' मानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या “गोष्टी”; स्वतःकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतील – InMarathi

मानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या “गोष्टी”; स्वतःकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मन अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. मन हा आपल्या शरीराचा एक हिस्सा आहे,पण मन म्हणजे नक्की काय? असं कोणी विचारलं तर मात्र आपल्याला त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येत नाही.

मनाचा संबंध जितका मेंदूशी तितकाच हृदयाशी आहे. मनाला वेदना झाल्या की त्याचा शरीरावर सुद्धा गंभीर परिणाम होतो हे तर आपण सगळे रोजच अनुभवत असतो.

ह्याच मनाचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून मनाच्या बाबतीत अनेक गोष्टी शोधून काढल्या आणि विज्ञानाच्या ह्याच शाखेला “मानसशास्त्र” असे म्हणतात.

मनात इतकी प्रचंड शक्ती आहे की, ते संपूर्ण शरीराचा ताबा घेऊ शकतं. जिथे शरीर साथ सोडतं तिथे केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अचाट गोष्टी साध्य होतात ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला पदोपदी सापडतात.

आपल्या मनात अनेक समज गैरसमज असतात. स्वतःविषयी, आजुबाजुच्या व्यक्तींविषयी तसेच जगाविषयी आपल्यापैकी प्रत्येकाचा एक वेगळा एक दृष्टिकोन असतो. आपले अनेक समज हे चुकीचे सुद्धा असू शकतात. ते बदलले तर आपल्या एकूण  व्यक्तिमत्वातच खूप चांगला बदल घडू शकतो. 

आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या मानसशास्त्रात सिद्ध झाल्या आहेत, ज्यामुळे आपली स्वत:कडे बघण्याची दृष्टीच बदलेल.

Psychology InMarathi

 

१. आपण अनेक गोष्टी “लोक काय म्हणतील?” म्हणून करत नाही. अनेकांना स्वतःविषयी न्यूनगंड असतो. त्यांच्या मनात स्वतः विषयीची प्रतिमा म्हणजे “आपण अत्यंत लाजिरवाणे किंवा नालायक आहोत” अशीच असते.

पण मानसशास्त्रात असे सिद्ध झाले आहे की, ज्यांना स्वतःची किंवा स्वतःच्या कुठल्याही गोष्टीची लाज वाटते त्यांना खरं तर ती लाज बाळगण्याचं काहीच कारण नसतं.  आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे त्यांच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड तयार झालेला असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

खरंतर अशी माणसे अगदी छान नॉर्मल असतात. ज्या माणसांना कशाचीच लाज वाटत नाही त्यांच्याकडे खरं तर लाज वाटायला हवी अनेक कारणे असतात, पण त्यांना मात्र कशाचेही फार काहीच वाटत नाही.

माणसाची सद्सद्विवेकबुद्धी जितकी जागृत असते तितका तो कुठलीही गोष्ट करताना, निर्णय घेताना विचार करतो. माणसाकडे सद्सद्विवेकबुद्धी जितकी कमी, तितकी त्याला चुकीचेही वागताना अजिबात लाज वाटत नाही. हे मानसशास्त्रात सिद्ध झाले आहे.

 

What Will People Say InMarathi

 

२. आपले सगळेच वागणे म्हणजे कशावरची तरी प्रतिक्रिया असते असे नाही.  काही माणसे खरंच विकृत असतात आणि आपल्या आजुबाजुला अशी अनेक माणसे असतात  जी मुद्दाम विचित्र किंवा वाईट वागतात.

त्यांना दुसऱ्याला त्रास देऊन आनंद मिळतो आणि ती माणसे सतत त्यांच्या टार्गेटच्या शोधात असतात. अशी सॅडीस्ट माणसे दुसऱ्याला मुद्दाम दुःख देऊन त्यातून आनंद मिळवतात.

 

mean people inmarathi

 

३. आपण जसे आहोत, दुनिया तशीच आपल्याला दिसते. म्हणूनच मनात कायम असुरक्षिततेची भावना घेऊन जगणारी माणसे  दुसऱ्यावर विश्वासच ठेवू शकत नाहीत किंवा साध्या सरळ भोळ्या, दयाळू माणसाला सगळे फसवतात. कारण त्याला जगात कसे छक्के पंजे खेळायचे हेच माहित नसतं. विकृत माणसाला जग सुद्धा वाईटच दिसतं.

जो बदल तुम्हाला जगात अपेक्षित आहे त्याची सुरुवात स्वतःपासून करा.

 

mahatma gandhi quotes

 

४. बहुसंख्य लोक हे कायम इतरांच्याच इच्छेने वागताना दिसतात. कळत नकळत आपण कायम दुसऱ्याच्या इच्छेनेच वागत असतो. मग ती माणसे म्हणजे कुटुंबीय किंवा समाज सुद्धा असू शकतो.

