' सुबोध भावेंचा ट्विटरवरील "हा" अप्रतिम उपक्रम आपल्याला "जग सुंदर आहे" ही खात्री पटवतो...!

सुबोध भावेंचा ट्विटरवरील “हा” अप्रतिम उपक्रम आपल्याला “जग सुंदर आहे” ही खात्री पटवतो…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मराठी कला विश्वात आपल्या मेहनतीने आणि अंगभूत गुणांनी स्वतःचं वेगळं स्थान कमावणारे आणि त्या जोडीला प्रेक्षकांच्या मनात आदराची जागा मिळवणारे जे सगळे कलाकार असतील, त्यांतील एक अग्रेसर नाव म्हणजे सुबोध भावे. मुख्य म्हणजे, –

सुबोध भावे फक्त कलाकार म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणून ही अगदी उमदे आहेत.

ट्विटरवर सक्रिय असल्याने, त्यांच्या ट्विट्स/रिप्लायजमधून सुबोध भावेंमधील हे माणूसपण वेळोवेळी अधोरेखित असतं.

 

subodh1-inmarathi
marathistars.com

नुकताच असाच एक अनुभव ट्विटरकर मंडळींना आलाय – सुबोध यांच्या एका उत्कृष्ट उपक्रमाच्या निमित्ताने.

१२ नोव्हेम्बर रोजी रात्री ९ च्या सुमारास सुबोधजींनी एक अभिनव कल्पना मांडली.

चहूकडे असलेल्या नकारत्मक, निराशाजनक बातम्या-चर्चांच्या कोलाहलात आपण काहीतरी चांगलं, सकारात्मक करूया – अशी ही कल्पना.

सुबोधजींनी ट्विट केलं की –

समाज माध्यमांवर सतत नकारात्मक विचार ऐकून कंटाळा आला.
चला थोड सकारात्मक बोलूया.
आपल्या आसपास एखाद चांगलं काम केलेल्या माणसाची गोष्ट सांगूया…
मला खात्री आहे अशी खूप जण असतील.
गोष्ट सांगताना मला टॅग करा.

 

subodh bhave twitter initiative tweet inmarathi

मुख्य म्हणजे “समाज माध्यमांवर फार वाईट वातावरण आहे” असं काहीतरी बोलून, फक्त तक्रार करून सुबोध थांबले नाहीत. त्यांनी त्यावर एक पर्याय सुचवला आणि इतकंच नाही, तर “मला त्यात टॅग करा” असं थेट म्हणून याला एका उपक्रमाचं स्वरूपच देऊन टाकलं.

उपदेश करणारे लोक ४ शब्द बोलून पुढे जातात. पण यात सुबोध भावेंचा थेट सहभाग असल्याने लोकांनी या ट्विटला खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. आपल्या चहूकडे कित्येक लोक समाजासाठी काहीतरी चांगलं करत असतात. परंतु नकारात्मकतेच्या कोलाहलात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही.

सुबोधच्या ट्विटला प्रतिसाद देताना अनेकांनी या अज्ञात सज्जनांना समोर आणलं…आपलंही चांगलं काम सांगितलं…!

विनोद बिडवाईक म्हणतात –

आम्ही खूप मोठें काम करतो असे नाही, पण हा खारीचा वाटा आहे. माझी पत्नी street children साठी workshop घेते. आम्ही स्वतः ३ मूलांचा शिक्षणाचा खर्च करतो.

 

subodh bhave twitter initiative reply 1 inmarathi

 

ज्योती मटंगे लहान गरजू मुलांच्या शिक्षणात मदत करत आहेत. त्या आपल्या कामाबद्दल म्हणतात –

 

subodh bhave twitter initiative reply 2 inmarathi

 

कोल्हापूरच्या “मातोश्री” वृद्धाश्रमाची माहिती देताना किरण म्हणतात :

मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर मध्ये आहे हा खरंच एक #आनंदाश्रम आहे कारण इथे वृद्ध लोकांना खूप आनंद मिळतो. पाटोळे काका व काकी अगदी घरच्यांच्या सारखी त्यांची सगळी काळजी घेतात. 🙏🏻🙏🏻

 

subodh bhave twitter initiative reply 3 inmarathi

 

किरण यांनीच, कोल्हापूरच्या दुसऱ्या एका अप्रतिम प्रकल्पाची माहिती दिली :

कोल्हापूर मध्ये HIV+/एड्सग्रस्त मुला-मुलींसाठी काम करणारी संस्था “करुणालय बालगृह” आहे. आनंदा बनसोडे आणि कुंदना बनसोडे हे ह्यांच्यासाठी खूप चांगलं काम करतात. पोरक्या पोरांना आपल्या मुलांसारखे जपतात. गेल्या वर्षी आम्ही त्यांना #SBFC कडून थोडा आनंद देऊ शकलो याचं समाधान आहे.

