' जीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात?

जीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जीन्स तर सर्वच जण वापरतात आणि जीन्स वापरायला कोणाला नाही आवडत? स्टाईलीश जीन्स घातल्याने आपला लुक देखील चेंज होतो आणि त्या घालून वावरायला देखील सोप्प जातं. अश्या या रोजच्या वापरातल्या जीन्सवरील एका गोष्टीकडे फारच कमी लोकांचं लक्ष गेलं असेल.

ती गोष्ट म्हणजे जीन्सच्या पॉकेटवर असणारी लहान लहान बटणे! तुम्हाला माहित आहे का… ही लहान लहान बटणे जीन्सच्या पॉकेटवर का असतात? त्यांना तिथे जागा देण्यामागे नेमका उद्देश काय? नसेल माहित तर आज जाणून घ्या!

 

jeans-pockets-buttons-marathipizza00

स्रोत

ही बटणं फक्त स्टाईलसाठी असतात, असा अनेकांचा अंदाज असतो. पण हा अंदाज चुकीचा आहे. सुरुवातीच्या काळात डेनिम्स किंवा जीन्स ही कामगार वर्गाची मक्तेदारी मानली जात असे.

 

jeans-pockets-buttons-marathipizza01

स्रोत

श्रमाची काम करणाऱ्या कामगारांच्या जीन्सचे खिसे फाटणं ही नेहमीची समस्या होती. खिशांची आवश्यकता असल्यामुळे काम करताना ते फाटणं, कामगारांना परवडणारं नव्हतं, त्याच्याकडे डोळेझाक करुन चालणार नव्हतं. १८७३ मध्ये ही समस्या ऐकून जेकब डेव्हिस नावाच्या एका टेलरला कल्पना सुचली.

 

jeans-pockets-buttons-marathipizza02

स्रोत

जेकब त्या काळी Levi Strauss & Co. अर्थात आज लिव्हाईस नावाने प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या जीन्स वापरत असे. फाटणाऱ्या खिशांवर उपाय म्हणून त्याने पॉकेट्सच्या कोपऱ्यात धातूची बटणं लावली. यामुळे खिसे जीन्सला घट्ट चिकटून राहत असत आणि फाटत नसत.

 

jean-pockets-buttons-marathipizza03

स्रोत

जेकबला त्याच्या कल्पनेचं पेटंट काढायचं होतं, मात्र पैशांच्या अभावी त्याला अडचण आल्या. १८७२ मध्ये त्याने Levi Strauss ला पत्र लिहून आयडिया विकण्याचा प्रस्ताव ठेवला, अट एकच- कंपनीने पेटंटसाठी पैसे पुरवावेत. तेव्हापासून ही धातूची छोटेखानी बटणं तुमच्या-आमच्या जीन्सचा अविभाज्य भाग झाले.

 

jean-pockets-buttons-marathipizza04

स्रोत

तर अशी आहे ही जीन्सच्या पॉकेटवरच्या बटणांची मिस्ट्री !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात?

  • August 24, 2017 at 1:09 pm
    Permalink

    pahilya paragraph madhe don mistakes aahet typing chya.aajkal marathi pizza chya baryach lekhanmadhe ashya mistakes aadhalun yet aahet.tari team ne yachi nond ghyavi!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?