' १२ चुका – ज्यांची भारतीय स्त्रिया मोठी किंमत चुकवत आहेत…! – InMarathi

१२ चुका – ज्यांची भारतीय स्त्रिया मोठी किंमत चुकवत आहेत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बऱ्याच लोकांना हा लेख नेहमीप्रमाणे स्त्रीवादी, अगदी रॅडिकल फेमिनिस्ट वगैरे वाटेल. आजकालच्या मुली अश्या असतात, तश्या असतात वगैरे लगेच ताशेरे ओढले जातील. पण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला, आपापल्या आई, बहिणी किंवा बायकोकडे लक्ष दिले तर लक्षात येईल की आयुष्यात केव्हा ना केव्हा तुमच्या आयुष्यातील स्त्रियांनी ह्यापैकी कुठला तरी निर्णय घेतला आहे.

आणि हे ही लक्षात येईल की त्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात सेटबॅक आला आहे.

आपल्या घरातल्यांचा, मुलांचा, नवऱ्याचा विचार आधी करून स्त्रिया काही निर्णय घेतात आणि मग त्याची किंमत त्यांना आयुष्यभर चुकवावी लागते. तेव्हा इमोशनल होऊन किंवा कुठल्यातरी अपरिहार्य कारणामुळे आपण “तो” निर्णय घेतला नसता तर आपण आज वेगळेच आयुष्य जगत असतो असा विचार प्रत्येक स्त्री च्या मनात केव्हा ना जेव्हा येतोच.

मग तो पश्चाताप शिक्षणाबद्दल, करियरच्या निवडीबद्दल, नोकरीबद्दल, लग्नाबद्दल, जोडीदाराच्या निवडीबद्दल किंवा मुलं जन्माला घालण्याबद्दल, चांगली सुरु असलेली नोकरी मुलांसाठी सोडल्याबद्दल, तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कशाशीही निगडित असू शकतो. तर स्त्रिया दुसऱ्याचा विचार करून असे काही निर्णय घेतात ज्याचा त्यांना नंतर आयुष्यभर पश्चाताप होतो.

१. स्वतःचे शिक्षण आणि करियर गांभीर्याने न घेणे.

भारतात अजूनही बऱ्याच ठिकाणी मुलींचे शिक्षण, त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे, त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनवणे ह्या बाबतीत उदासीनता दिसून येते. घरचे आणि आजुबाजुचेच वातावरण असे असेल तर त्या मुलींनाही स्वतःच्या शिक्षणाबद्दल काही गांभीर्य उरत नाही.

 

education-courses-inmarathi01.jpg

“पुढे जाऊन लग्नच करायचे आहे आणि नवरा, मुलं व घरच सांभाळायचे आहे. मग अभ्यास बिभ्यासात कशाला जास्त कष्ट घ्यायचे, कशाला जास्त डोकं घालवायचं”, असाच विचार त्याही करू लागतात आणि मग सगळेच गणित चुकते.

स्वतःचे आयुष्य घडवायचे असेल तर मुलींनी शिक्षण घेऊन सक्षम बनायला हवे. पण अजूनही शिक्षणाकडे गांभीर्याने न बघणे बऱ्याच ठिकाणी दिसून येते.

२. घरच्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करणे

आईवडील सांगतात म्हणून स्वतःच्या मनाची तयारी नसली तरी आजही अनेक मुलींची मनाविरुद्ध लग्न होतात. एखाद्याच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न हा आपल्या देशात अत्यंत महत्वाचा मुद्दा मानला जातो. किंबहुना घरच्यांपेक्षा नातेवाईक आणि शेजारीपाजारी ह्यांनाच दुसऱ्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता असते.

मग ह्याच पिअर प्रेशर खाली येऊन, लोक काय म्हणतील, घरच्यांना नाही कसे म्हणायचे हा विचार करून मनाविरुद्ध लग्नाच्या बेडीत अडकण्याची चूक मागच्या पिढीतील अनेक स्त्रियांनी केली आणि आजही अनेक मुली ह्या प्रेशरला बळी पडून मनाविरुद्ध लग्न करण्याची चूक करत आहेत. आणि ही चूक त्यांना आयुष्यात खूप भारी पडते.

 

forced marriage india InMarathi

३. घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाला बळी पडून मुलं जन्माला घालणे

लग्न होत नाही की आजूबाजूचे लोक आणि घरची माणसे सुद्धा लगेच “आता पेढे कधी देणार” ह्याची चौकशी करतात. मग लोकांच्या, घरच्यांच्या प्रेशरखाली येऊन स्वतःची शारीरिक आणि मानसिक तयारी नसताना देखील मूल जन्माला घालणे ही चूक अनेक बायका करतात.

