' पेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते

पेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आपण जातो तेव्हा दोनचं गोष्टींकडे लक्ष देतो. पहिली गोष्ट म्हणजे पेट्रोलच्या मशीनवर किती लिटर पेट्रोल दाखवतंय आणि त्यात पैसे बरोबर चार्ज होतायत की नाही. बाकी इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जातंच नाही. लक्ष जात नाही म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी आपल्याला माहितचं नसतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जाण्याचा प्रश्न देखील उद्भवत नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल काही गोष्टी तुम्हाला माहित नसल्यास तुमच्या डोळ्यादेखत पेट्रोलच्या व्यवहाराबाबत तुमची फसवणूक होऊ शकते आणि फसवणूक झाली कधी हे तुम्हाला कळणार देखील नाही. अश्याच काही गोष्टी आज आम्ही तुमच्या नजरे खाली आणत आहोत म्हणजे पुढल्या वेळेस तुमची फसवणूक होणार नाही.

petrol-pump-marathipizza00

स्रोत

पेट्रोलच्या मशीनमध्ये एक खास चीप बसवली जाते. त्याला रिमोटनं नियंत्रित केलं जातं. सेल्समन याला बटणानं कंट्रोल करतो. पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडतं. यानं मीटर तर सुरु राहतं मात्र तुम्हाला त्यापेक्षा कमी पेट्रोल मिळतं.

पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं. भेसळ असल्याचा संशय असल्यास फिल्टर पेपर परीक्षण करण्याची मागणी करा. बिल घेणं विसरु नका. काही गोष्टी खटकल्यास नक्की तक्रार करु शकतात.

petrol-pump-marathipizza01

स्रोत

पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यारी पेट्रोल भरत असताना पेट्रोल भरण्याच्या पाईपाजवळील नोजल दाबत असल्यास नक्कीच गडबड आहे. कारण की, एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखं दाबणं म्हणजे तुमची नक्कीच फसवणूक होते आहे. नोजलाचा संबंध हा थेट मीटरशी असतो. जर मीटरमध्ये २०० रुपयाचं पेट्रोल फीड केलं असेल तर एकदा नोजलचं स्विच दाबल्यानंतर २०० रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर त्याचं स्विच आपोआप बंद होईल. स्विच फक्त मीटर ऑन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं. पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्विच बंद केलं तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं. २०० रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी ३० ते ४५ सेंकद लागतात. त्यामुळे आपलं सगळं लक्ष मीटरवर असतं. जर कर्मचारी १० सेकंदासाठी स्विच बंद केलं तर समजा तुमच्या ५० रुपयांचं पेट्रोल कमी भरलं गेलं.

petrol-pump-marathipizza03

स्रोत

अनेकदा पेट्रोल भरण्यासाठी सकाळी सकाळी आपण जातो. त्यावेळेस कामावर जाण्याचीही घाई असते. बऱ्याचदा २०० किंवा ३०० रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर २००० रुपयाची नोट देतो. पण त्याचवेळस पैसे परत करताना अनेकदा ग्राहकाला कमी पैसे देतात. त्यामुळे पेट्रोल पंप सोडण्यापूर्वी नक्की पैसे मोजून घ्या.

कधीही १००, २०० किंवा ५०० रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरु नका. नेहमी जरा वेगळ्या किंमतीचं पेट्रोल भरा.
उदा. १०४, २०७ असं पेट्रोल भरा. कारण की, अनेक पेट्रोल पंपमध्ये मशीनशी छेडछाड करुन त्यांचा वेग वाढवतात. यामुळे मीटर जम्प करतं. जेव्हा तुम्ही ऑड नंबरचं पेट्रोल टाकतात त्यावेळी म्यॅनुअली पेट्रोल टाकावं लागतं आणि मीटरही जम्प होत नाही.

petrol-pump-marathipizza04

स्रोत

आता पुढच्या वेळेस सतर्क राहा आणि स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका. तसेच इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवा !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “पेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते

  • April 20, 2017 at 10:45 pm
    Permalink

    नागरिकांनी या गोष्टीसाठी सतर्क राहणे योग्यचं आहे.परंतु शासनाने या गोष्टीसाठी दखल घेतली पाहीजे.व अशा पंपांवर योग्य ती कार्यवाही करायला हवी…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?