' बहुतांश संपत्ती दान केल्यानंतर अझीम प्रेमजी “श्रीमंत भारतीय”यादीत, २ वरून थेट १७वर… – InMarathi

बहुतांश संपत्ती दान केल्यानंतर अझीम प्रेमजी “श्रीमंत भारतीय”यादीत, २ वरून थेट १७वर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रसिद्ध उद्योगपती व विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम हशिम प्रेमजी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर होते.

फोर्ब्स हे मासिक दर वर्षी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर करत असते. तसेच भारतातील सुद्धा सर्वात श्रीमंत लोकांची यादी फोर्ब्सद्वारे जाहीर केली जाते.

त्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर होते आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव ४१ व्या स्थानावर होते.

गेली चार दशके त्यांनी विप्रो कंपनीची जबाबदारी सांभाळत असताना विविध क्षेत्रात विस्तार केला आणि विप्रो ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी झाली.

२००० साली एशियावीकने प्रसिद्ध केलेल्या जगातील २० सर्वाधिक शक्तिशाली पुरुषांच्या यादीत त्यांचे नाव होते. तसेच टाइम्सच्या जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दोन वेळा त्यांचा समावेश होता.

 

Azim-Premji_InMarathi

विप्रो ही भारतात सॉफ्टवेअर सेवा देणारी तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

२०१३ साली त्यांनी द गिव्हिंग प्लेज वर स्वाक्षरी करून त्यांच्या संपत्तीमधील कमीत कमी अर्धा हिस्सा दान करण्याचे वचन दिले होते.

त्या वचनाची पूर्ती करत अझीम प्रेमजी ह्यांनी अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या मार्फत गरीब आणि वंचित लोकांसाठी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

त्यांच्या ह्या देणगीमुळे अझीम प्रेमजी फाउंडेशन ही सामाजिक कार्यासाठी सर्वाधिक देणगी देणारी कॉर्पोरेट संस्था झाली आहे.

ह्या बाबतीत आता अझीम प्रेमजी ह्यांनी बिल गेट्स ह्यांनाही मागे टाकले आहे.

अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ह्यांनी ही गिव्हिंग प्लेज आयोजित केली होती. जगभरातील श्रीमंत व्यक्तींनी स्वतःच्या संपत्तीपैकी काही भाग समाजकार्यासाठी दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ह्यात कौतुकास्पद गोष्ट अशी की ह्यावर स्वाक्षरी करणारे अझीम प्रेमजी हे पहिले भारतीय आहेत.

आजवर अझीम प्रेमजी विप्रो कंपनीला होणाऱ्या नफ्यातील मोठा वाटा अझीम प्रेमजी फाउंडेशनला दान करत आले आहेत. ह्या फाउंडेशनद्वारे देशभरातील गरीब व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले जातात.

अझीम प्रेमजी विद्यापीठ देखील शिक्षणाचे कार्य करते. ह्या शिक्षणाच्या कार्याला अधिक मदत व्हावी म्हणून प्रेमजी ह्यांनी देणगीची रक्कम वाढवली आहे.

विप्रो ह्या कंपनीत प्रेमजींचे ७४ टक्के शेअर्स आहेत. त्यातील ६७ तितके शेअर्स मधून जे उत्पन्न येते, ते उत्पन्न अझीम प्रेमजी समाजकार्यासाठी, वंचितांच्या मदतीसाठी दान करतात.

 

Azim Premji University of India InMarathi
timesofindia.indiatimes.com

ते फक्त त्यांच्या उत्पन्नापैकी ७ टक्के उत्पन्न कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी  वापरतात.

त्यांनी देणगी दिलेल्या रक्कमेतून अझीम प्रेमजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि त्या विद्यापीठात सध्या १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

ही विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार पर्यन्त नेण्याचे आणि उत्तर भारतात ह्या विद्यापीठाची शाखा सुरु करण्याचे ह्या फाउंडेशनचे ध्येय आहे.

अझीम प्रेमजी ह्यांनी कंपनीचा ३९ टक्के भाग समाजसेवी संस्थांच्या नावावर केला आहे. हे करून त्यांनी एक नवाच आदर्श प्रस्थापित केला आहे.

ह्या सर्व शेअर्सची किंमत साधारणपणे ५३ हजार २८४ कोटी रुपये आहे. ह्यामुळे अझीम प्रेमजी ट्रस्टला ह्यावर्षी ५३० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल.