एका बाळंतपणात त्रास होऊन देखील केवळ मुलाच्या अट्टाहासापायी किंवा घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून अनेक बायका स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा विचार न करता बाळंतपण अंगावर ओढवून घेण्याची प्रचंड मोठी चूक करतात.

मुलं होऊ देणे, न होऊ देणे, केव्हा होऊ देणे, किती होऊ देणे हा सर्वस्वी खाजगी निर्णय आहे. पण त्यात समाजाने किंवा दुसऱ्याने प्रेशर टाकले की बायका त्या प्रेशरला बळी पडून प्रसंगी स्वतःचाही बळी देतात.

 

tortured Pregnanancy InMarathi

 

४. इतर स्त्रियांना मदत न करणे किंवा पाठिंबा न देणे

स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे असे उगाच म्हणत नाहीत. बायकाच बायकांना प्रगती करण्यापासून रोखतात. एकमेकींशी असलेली स्पर्धा, एकमेकींबद्दल वाटणारी ईर्ष्या ह्यामुळे बायका एकमेकींना मदत तर करत नाहीतच उलट एकमेकींना मागे खेचण्यात धन्यता मानतात.

घरातल्या घरात सासू सुना एकमेकींशी ह्याच ईर्ष्येतून राजकारण खेळतात. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा एखाद्या बाईवर अन्याय होत असेल, ती संकटात सापडली असेल तर बायका सरळ “आपल्याला काय करायचंय” असा विचार करून दुर्लक्ष करून निघून जातात.

 

saasu-Sun-InMarathi

५. मुलगी नको असणे

आपण स्वतः सुद्धा एक स्त्रीच आहोत ह्या गोष्टीचा संपूर्ण विसर पडून “वंशाच्या दिव्याचा” आग्रह धरणाऱ्या ह्या स्त्रियाच असतात. त्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या करायला किंवा सुनेला स्त्रीभ्रूणहत्या करायला लावायला सुद्धा त्या मागेपुढे बघत नाहीत.

स्त्रीअर्भकाला कचऱ्यात टाकून देणाऱ्या सुद्धा स्त्रिया असतात. मुलगी म्हणजे डोक्यावर ओझे हा विचार करणाऱ्या लोकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे. स्त्रियांनाच मुलगी नको असणे हा विचारच किती चुकीचा आहे!

 

foetus-inmarathi

६. व्हिक्टिम शेमिंग चालू देणे

एखाद्या स्त्रीवर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल तर समाज आधी त्या पीडित स्त्रीलाच दोष देतो. ह्यात बायका सुद्धा आघाडीवर असतात. बायकांनी बायकांची बाजू समजून घेऊन एकत्र येऊन पीडित स्त्रीला न्याय मिळवून देण्यास मदत केली पाहिजे. किंवा कमीत कमी तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पण समाजात मात्र उलटेच घडताना दिसते. स्त्रियाच स्त्रियांना जज करताना दिसतात.

 

Victim Shaming Inmarathi

७. स्वसंरक्षणाकडे लक्ष न देता फक्त सौंदर्याकडेच लक्ष देणे

स्त्रीने कायम सुंदरच दिसले पाहिजे, आणि त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजे अशीच मानसिकता आपल्याकडे आहे. स्त्रिया मार्शल आर्टस् किंवा बॉक्सिंग वगैरे शिकल्या तर त्या पुरुषी दिसतात असा गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये आढळतो. हेच खरे मानून मुली सुद्धा स्वसंरक्षण न शिकता फक्त सुंदर कसे दिसायचे ह्याकडे लक्ष दिसतात.

पण मेक अप बरोबरच समोरच्याला वेळेला दोन फटक्यात लोळवता आले पाहिजे हे त्या विसरतात. स्वसंरक्षण शिकणे ही काळाची गरज आहे पण दुर्दैवाने ह्याकडे स्त्रिया /मुली दुर्लक्ष करताना दिसतात.

 

self-defense InMarathi

८. हुंडा मागणाऱ्याशी लग्न करणे

हुंडा किंवा मुलीच्या वडिलांकडून महागड्या वस्तू मागणारे किंवा तशी अपेक्षा करणारे भविष्यात आपल्याशी कसे वागू शकतील ह्याचा अंदाज मुली घेत नाहीत आणि हुंडा मागणाऱ्याशी लग्न करून स्वतःच कुऱ्हाडीवर पाय मारून घेतात.