 

what-will-people-say inmarathi

 

बहुसंख्य “इतर लोक काय म्हणतील?” किंवा “आपल्याबद्दल काय विचार करतील” किंवा “आपल्याला वाळीत तर टाकणार नाहीत ना?” ह्याचाच विचार करून कायम दुसऱ्याने ठरवलेल्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत, नकळत इतरांच्या मनाप्रमाणे वागतात. 

५. विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलं आहे की, दोन विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे नैसर्गिकरीत्याच आकर्षित होतात. दोन चुंबकांचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एकमेकांकडे आकर्षिले जातात.

 

jab we met inmarathi

 

माणसाच्या स्वभावाचही तसंच आहे. दोन भिन्न स्वभावांची किंवा विरुद्ध स्वभावाचीच माणसे एकमेकांकडे आकर्षिली जातात. माणसाला जोपर्यंत स्वतःला काय हवं आहे हे पक्क माहिती नसतं. तोपर्यंत तो विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणेच आकर्षित होतो.

 

६. माणूस जितका खरा असेल तितका त्याचा वापर करून घेतला जातो. स्वार्थी लोक तर अशा लोकांच्या शोधातच असतात जेणेकरून स्वार्थ साधण्यासाठी त्यांचा सहज वापर करता येईल. त्यांना सतत ऐकून घ्यावं लागतं.

selfish inmarathi

 

७. माणसाच्या मनाला मॅनिप्युलेट करणं कठीण असतं, पण भावनांना मॅनिप्युलेट करणं सोप्पं असतं. कुणालाही मॅनिप्युलेट करायचं असेल तर, लोक त्याच्या नाजूक भावनांना हात घालतात. तेव्हाच त्यालाच मॅनिप्युलेट करणं शक्य होतं.

आपण जेव्हा एखाद्याला आपल्या भावना मॅनिप्युलेट करण्याची संधी देतो, तेव्हाच त्या माणसाने तुमच्या मनावर ताबा मिळवलेला असतो आणि तो माणूस तुम्हाला त्याच्या मर्जीप्रमाणे वागायला अगदी सहज भाग पाडू शकतो.

 

manipulate inmarathi

 

म्हणूनच, अनोळखी व्यक्ती, संशयास्पद किंवा स्वार्थी व्यक्तींना आपल्या मनाचा, भावनांचा ताबा घेऊ द्यायचा नसेल तर त्या व्यक्तीपुढे तीव्र भावनिक प्रतिक्रिया देणं टाळायला हवं.

 

८. सगळ्या वाईट गोष्टींच्या मागे सत्ता किंवा सत्तेची लालसा हेच मूळ कारण असते. पैसा हे फक्त सत्तेचे प्रतीक आहे.

 

politics3 inmarathi

 

जे लोक इतरांना सहज ताब्यात ठेवू शकतात त्यांना माहिती असते की, पैश्यांपलीकडेसुद्धा लोकांना आपल्या ताब्यात ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत.

९. माणूस जितका हुशार असेल तितका तो कुठलाही निर्णय घेताना स्वतःला प्रश्न विचारतो. कशावरही किंवा कुणावरही विश्वास ठेवताना त्याला अनेक प्रश्न पडतात किंवा मनात अनेक शंका निर्माण होतात आणि त्यांचे निरसन झाल्याखेरीज तो कुठलाही निर्णय घेत नाही.

 

question-mark-inmarathi

 

१०. आधुनिक काळात नव्याने रुजलेले “इट्स ऑल लव्ह” किंवा “एव्हरीथिंग बिलॉन्ग्स” हे दोन विचार म्हणजे, दुसरं-तिसरं काहीही नसून गोड शब्दांत केलेले अपमान आहेत. ते प्रेमाच्या नावाखाली समोरच्याने चालवून घ्यावेत असा हेतू आहे.

 

love-at-first-site-inmarathi

 

हे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्याला त्रास देणं आणि त्याने तो सहन करावा अशी त्याच्यावर सक्ती करण्यासारखे आहे. ह्यामुळे “इट्स ऑल लव्ह”ला लोक भुलतात आणि स्वतःला त्रासापासून किंवा नकारात्मक गोष्टींपासून लांब ठेवायला विसरतात.

 

११. आत्मभानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक अडथळे असतात. देहभान, आत्मभान जागृत होण्यासाठी प्रतिकार करणं किंवा अडथळ्यांना सामोरं जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनाच पार करून माणसाला अंतिम सत्याचा साक्षात्कार होतो. यासाठी कठोर प्रयत्नांची गरज असते.

 

Hardwork Inmarathi

 

१२. सध्याच्या काळात उदयाला आलेले अनेक आधुनिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु हे खरंतर विकृत असतात. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक खोटे गुरु आणि बाबा-बुवा बघतो जे भोळ्या जनतेची फसवणूक करत असतात. त्यांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत असतात.

 

superstition-lemon-and-green-chilli InMarathi

 

काही बोटांवर मोजण्याइतकेच खरे  गुरु आहेत जे खरंच त्या पदाला पोहोचले आहेत आणि जे खरोखर दुसऱ्याला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवू शकतात.

