' २ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याची किमया करणारा महाराष्ट्राचा शेतकरी! – InMarathi

२ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याची किमया करणारा महाराष्ट्राचा शेतकरी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही वर्षांपासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अगदी हतबल झाला आहे. जणू दुष्काळ त्याच्या पाचवीलाच पुजला आहे. पाणी नाही त्यामुळे शेती नीट नाही आणि शेती नाही त्यामुळे कुटुंबाचे हाल होतायत अश्या दुष्टचक्रात अडकलाय आपला बळीराजा! सरकारी मदतीचा देखील काही भरवसा नाही.

मिळाली तर ठीक नाहीतर आपलं ढकलगाडं सुरूच आहे. अश्या परिस्थितीमध्ये खुद्द शेतकऱ्यांनी स्वत: पाऊल उचलुन हा दुष्काळाचा राक्षस चिरडून टाकावा असे आवाहन करण्यात येत होते आणि त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही मदतीविना महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांनी अशी किमया करून दाखवली आहे ज्याचे कौतुक करावे तेवढे कमीच!

आता सांगोला तालुक्यातील अनिरुद्ध पुजारी यांचे उदाहरण घ्या! महाराष्ट्राच्या या उमद्या बळीराजाने २ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

 

aniruddh-pujaari-marathipizza01

स्रोत

सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सांगोला तालुक्यातील देवधर धरणाबाबत अनेक वाद सुरु आहते. त्यातील पाणी मिळावे म्हणून अनेक जण न्यायालयाच्या पायऱ्या घासत आहेत. २००८ सालापासून सरकारने येथील सिंचन अधिकृत केले खरे पण अवघ्या दोन दिवसाच्या रोटेशन मध्ये पाणी साठवायचं कसं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. पण या यक्ष प्रश्नातून मार्ग काढीत अनिरुद्ध पुजारी यांनी मात्र कोणत्याही यंत्राचा वापर न करता २ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवून अविश्वसनीय किमया साध्य केली.

पुजारी यांच्या पाणी वाटप संस्थेतील २७० शेतकऱ्यांनी थेट शेतीला पाणी दिले, तर काहींनी विहिरीत पाणी सोडलं. पुजारी यांनी मात्र नैसर्गिक उतारावरील जमीन निवडून ११५ मीटर लांबीचे शेततळे आणि ४१४ मीटर लांबीचा मोठा कालवा बनवून घेतला. तळं बनवताना खोदलेली माती काढून त्याचे ८ मीटर खोल तळं बनवले. तळ्यात आणि कालव्यात कागद टाकून पाणी साठवण्याची व्यवस्था केली.

 

aniruddh-pujaari-marathipizza02

स्रोत

देवधर धरणाचे पाणी येताच नैसर्गिक उताराने हे पाणी थेट पुजारी यांनी बनवलेल्या कालव्यातून तळ्यात जमा झाले. यामुळे सध्या २ एकर क्षेत्राच्या तळ्यात साडेतीन कोटी लिटर आणि दीड एकर मोठ्या कालव्यात अडीच कोटी लिटर पाणी साठले. हे शेततळे बनविताना पुजारी यांना कागदासाठी २३ लाख आणि खोदकामासाठी ९ लाख रुपये खर्च आला. पण आता पुजारी यांच्या ५० एकर शेतीला ठिबकच्या साहाय्याने १५० दिवस हे पाणी पुरणार आहे. यात १५ एकर शेवगा, २५ एकर डाळिंब, १५ एकर द्राक्षे, कलिंगडे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात लावला आहे.

दुष्काळामुळे पाणी नाही म्हणून रडत न बसता स्वत:हून कृती करत भविष्यातील फायद्याच्या दृष्टीने अनिरुद्ध पुजारी यांनी साधलेल्या या किमयेचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्यासारखा आहे.

महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी जेव्हा स्वत:हून दुष्काळ विरोधात दोन हात करण्यासाठी पुढे सरसावेल तेव्हाच येणाऱ्या काळात बळीराजाला सुगीचे दिवस येतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?