अश्या लबाड आणि लोभी व्यक्तीशी संसार कसा करणार हा विचार मुलीच्या मनात न येणेच चुकीचे आहे. ह्यातूनच मग हुंडाबळीच्या कितीतरी घटना घडतात.

९. स्वतःच स्वतःचा आदर न करणे

आपणच स्वतःचा आदर नाही ठेवला तर लोक काय करणार? बरेचसे लोक तसेही स्त्रियांना कमी लेखतात, त्यांना कमी किंवा हीन दर्जाचे मानतात. अश्या वेळी आपणच आपला आदर केला नाही तर लोक आपल्याला पायाखाली तुडवून पुढे जायला कमी करत नाहीत.

आपला आत्मसन्मान जपणे खूप आवश्यक आहे. पण बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या आत्मसन्मानाचा बळी देऊन त्याग करतात. आणि नंतर त्यांना सगळे गृहीत धरू लागले की मग त्यांना त्यांची चूक कळते. स्वतःसाठी उभे राहणे, स्वतःच्या मनाचा, आत्मसन्मानाचा विचार करणे ह्यात कुठेही चुकीचे काहीही नाही.

 

Self Image - InMarathi

पण बायकांकडून त्यागमूर्ती होण्याचीच अपेक्षा करणाऱ्यांना हे चूक वाटते आणि बायका सुद्धा ह्यात भयानक काहीतरी चूक आहे असा विचार करून आपला आत्मसन्मान दुसऱ्याला पायदळी तुडवू देतात.

१०. सुंदर दिसण्यासाठी बारीक होण्याचा अट्टाहास करणे

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि आजारांना लांब ठेवण्यासाठी आहार विहार आणि व्यायामाची काळजी घेतली तर ते आवश्यकच आहे. पण केवळ स्त्रियांनी नाजूक आणि सुंदरच दिसले पाहिजे ह्या प्रेशरखाली स्त्रिया काहीही करून बारीक होण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे.

 

Gym Work InMarathi

स्वतःचे शरीर निरोगी ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण स्त्रिया मात्र आयडियल फिगर आणि साईझ झिरोच्या अट्टाहासापायी स्वतःच्या शरीराचे नुकसान करून घेतात. त्या बारीक तर होतात पण अशक्त होतात आणि हे चुकीचे आहे.

११. स्वतःच्या आहाराकडे नीट लक्ष न देणे

आजही कित्येक स्त्रिया परिवारातल्या सर्वांच्या आहाराची काळजी घेताना स्वतःच्या आहाराची काळजी घेणे मात्र विसरतात. अन्न कमी पडले तर अर्धपोटी राहणे असा प्रकार घरा-घरामध्ये सर्रास चालू असतो.

याच्या अगदी विरुद्ध, जास्त झाले तर उगाच फेकायला नको म्हणून जबरदस्तीने संपवणे किंवा शिळे खाणे, हे तर अधिक प्रमाणात घडून येतांना दिसतं. तसेच सगळ्यांच्या वेळा पाळताना स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे ह्या गंभीर चुकांमुळे बायकांच्या मागे अनेक आजार लागतात.

१२. स्वतःच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

कुटुंबातील कुणीही आजारी पडले तरी त्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांच्यासाठी धावपळ करणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या आजारपणाकडे मात्र दुर्लक्ष करतात. त्यांना होणारे त्रास अंगावर काढतात.

त्रास होत असताना देखील ते सहन करून त्याकडे दुर्लक्ष करतात. ह्यामुळे थोडक्यात बरे होणारे आजार नंतर गंभीर स्वरूप धारण करतात. ही चूक बायकांना खूप महागात पडू शकते.

 

Neglecting Health InMarathi

 

बायका ह्या चुका करतात आणि मग त्यांच्यावर आयुष्यभर पश्चाताप करत बसण्याची वेळ येते.

हे सर्व घडू नये म्हणून प्रत्येक स्त्री चे आप्त स्वकीय, मग तो नवरा, मुलगा, भाऊ, वडील अथवा जवळचा मित्र असू द्या, त्यांनी यावर तिला सजग करणे गरजेचे आहे.

पण, स्वतःचे आयुष्य अधिक निरोगी, निरामय, आनंदी आणि सुंदर रित्या जपणे आणि फुलवणे ही तिची स्वतःची आणि केवळ स्वतःची जबाबदारी आहे हे प्रत्येक स्त्री ने उमजून घेणे त्याहून अधिक महत्वाचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?