'इस्त्री करताना या ९ गोष्टी पाळा आणि इतरांवर आपली 'कडक' छाप पाडा...!

इस्त्री करताना या ९ गोष्टी पाळा आणि इतरांवर आपली ‘कडक’ छाप पाडा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

नोकरीत, व्यवसायात, मुलाखतीत एवढंच काय तर अगदी मित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला स्वतःची कडक छाप पाडायची असेल तर छान इस्त्री केलेले कपडे हवेतच. इस्त्री करणं हे तसं खूप सोप्पं काम आहे असं वाटतं.

पण, अनेकांना नीट इस्त्री करणं जमत नाही. अनेकदा आपण घरी कपड्यांना इस्त्री करताना चुकीची पद्धत वापरतो आणि त्यामुळे कपडे नीट इस्त्री होत नाहीत.

ironing clothes inmarathi

उत्तम इस्त्री करण्याच्या काही सोप्या पद्धतीने जाणून घेतल्या तर आपणही घरच्या घरी छान इस्त्री करू शकतो.

१) इस्त्री करण्यापूर्वी सगळे कपडे एकत्र करा

इस्त्री गरम झाल्यानंतर कपडे शोधण्याची गडबड करू नका. इस्त्री चालू करण्याआधीच सगळे कपडे बाजूला आणून ठेवा. उत्तम इस्त्री होण्यासाठी ‘आयर्निंग बोर्ड’ घेतलात तर उत्तम. पण जरी ‘आयर्निंग बोर्ड’ नसेल तरीही तुम्ही जमिनीवर एखादी जाड सतरंजी टाकून इस्त्री करू शकता.

 

wikihow.life

 

इस्त्री करताना सपाट पृष्ठभाग असणे महत्त्वाचे आहे. एखादे जुने कापड सुद्धा सोबत ठेवा.

२) कपड्यांची योग्य विभागणी करा

 

better housekeeper

 

कापडाचे अनेक प्रकार असतात. या विविध प्रकारांना इस्त्री करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येक कापडाला योग्य इस्त्री होण्यासाठी वेगवेगळ्या तापमानाची गरज असते.

सिल्क किंवा सिंथेटिक कापड हे इस्त्री कमी गरम असताना इस्त्री करावे. लोकरीचे कापड हे मध्यम तापमानावर तर कॉटन, लिननचे कपडे हे इस्त्री जास्त गरम असताना करावेत.

जर तुम्हाला कापडाचा प्रकार माहित नसेल तर, इस्त्री कमी गरम असतानाच वापरून बघा. कपड्यांवरील सुरकुत्या जात नसतील तर इस्त्रीचं तापमान वाढवा.

३) इस्त्री वापरासाठी तयार आहे की नाही हे तपासून घ्या

 

Today show

 

इस्त्री गरम झाली आहे की नाही हे प्रत्येक इस्त्री विविध मार्गांनी दाखवते. काहींचे लाईट्स चालू बंद होतात तर काहींमध्ये विशिष्ट खूण दिसते. या खुणा आपण कधी लक्षात घेत नाही.

इस्त्री थंड असताना वापरण्यात काहीच अर्थ नसतो. यासाठी ती गरम झाली आहे की नाही हे तपासून घ्या. इस्त्री योग्य गरम झाल्यानंतरच वापरा.

इस्त्रीमध्ये दिसणाऱ्या लाईट्सचे अर्थ तुम्हांला माहित नसतील तर इस्त्री विकत घेताना सोबत मिळालेलं पत्रक वाचून बघा.

४) लोकरीचे कपडे इस्त्री करण्याची खास पद्धत

 

the spruce

 

नाजूक कपड्यांना थेट इस्त्री लावू नका. लोकरीचे कपडे किंवा टी-शर्ट असलेल्या स्टिकर्सना थेट गरम इस्त्री लावली तर ते चिकटण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून लोकरीच्या कपड्यांवर एखादं साधं कापड ओलसर करून ठेवा आणि मग इस्त्री करा.