 

subodh bhave twitter initiative reply 4 inmarathi

 

डॉ. दीपाली अंबिके (त्यांची ट्विटर आयडीच त्या “sb fan” असल्याचं सांगते. बायो मध्ये “तुला पाहते रे” या गाजलेल्या मालिकेच्या आपण प्रेमात असल्याचं त्यांनी लिहिलंय.) यांनी आपल्या कार्याबद्दल लिहिलंय की :

मी बालरोगतज्ज्ञ आहे, खूप ऑफर्स आले private हॉस्पिटल्स, corporate मधून, पण by चॉईस मी पुण्यात, सरकारमान्य रुग्णालयातून सेवा देते, रोज 100/ 150 रुग्ण मोफत बघतो, आणि 25 bedded नवजातशिशु विभागाची काळजी घेतो आम्ही सगळे डॉक्टर्स. खूप कमी वजनाची अभ्रक वाचावे यासाठी प्रयत्न चालू असतात.

 

subodh bhave twitter initiative reply 5 inmarathi

 

उमेश घोले यांनी आपल्या संस्थेच्या कार्याची ओळख करून देताना सुबोध भावेंना निमंत्रित केलं – ज्याला सुबोधजींनी प्रतिसादही दिला.

@subodhbhave
सर आमची श्री सोमजाई फाऊंडेशन हि एक सामाजिक संस्था आहे,आम्ही अनेक सामाजिक कार्यक्रम करतो, त्यातला एक कार्यक्रम दिवाळी मध्ये “आली माझ्या घरी हि दिवाळी” हा उपक्रम आदिवासी पाड्यात त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करतो,पुढील वर्षी आपल्याला यायला आवडेल.?

subodh bhave twitter initiative reply 6 inmarathi

 

असेच प्रतिसाद अनेकांनी दिलेत…

 

subodh bhave twitter initiative reply 7 inmarathi

 

हर्षद काजरेकर सांगतात :

आमचं गाव जमृतखार-मुरुड जंजिरा (45घर)
आम्ही गावामध्ये जनसेवेचे कार्यक्रम दरवर्षी ठेवतो आता पर्यंत आम्ही रक्तदान शिबीर ठेवून 500+ रक्तदान,आरोग्य शिबीर ठेवून 3000+ लोकांचे उपचार केले, 600+ नेत्र शिबीर ठेवून चष्मा वाटप आणि 50 ते 55 लोकांचे अत्यल्प खर्चात मोतीबिंदू शस्रक्रिया केली 🙏

subodh bhave twitter initiative reply 8 inmarathi

 

डोमेस्टिक व्हायोलन्सवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल स्मिता खोडवे म्हणतात :

I am a new resident of a small town Akola and just learnt Dr. Asta Mirge in my neighbourhood is been relentlessly serving the victims of domestic violence since her adulthood.

.

They say charity begins at home. माझा दादा, शेखर खोडवे, ग्रामीण महिला विकासाठी अतोनत झटत असतो. विशेषतहा अशिक्षीत वर्ग जो निराधार आहे त्यांना तो विविध सरकारी योजना समजाऊन कामगार मिळवायला मदत करतो.. I am a proud sister!

 

 

पण या सर्वांमध्ये एक अतिशय हळवा अनुभव शेअर केला आहे “अभिषेकी” यांनी.

अभिषेकी सांगतात –

मित्रांसोबत फिरायला गेलो होतो। नेहमीप्रमाणे मित्रांना काही भलत्या-सलत्या कथा सांगून त्यांचं मनोरंजन करत होतो। पलीकडे एक आजोबा बसले होते। तो किस्सा ऐकून ते आजोबा खळखळून हसले आणि आमच्या जवळ आले। त्या गोष्टीवर त्यांनी टिप्पणी केली अन बोलू लागले।
👇👇👇

 

अजून काहीतरी सांग म्हणाले। सुदैवाने आपल्याकडे गोष्टींची कमतरता कधीच नसते। त्यांना अजून एक किस्सा वगैरे सांगितला। ते खुश झाले। त्यांचे भाव बघण्यासारखे असायचे। जवळपास तासभर हा कार्यक्रम चालला।

 

 

शेवटी निघताना ते बोलले की तीन महिन्यांपूर्वी त्यांचा एक मित्र वारला ज्याच्यासोबत ते फिरायला, गप्पा मारायला येत। तीन महिन्यांनंतर आज मित्र मिळाल्यासारखा वाटला! म्हातारपणी एकटेपणा वाईट असतो। आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला होता यातच समाधान!

 

 

असेच अनेकांचे ट्विट्स आहेत…आपलं किंवा इतर कुणाचं तरी कार्य सांगणारे. हे सर्वच आपल्या आजूबाजूला सज्जन शक्ती किती सक्रियपणे कार्यरत आहे याची ग्वाही देतात. जग अचानक सुंदर वाटायला लागतं.

सुबोध भावेंनी केलेल्या एका ट्विटमुळे सोशलमिडीयावर ट्रोल्स आणि फेक न्यूजच्या नकारात्मक गोंगाटात अगदीच अभावाने दिसणारी आपल्या विश्वाची ही बाजू सुरेखरित्या समोर आली आहे.

आपण सर्वांनीच यातून काहीतरी शिकून साकारात्मकतेत भर कशी घालता येईल हा विचार करण्यास हरकत नाही…!

हा अनुभव मिळवून दिल्याबद्दल सुबोध भावे यांचे लक्ष लक्ष धन्यवाद!

hindustantimes.com (Sanket Wankhade/HT PHOTO)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?