 

१३. जे लोक प्रतिकार सहन करू शकत नाहीत किंवा प्रतिकाराला बळी पडून आत्मोन्नतीकडे किंवा प्रगतीकडे जाणारा मार्ग सोडून देतात आणि एकटे पडतात.

 

the-struggle-is-real inmarathi

 

चांगले आयुष्य किंवा स्वातंत्र्य मिळणे कठीण असते, त्यासाठी खूप  संघर्ष करावा लागतो. जे लोक संघर्ष करत नाहीत, ज्यांना सोप्पं आयुष्य हवं असतं त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांना त्यासाठी स्वतःचं स्वातंत्र्य सोडून द्यावं लागतं.

 

१४. ज्यांच्याकडे हुशारी कमी असते ते पटकन दुसऱ्याकडे आकर्षित होतात. आकर्षण होण्यासाठी आधी तीव्र फोकस फोकस होणं आवश्यक असतं.

 

increase_Focus_increase_Concentration Inmarathi

 

माणूस जितका हुशार किंवा बुद्धिमान असेल तितकं त्यांना एखाद्या गोष्टीकडे फोकस करणं कठीण जाते.  त्यांना मुद्दाम एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याचा सराव करावा लागतो. अर्थात, मनोरुग्णांना मात्र एखाद्या गोष्टीवर फोकस करणं सोप्पं जातं.

१५. भावनिक स्वातंत्र्याचा आसक्तीशी किंवा अनासक्तीशी संबंध नसतो. आपण स्वतःशी किती एकनिष्ठ आहोत यावर आपलं भावनिक स्वातंत्र्य अवलंबून असतं.

 

know yourself inmarathi

 

१६. एखाद्या माणसाचा खरा स्वभाव आणि खरं वागणं तेव्हा कळतं जेव्हा त्याच्या हातात सत्ता येते. तो त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांना कसं वागवतो, आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागतो हे तेव्हाच कळतं. आरश्यापेक्षाही सत्ता माणसाचं खरं रूप जगाला दाखवते.

 

Boss

 

१७. काही वेळेला शांत राहून आपण सगळ्यात प्रभावीपणे आपला संदेश किंवा प्रतिक्रिया दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. मौन ही सर्वात प्रभावी आणि प्रबळ प्रतिक्रिया आहे.

 

zip emoji inmarathi

 

१८. जगात वाईट काम करणारी माणसं जितकं नुकसान करत नाहीत तितकं नुकसान वाईट गोष्ट घडताना नुसतेच बघणाऱ्यांनी ती घडण्यापासून न थांबवल्यामुळे होते. काहीही न करता नुसती बघ्याची भूमिका घेतल्याने प्रचंड नुकसान होते.

 

accident people inmarathi

 

१९. एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण ही प्रक्रिया वरपासून खाली जाणारी प्रक्रिया आहे. कुठल्याही कल्पनेची सुरुवात मेंदूपासून होते.

सुरुवात एका विचाराने होते, त्यानंतर तो विचार आपल्या हृदयात भावनेच्या रूपाने रुजतो आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करून कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. आत्मभान जागृत होण्याची प्रक्रिया ही खालपासून वर सुरु होते. त्यासाठी आधी आपल्याला आपली मुळे शोधावी लागतात.

 

 

आपले मूळ सापडल्यानंतर ते आपल्या हृदयात रुजते आणि आपल्या आयुष्याला अर्थ मिळाल्याची भावना होते. मग, मेंदू किंवा मन जागृत अवस्थेला पोहोचतं.

 

२०. जर तुम्हाला माणसाचं आत्मभान किती जागृत आहे हे तपासायचं असेल तर तो संघर्ष करताना आणि अडथळे पार करताना कशी प्रतिक्रिया देतो हे बघा. आत्मभान जागृत असलेली व्यक्ती ही चुकांचा उपयोग प्रगतीसाठी करते.

 

mistake inmarathi 1

 

ज्या माणसाला अजून आत्मभान आलेलं नाही तो माणूस संघर्ष करता करता आणखी अज्ञानाच्या गर्तेत अडकत जातो.

 

२१. घाबरून किंवा तणावाखाली घेतलेले निर्णय आपल्याला असमाधान किंवा अपूर्णत्वाची भावना देतात. पण जेव्हा,आपण आत्मविश्वासाने स्वतःवर विश्वास ठेऊन निडरपणाने काही निर्णय घेतो तेव्हा आपल्याला समाधान मिळतं.

 

decisions inmarathi

 

माणूस जितका ज्ञानी असेल तितका तो कुणाला सल्ले देताना विचार करतो. फुकट सल्ले देणाऱ्या व्यक्तीला सहसा फार अनुभव किंवा ज्ञान नसते.

ह्या आणि इतर अनेक गोष्टी मानसशास्त्राने सिद्ध केल्या आहेत. या गोष्टी नीट अभ्यासल्या तर तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकताच शिवाय, माणसं ओळखण्याची कलासुद्धा आत्मसात करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?