‘या’ ७ गोष्टी असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया आकर्षित होतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

माणसाचे चांगले दिसणे आणि डोक्याने हुशार असणे हे सर्वांना आवडणारं आणि आकर्षून घेणारं कॉम्बिनेशन आहे. सर्वांना आपला सोबती हा दिसायला चांगला हवा आणि त्यासोबत तो हुशारही हवा असं वाटत असतं.

पण समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी एवढचं हवं असतं का ? तर नाही!

फक्त एवढ्याने होत नसतं. तर तुम्ही कश्याप्रकारे वागता किंवा तुमची बॉडी लॅन्गवेज, पोस्चर हे देखील तेवढंच महत्वाचं ठरते.

त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही असे शास्त्रीय गोष्टी सांगणार आहोत, ज्या तशा तर खूप विचित्र आहेत – पण स्त्रियांवर विशेष प्रभाव टाकतात!

तसेही – आपल्यावर विचित्र गोष्टींचा प्रभाव जसा जास्त होतो तेवढेच हेही खरे आहे.

१. आपली हनुवटी नेहेमी वर ठेवा, ते जास्त मर्दानी दिसतं :

 

Hrithik Roshan looking up InMarathi

रिसर्च नुसार जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमची हनुवटी नेहेमी वर ठेवायला हवी, तेव्हा तुम्ही अधिक मर्दानी दिसता.

आपलं डोकं जरा मागच्या बाजूने वाकवून ठेवणे ह्याला मर्दानी बॉडी लॅन्गवेज समजल्या जातं आणि ते महिलांच्या दृष्टीने अधिक आकर्षक देखील दिसतं.

२. सिमेट्रीकल चेहरा आणि बॉडी देखील फायद्याची ठरेल :

 

सिमेट्रीकल चेहराच नाही तर संपूर्ण बॉडी सिमेट्रीकल असेलं तर ते अधिक आकर्षक ठरतं. कारण चांगली सममिती म्हणजे चांगले जीन्स.

आणि साहजिकच जेव्हा आपण एखाद्याला आपला सोबती म्हणून निवडतो तेव्हा तो परफेक्ट असावा असे सर्वांनाच वाटत असते. त्यामुळे समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी सिमेट्रीकल चेहरा आणि बॉडी देखील फायद्याची ठरू शकते.

३. साधारण चेहरा हा जास्त आकर्षक असतो :

 

attractive men postures-inmarathi07
hindustantimes.com

रिसर्चनुसार सामान्य, सदहार्ण दिसणारे लोक त्या लोकांपेक्षा जास्त आकर्षक असतात जे थोडे वेगळे किंवा युनिक दिसतात.

शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मेंदूमध्ये एक मानसिक डेटाबेस आहे जिथे आपण आपल्या जीवनात जेवढेही चेहरे बघतो ते स्टोर करत जातो. त्यामुळे आपल्याला हे माहित असतं की सामान्य काय आहे आणि तेच आपल्याला आकर्षक वाटत असतं.

४. दाढी आणि केस देखील सामान्य ठेवा :

 

Aakash Thosar Inmarathi

शास्त्रज्ञांच्या मते खूप मोठी दाढी हे आकर्षक नसतं. खूप मोठी दाढी असणे हे पुरुषत्व आणि आक्रमकता दर्शवते. तर त्याएवजी किंचित वाढलेली दाढी ही पूर्ण दाढी किंवा क्लीन शेव लुक पेक्षा अधिक आकर्षक दिसते.

५. घाम एक चांगला कामोत्तेजक आहे :

 

Virat Kohali InMarathi

घाम ह्याला पुरुषत्वाचा सूचक समजल्या जाते. घामाने भिजलेल्या पुरुषांकडे स्त्रिया आकर्षून जातात. घाम हा स्त्रियांमधील कामोत्तेजक भावना निर्माण करण्याचं काम करतो.

६. हसू नका :

 

Pavan Kalyan InMarathi

शास्त्रज्ञांच्या मते हसणाऱ्या चेहेऱ्यापेक्षा स्त्रियांना गंभीर वा रागीट चेहरे जास्त आवडतात. त्या अश्या पुरुषांकडे आकर्षिल्या जातात. कारण गंभीर आविर्भाव – हे वर्चस्व दर्शविते जे स्त्रियांना खूप आवडते.

७. चेहऱ्यावरील व्रण हे अधिक आकर्षक असतात :

 

Irfan Khan InMarathi

स्त्रियांना व्रण असलेले पुरुष जास्त आवडतात. कारण त्यावरून हे कळून येते की समोरच्याचे जीवन हे साहसी असेल, मग ते व्रण बाथरूममध्ये घसरून पडल्याने का लागलेले नसो, पण स्त्रियांना ते आवडतात.

अर्थात, ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की तुम्ही स्त्रियांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला दुखापत करवून घ्यावी…! 😀

तरी – ह्या काही गोष्टी जर तुमच्यात असतील किंवा जर तुम्ही तसे वागत असाल, तर तुम्ही स्त्रियांना नक्की आकर्षक वाटाल.

आता प्रत्येकाने यातील काय काय आपल्यात आहे – वा – आणता येईल – याचा विचार करावा. त्यानुसार आपली पर्सनॅलिटी तयार करावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?