'आता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी !

आता मॅकडोनल्ड्समध्ये मिळणार मसाला डोसा बर्गर आणि अंडा बुर्जी !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मॅकडोनल्ड्स हे प्रकरण सध्या शहरातील मध्यमवर्गीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलंय. मॅकडोनल्ड्स मधील पदार्थ देखील तोंडाची चव आणि पोटाची भूक भागवणारे असतात म्हणा! मॅकडोनल्ड्स मध्ये मिळणारा प्रत्येक पदार्थ आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. असं हे सर्वांचं आवडतं मॅकडोनल्ड्स आता ग्राहकांच्या तोंडामध्ये भारतीय चव उतरवण्याच्या तयारीत आहे.

mcdonalds-marathipizza00

स्रोत

मॅकडोनल्ड्स लवकरच मसाला डोसा आणि अंडा बुर्जी सारखे चमचमीत पदार्थ आपल्या खास बर्गर शैलीमध्ये घेऊन येणार आहे. मॅकडोनल्ड्सने यापूर्वीही विविध प्रकारच्या शक्कला लढवत आगळेवेगेळे बर्गर अस्सल खवय्यांसाठी सादर केले होते. पण भारतीय खाद्यसंस्कृतीचा म्हणावा तितका समावेश त्यात नव्हता. पण आता मात्र मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे मॅकडोनल्ड्सने उचललेलं हे पाउल बर्गरच्या साथीने भारतीय खाद्यसंकृतीला अनोखा साज चढवणार हे मात्र नक्की!

मॅकडीच्या या अस्सल भारतीय पदार्थांमुळे मेन्यूने मॅकडोनल्ड्स प्रेमींना ब्रेकफास्टमध्ये विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. सकाळच्या वेळेस भारतीय ग्राहकांना आकर्षित करून गर्दी खेचण्यासाठी मॅकडोनल्ड्सही संकल्पना राबवून बघत आहे,
काहीच दिवसात या पदार्थांचा मॅकडी मेन्यूमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मुंबईपासून सुरुवात झाल्यानंतर, हळूहळू देशभरातील इतर आऊटलेट्समध्ये हा ‘स्पेशल नाश्ता’ खवय्यांची भूक भागवेल.

mcdonalds-marathipizza01

स्रोत

मॅकडोनल्ड्स या विषयी स्पष्टीकरण देतान सांगितलं आहे की,

भारतीय ब्रेकफास्ट मार्केट काबीज करण्याचा हा प्रयत्न नाही. उडपी किंवा इराणी रेस्टॉरंटशी देखील आम्ही स्पर्धा करणार नाही. आम्ही मॅकडीमध्ये डोसा विकणार नसून, त्या फ्लेव्हरचे बर्गर लोकांसमोर सादर करू.

मॅकडोनल्ड्स भारतीय खाद्यबाजारामध्ये जरी स्पर्धा करणार नसले तरी त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे केएफसी, पिझ्झा हट, बर्गर किंग, डॉमिनोज यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना मात्र सांभाळून राहावे लागणार आहे.

आय अॅम लव्हिन् इट! म्हणत ग्राहकांच्या मनामनात वसलेलं मॅकडोनल्ड्स आता भारतीय खाद्यपदार्थ्यांच्या साथीने किती धुमाकूळ घालतं ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarath

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?