कपड्याचा प्रकार माहित नसेल तर तुम्ही कॉलरजवळ असलेले लेबल पाहू शकता.

५) कपडे इस्त्री करण्यापूर्वी थोडेसे ओलसर करा

 

the spruce

 

कॉटन किंवा पॉलिस्टरचे कपडे इस्त्री करण्यापूर्वी थोडेसे ओले करा. थोडेसे पाणी शिंपडून किंवा स्प्रे बॉटलचा वापर करून तुम्ही हे काम करू शकता. केवळ थोडासा ओलसरपणा अपेक्षित आहे.

६) भरीव नक्षीकाम असणारे कपडे इस्त्री करण्याची पद्धत

 

the s studio

ज्या कपड्यांवर धागेदोऱ्यांनी नाजूक नक्षीकाम केले आहे असे कपडे इस्त्री करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हे कपडे उलटे करून इस्त्री केले तर कापड जळण्याचा धोका टाळतो.

याशिवाय सिल्क, रेयॉन, सॅटिनचे कपडे सुद्धा उलटे करूनच इस्त्री करावेत.

७) शर्ट व पॅन्ट इस्त्री करण्याची पद्धत

 

wikihow.life

 

शर्ट इस्त्री करताना पहिल्यांदा कॉलरपासून सुरुवात करावी. कॉलरमध्ये मध्यभागापासून सुरुवात करून मग कॉलरच्या शेवटाकडे जावे. शर्टाचे हात इस्त्री करताना खालपासून सुरुवात करावी.

इस्त्री ही कायम उभी फिरवावी. गोलाकार फिरवू नये. पॅन्ट इस्त्री करताना आधी खिशांपासून सुरुवात करावी. खिसे उलटे करुन इस्त्री करावेत. त्यामुळे सुरकुत्या पडत नाहीत.

इस्त्री केल्यानंतर लगेचच कपड्यांची घडी करा किंवा कपडे हँगरला लावून ठेवा.

८) इस्त्री आणि सुरक्षा

 

wikihow.life

 

इस्त्री गरम असल्यामुळे लहान मुलांपासून इस्त्री लांब ठेवणेच योग्य आहे. इस्त्रीच्या चटक्याने मुलांना गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे इस्त्री करताना जवळपास लहान मुलं खेळणार नाहीत याची दक्षता बाळगा.

इस्त्रीचा वापर झाल्यानंतर ती उभी करून ठेवा. लगेचच जागेवर किंवा बॉक्समध्ये ठेऊ नका. कपड्यांना इस्त्री केल्यानंतर दहा मिनिटे इस्त्री थंड होऊ द्या मगच योग्य जागेवर ठेवा.

इस्त्री करताना हात भाजला तर लगेच थंड पाण्याखाली धरा. बर्फाचा वापर करू नका.

९) इस्त्री नसेल तर ?

 

elle croft

 

अनेकदा आपल्याला घाईघाईत एखाद्या ठिकाणी जायचं असतं आणि नेमकी इस्त्री जागेवर नसते. अशावेळेस इस्त्री नसतानाही तुम्ही इतर साधनांनी इस्त्री करू शकता. सुरकुत्या पडलेल्या कापडावर थोडंसं पाणी शिंपडा आणि मग एखादं जाड पुस्तक पुस्तक कापडावर ठेवून थोडासा जोर द्या.

असे केल्यास कपड्यांवरील सुरकुत्या निश्चित गायब होतील.

स्वच्छ आणि नीटनेटकं दिसण्यासाठी चांगल्या कपड्यांची नितांत आवश्यकता असते. यासाठी या सोप्या गोष्टी पाळा आणि घरच्याघरी कपड्यांना उत्तम इस्त्री करा. कारण शेवटी, First Impression is the Last Impression.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?