' अपेक्षित यश थोडक्यात हुलकावणी देतं? या ११ गोष्टी स्वतःत रुजवा - २०२० साल झळाळून निघेल!

अपेक्षित यश थोडक्यात हुलकावणी देतं? या ११ गोष्टी स्वतःत रुजवा – २०२० साल झळाळून निघेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२०च्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक आहेत. नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे तरुणाईसाठी मज्जा-मस्ती आणि पार्टी या गोष्टी ठरलेल्या आहेतच.

पण, आयुष्यात ठरवलेलं ध्येय साध्य करायचं असेल तर या पार्टीसोबत नवीन वर्षासाठी काही निश्चय सुद्धा ठरवणं महत्त्वाचं आहे.

प्रत्येकालाच आपलं जीवन सुखाचं, समृद्धीचं असावं अशी इच्छा असते. अभाव असतो तो ठाम निर्धाराचा आणि शिस्तशीर प्रयत्नांचा.

 

hrithik roshan inmarathi
hrxbrand.com

नवीन वर्षाचं आगमन या अडचणीवर एक नैमित्तिक उपाय समोर ठेवतं. आपल्या सर्व इच्छांच्या पूर्ततेसाठी तरुणाईने ‘न्यू इयर रिझोल्युशन’ केलंच पाहिजे.

नवीन वर्ष हे सकारात्मक आशा, नवी सुरुवात घेऊन येणारं असतं. त्यामुळे, स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी तरुणांनी साधे, सोप्पे असे काही निश्चय करायला हवेत…!

१) नवीन गोष्टी शिका

 

Continuous Learning-inmarathi
skillbuilderlms.com

माणसाला लाभलेलं वरदान म्हणजे ‘बुद्धी’. या बुद्धीचा आपण जास्तीत जास्त वापर करून घेतला पाहिजे. बऱ्याचदा स्वतःला नकारात्मकतेच्या कोशात अडकवून आपण एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवातच करत नाही.

बुद्धीचा योग्य वापर करण्यासाठी आणि मेंदूला चालना देण्यासाठी सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे.

शिकणं म्हणजे फक्त कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणं नव्हे तर, तुम्ही घरबसल्या सुद्धा नवीन गोष्टी शिकू शकता. आजकाल बरेच ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यामुळे कॉलेजचा अभ्यास किंवा नोकरी व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट शोधून स्वतःचं मन रमवू शकता. नवीन भाषा किंवा एखादी कला शिकणे हा उत्तम पर्याय आहे.

२) वाचाल तर वाचाल !

 

Reading-inmarathi
pexels.com

‘वाचनाला पर्याय नाही’ हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. पण, प्रत्यक्षात मात्र अनेकांना वाचनाचा कंटाळा असतो. वाचनाची गोडी ही एका दिवसात लागू शकत नाही त्यामुळे ही सवय लावण्यासाठी तुम्हांला सातत्याची गरज आहे.

ऑनलाईन बातम्या वगैरे आपण वाचतोच पण, त्याव्यतिरिक्त सुद्धा कथा, ऐतिहासिक कादंबऱ्या, माहितीपर ग्रंथ, रहस्यकथा अशा वाचनाने विचारांना स्थिरता प्राप्त होते.

वाचनाची सवय लावण्यासाठी आवडीच्या विषयाचं एखादं पुस्तक घेऊन रात्री झोपण्यापूर्वी किंवा प्रवासात वगैरे नियमितपणे किमान एक-दोन पानं वाचा. वाचनामुळे जगण्याची प्रेरणा मिळते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे, आयुष्याला भव्यता देण्यासाठी वाचन हवंच.

३) स्वतःसाठी वेळ द्या

 

happy-man-inmarathi
youtube.com

अभ्यास, नोकरी अशा धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपण स्वतःला वेळ देतंच नाही.

यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला नीट ओळखणं महत्त्वाचं असतं.त्यामुळे दिवसातली किमान दहा मिनिटं स्वतःसाठी काढा. स्वतःशी संवाद साधा.

एखादी गोष्ट करताना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही स्वतःशी झालेल्या संवादातूनच मिळतात. स्वतःमधले गुण आणि दोष जर माहिती असतील तर आपण कोणती गोष्ट साध्य करू शकतो आणि कोणती नाही याची कल्पना येते. स्वतःशी संवाद साधण्यासाठी रात्री ‘रोजनिशी’ लिहिणे हा उत्तम पर्याय आहे.

४) योग्य आहार घ्या

 

good food-inmarathi04
healthnews.co.ug

तुमचं शरीर निरोगी असेल तरच तुम्ही मन लावून काम करू शकता. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराची गरज असते. त्यामुळे, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फार बदल करू नका. शक्यतो, बाहेरचं खाणं टाळा.

घरातून निघताना बॅगेत फळं, काजू-बदाम-मनुके-अंजीर, शेंगदाणे-चणे अशा गोष्टी ठेवा. यांनी त्वरित ऊर्जा मिळते. ऋतूनुसार मिळणारी सगळी फळं खायची सवय ठेवा. जेवणाची वेळ चुकवू नका.

