांढरा इस्त्री केलेला कुर्ता घालणारी एखादी व्यक्ती दिसली तर ही व्यक्ती नक्कीच राजकारणातील असावी असं तर्क आपण बांधतो.

राजकारणातील नेत्यांचे कपडे पाहून अनेकदा प्रश्न पडतो की या कपड्यांचा खर्च कोण करत असेल? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत तर हा प्रश्न कायमच पडतो.

नरेंद्र मोदी यांचे कपडे हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. गुगलवर जाऊन “नरेंद्र मोदी” असं सर्च केल्यास समोर जे फोटो येतात त्यातून जाणवेल की ते कोणतेच कपडे पुन्हा घालत नाहीत. त्यांच्या प्रत्येक फोटोमधील कपडे हे वेगळे असतात.

नरेंद्र मोदी यांचे सूट, कुर्ता, जॅकेट्स हे कायमच लक्ष वेधून घेतात. पण, हा सगळं खर्च नेमका कोण करतं? असा प्रश्न आपल्याला पडतो. या लेखामार्फत जाणून घेऊया, या खर्चामागचं नेमकं गौडबंगाल ..

 

Indian express

पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी जो सूट घातला होता त्यावरून बरीच चर्चा झाली होती.

बंद गळ्याच्या या सूटवर “नरेंद्र दामोदरदास मोदी” असं पूर्ण नाव गोल्डन एमब्रॉडरीमध्ये लिहीलं होतं. हा सूट महाग असणार हे बघूनच लक्षात येत होतं.

 

The hindu business line

 

हा सूट आणि त्याची किंमत हा वादाचा विषय झाला होता. सोशल मीडिया आणि अनेक वृत्तपत्रांवर या सूटच्या किंमतीविषयी चर्चा झाल्या होत्या. या सूटला हाती धरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका सुद्धा केली होती. मोदी सरकार “सूट बूटवाली” सरकार आहे असं ते म्हणाले होते.

‘भारताच्या पंतप्रधानांनी चांगले कपडे परिधान केले तर इतर देशांपुढे भारताची प्रतिमा चांगली उभी राहते. नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या डिझायनर सूटचा नंतर लिलाव करण्यात आला. यातून मिळालेले पैसे हे स्वच्छ भारत मोहिमेसाठी देण्यात आले होते.’

– असं भाजपनेते जीवन गुप्ता यांनी सांगितलं होतं.

हा सूट गुजरातचे व्यापारी लालजीभाई तुलसीबाई पटेल यांनी खरेदी केला होता. २०१५ साली झालेल्या लिलावात त्याची किंमत ४ कोटी ३१ लाख ३१ हजार ३११ रुपये इतकी होती. ही किंमत बघून कोणताही सामान्य माणूस थक्कच होईल.

या घटनेला आता अनेक वर्षे उलटून गेली असली तरी, आजही नरेंद्र मोदी यांचे कपडे या चर्चेचा विषय ठरतो. भारताचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असो किंवा प्रचारसभा असोत, आपल्या नीट आणि स्वच्छ कपड्यांनी मोदी वेगळीच छाप पाडतात.

Howdy Modi InMarathi
BBC

 

सामान्य व्यक्ती म्हणून हे सगळे सोहळे बघताना मोदींच्या कपड्यांचा खर्च किती असेल? किंवा तो कोणत्या खात्यातून होत असेल? असे अनेक प्रश्न पडतात. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. माहिती अधिकाराच्या अंतर्गत टाकलेल्या एका अर्जातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खाजगी पोषाखांचा खर्च स्वतः करतात. सरकारी खात्यातून हा खर्च होत नाही असा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. १९९८ पासून आतापर्यंत पंतप्रधानांच्या कपड्यांवर किती पैसे खर्च झाले याची माहिती मिळवण्यासाठी रोहित सब्रवाल यांनी आर.टी.आय अर्ज केला होता.

अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांवर किती पैसे खर्च झाले आहेत याची माहिती मिळवण्यासाठी हा अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या उत्तरातून मोदींच्या कपड्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा खुलासा झाला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

रोहित सब्रवाल यांनी प्रत्येक वर्षी कपड्यांवर केला जाणारा खर्च जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे अर्ज केला होता.

१९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या कपड्यांवर केला गेलेला खर्च तर, २२ मे २००४ ते २६ मे २०१४ या कालावधीत मनमोहन सिंग यांच्या कपड्यांवर किती खर्च झाला याची माहिती जाणून घेण्यासाठी हा अर्ज करण्यात आला होता.

याशिवाय, २६ मे २०१४ ते आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांवर किती खर्च झाला यासंबंधीच्या माहितीची विचारणा सुद्धा या अर्जात करण्यात आली होती. यावेळेस हा खर्च सरकारी खात्यातून होत नाही अशी माहिती समोर आली.

 

MODI AND PUTIN InMarathi

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कपडे पाहून बहुतांश लोकांना असं वाटतं की, त्यांच्या कपड्यांवर केंद्र सरकार प्रचंड खर्च करत असेल. पण, या उत्तरातून हे स्पष्ट झालं आहे. हा खर्च सरकार करत नाही. त्यांच्या खाजगी खात्यातून हा खर्च केला जातो.

खुद्द पंतप्रधान कार्यालयानेच ही माहिती दिली असल्यामुळे अनेक सामान्य माणसांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर मिळालं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?