चिप्स पॅकेटमध्ये हवा भरण्यामागचं रंजक कारण!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
टाईमपाससाठी काही खायचं असेल तर आता शेंगदाणा चण्यांचा जमाना मागे पडला. आता लोक टाईमपास फूड म्हणून चिप्सला पसंती देतात. एकतर त्यांची किंमत देखील अवघी ५-१० रुपये असते, त्यामुळे खिशाला कात्रीही लागत नाही आणि तोंडाला चमचमीत चव देखील मिळते. पण अश्या या चिप्स पॅकेट्सबद्दल लोकांच्या मनात एकच नाराजी असते, ती म्हणजे चिप्स पॅकेट्स असतात मोठे पण त्यात अगदी हातात मावतील एवढेच चिप्स असतात बाकी तर सगळी हवा भरलेली असते. पण तुम्हाला माहित आहे का चिप्स पॅकेट्समध्ये हवा भरण्यामागे देखील एक कारण आहे. चला तर आज हे रंजक कारण जाणून घेऊया!
चिप्सच्या पॅकेट्समध्ये चिप्स कमी आणि हवा जास्त, हे पाहिल्यावर आपण चिप्स कंपनीवर राग व्यक्त करतो. मात्र, चिप्समधील हवा केवळ चिप्सचं पॅकेट मोठं दिसण्यासाठी नव्हे, तर खवय्यांच्या आरोग्यासाठी भरली जाते.
सर्वसाधारणपणे चिप्समधील हवा ही कंपन्यांच्या फायद्यासाठी असते, असा अंदाज बांधला जातो. मात्र, तसं नाहीये. चिप्स कंपन्या आपलं प्रॉडक्ट चांगलं राहण्यासाठी हवा भरतात.
चिप्स क्रिस्पी आणि ताजे राहण्यासाठी चिप्स पॅकेट्समध्ये नायट्रोजन गॅस भरला जातो. नायट्रोजन गॅसमुळे खूप दिवसांपर्यंत चिप्स खाण्याजोगे राहू शकतात.
समजलं चिप्सच्या पॅकेट्समध्ये हवा आपल्याच फायद्यासाठी भरली जाते..!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
छान
nice information
useful
छान माहिती .