अझीम प्रेमजी ह्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे लिहिलेय की,

“एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्याकडून कायम योगदान द्यायला हवे. ही नैतिक शक्तीच आपली खरी ताकद आहे.”

ह्या देणगीमुळे फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले अझीम प्रेमजी थेट सतराव्या स्थानावर गेलेत.

रिलायन्सचे मुकेश अंबानी हे श्रीमंत भारतीयांमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे सर्वोच्च स्थानावर आहेत.

 

bill-gates-and-mukesh-ambani InMarathi

मुकेश अंबानी हे २१ अब्ज डॉलर्सचे धनी असून ते सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत.

जगभरातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी मागच्या वर्षी ४०व्या स्थानावर होते. ह्यावर्षी ते एक पायरी वर चढून ३९व्या स्थानावर आहेत.

तर त्यांचे बंधू अनिल अंबानी हे ह्या यादीत बरेच मागे म्हणजे ४१८ व्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवलेले भारतीय पुढील प्रमाणे आहेत. कुमारमंगलम बिर्ला हे त्यांच्या ९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १४२ व्या स्थानावर आहेत तर औषध क्षेत्रातील दिग्गज समजले जाणारे दिलीप संघवी ही ४४व्या स्थानावर आहेत.

ह्याशिवाय शिव नादर हे ६६व्या स्थानावर,उदय कोटक १८५व्या स्थानावर, सुनील मित्तल २०८ व्या क्रमांकावर, हिंदुजा ब्रदर्स ६९ व्या स्थानावर, गौतम अडानी २०८ व्या क्रमांकावर आणि सायरस पुनावाला हे ह्या यादीत २०८ व्या स्थानावर आहेत.

 

Forbes List InMarathi

बिल गेट्स ह्यांनी ह्यावर्षी कार्लोस स्लिम ह्यांना मागे टाकून जगातील श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.

कार्लोस स्लिम हे मेक्सिकोचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. मागील वर्षात बिल गेट्स ह्यांच्या एकूण संपत्तीमध्ये तीन अब्ज डॉलर्सने भर पडली आहे.

गेल्या २१ वर्षांत तब्बल १६ वेळेला बिल गेट्स फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. अमेरिकेचे यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे ह्यांनी ह्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे.

बफे ह्यांची संपत्ती ७२.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांनी प्रसिद्ध फॅशन ब्रँड “झारा” चे संस्थापक अमानशियो ओर्टेगा ह्यांना चौथ्या स्थानावर ढकलले आहे.

भारतात मुकेश अंबानींनंतर गौतम अडानी हे दुसऱ्या स्थानावर, अशोक लेलँडचे हिंदुजा ब्रदर्स तिसऱ्या स्थानावर, शापूरजी पालोनजी ग्रुपचे पालोनजी मिस्त्री हे चवथ्या स्थानावर आहेत.

कोटक महिंद्राचे उदय कोटक पाचव्या स्थानावर, एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नादर सहाव्या स्थानावर, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे राधाकृष्णन दमाणी सातव्या स्थानावर आहेत.

गोदरेज ग्रुपचे मालक गोदरेज कुटुंब आठव्या स्थानावर, लक्ष्मी मित्तल हे नवव्या स्थानावर तर आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार बिर्ला हे दहाव्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानी हे सलग बाराव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. मागच्या वर्षापर्यंत पहिल्या दहामध्ये असणारे अझीम प्रेमजी हे त्यांनी केलेल्या दानामुळे १७व्या स्थानावर पोहोचलेत.

मागच्या वर्षी त्यांची संपत्ती २१ बिलियन डॉलर्स इतकी होती तर ह्यावर्षी त्यांची संपत्ती ७.२ बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.

Azim Premji Donated InMarathi

पण गिव्हिंग द प्लेजवर स्वाक्षरी केल्याचे समाधान त्यांना जास्त आहे. भारतातील उद्योगपती त्यांचा आदर्श घेऊन समाजासाठी त्यांचे योगदान देतील अशी आशा करूया.

अझीम प्रेमजी ह्यांची भौतिक संपत्ती जरी कमी झाली असली तरी त्यांच्याविषयीचा आदर मात्र आता द्विगुणित झाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?