आहारामध्ये प्रथिने, स्निग्द्ध पदार्थ, पालेभाज्या, कडधान्ये यांचं प्रमाण संतुलित ठेवा. सकाळी घरातून निघतांना पोटभर खाऊन निघा. भरपूर पाणी प्या. कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी ताज्या फळांचा रस प्या.

५) व्यायमाची सवय लावा

 

pushups-inmarathi
ndtvfood.com

 

व्यायाम म्हणजे केवळ जिममध्येच गेले पाहिजे असे नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यायाम करू शकता. व्यायामाने शरीराला ऊर्जा मिळते, आळशीपणा निघून जातो.

स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. व्यायामासाठी फार वेळ नसेल तर, फक्त चालणे हा सुद्धा एक उत्तम व्यायाम आहे.

लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. मित्रांना भेटल्यानंतर एका ठिकाणी बसण्यापेक्षा चालत गप्पा मारा. सायकल चालवणे, एखादा खेळ खेळणे, पोहायला जाणे हे सुद्धा उत्तम व्यायाम आहेत.

६) मन प्रसन्न, निश्चयी ठेवा

 

yoga-for-heart-marathipizza

 

‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही. तुमचं मन प्रसन्न असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या इच्छाशक्तीवर मिळवू शकता.

मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कायम सकारात्मक विचार करा. योगसाधनेची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता.

तुम्ही प्रसन्न असाल तर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती सुद्धा प्रसन्न राहतील. छंद जोपासल्याने सुद्धा मन प्रसन्न राहतं. त्यामुळे, एखादी गोष्ट करताना अडथळे आले तरी घाबरून जाऊन नका. निश्चयी मनाने अडथळ्यांना सामोरे जा.

७) इतरांसाठी आदर्श व्हा

 

successfull man08-marathipizza
mysuccesslab.com

प्रत्येकाचाच स्वतःचा ‘रोल मॉडेल’ असतो. पण, ‘रोल मॉडेल’ला फॉलो करण्यापेक्षा इतरांसाठी रोल मॉडेल होण्याचा प्रयत्न करा. यासाठी कष्ट करण्याची आणि ते योग्य दिशेने नेण्याची तयारी ठेवा.

लोकांमध्ये वावरतांना कायम त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. अभ्यासात किंवा नोकरीत कायम ‘स्मार्ट वर्क’ करण्यावर भर द्या.

इतरांना मदत करा. त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. या सगळ्यामध्ये स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही ना याची दक्षता बाळगा.

८) अवलंबून राहणे थांबवा

 

success-way-inmarathi
salesforce.com

 

यश, अपयश हे स्वबळावर मिळतं. त्यामुळे कधीच स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडू नका`

स्वतःच्या चुकांमधून शिका आणि त्या चुका दुरुस्त करण्यावर भर द्या. एखादी गोष्ट साध्य झाली नाही तर त्यामागची कारणं शोधून त्यावर काम करा.

प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्या मदतीला येईल अशी अपेक्षा ठेऊ नका. ‘इतरांना काय वाटेल’ या दडपणाखाली काम करू नका. स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी कष्ट करा.

यशाचं शिखर गाठायचं असेल तर स्वतःशिवाय दुसरं कोणीच तुम्हांला मदत करू शकणार नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.

९) कुटुंबासाठी, मित्रांसाठी पत्र लिहा

 

writing inmarathi
Haresfield School

 

आपण अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडे फार लक्ष देत नाही. पण, आपल्या गरजेच्या वेळी हीच लोकं आपल्याला मदत करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे त्यांना कळवा.

जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला त्याला भेटवस्तू म्हणून छोटंसं पत्र लिहून द्या. कधीतरी आई-बाबांना ‘थँक यु’ म्हणू घट्ट मिठी मारा.

या गोष्टी खूप लहान असल्या तरीही समोरच्याला आनंद देणाऱ्या असतात. केवळ सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा.

१०) सामाजिक मदत करा

 

helping hands inmarathi

 

एखाद्या व्यक्तीसाठी नि:स्वार्थीपणे काम करणं यासारखा आनंद नसतो, त्यामुळे, सुट्टीच्या दिवशी जवळच्या एका वृद्धाश्रमाला किंवा अनाथाश्रमाला भेट द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घ्या. तुम्हांला काही मदत करणं शक्य असेल तर ती करा. तुमच्या वस्तीतील एखाद्या गरीब मुलाला शिकवा.

नवीन वसाहतींना भेटी द्या. त्यांची संस्कृती जाणून घ्या.

११) भटकंतीचे प्लॅन्स करा

 

trekking-inmarathi
thefortsofsahyadri.blogspot.com

नवनवीन ठिकाणी फिरायला गेल्यामुळे मनावरील ताण कमी होतो. त्यामुळे स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी विविध ठिकाणी फिरायला जा. तेथील खाद्यपदार्थ खाऊन बघा.

नवीन मित्रपरिवार तयार करा. गडकिल्ल्यांना भेटी देऊन इतिहास जाणून घ्या. गर्दीच्या ठिकाणी न जाता, शांत ठिकाणे शोधून काढा.

मित्रांनो, यशाकडे जाणारे मार्ग जरी अनेक असले तरीही सातत्य आणि निश्चयीपणा हा महत्त्वाचा असतोच. त्यामुळे येत्या वर्षात ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहण्याचा प्रयत्न करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?