' स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी "ही" पुस्तकं वाचायलाच हवीत....!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी “ही” पुस्तकं वाचायलाच हवीत….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची निवड करणे. आजकाल बाजारात इतकी पब्लिकेशन्स आणि विविध लेखकांची नवनवीन पुस्तके येत असतात की, यातून नेमकी निवड करणे कठीण होऊन जातं.

अशावेळी, पूर्वी ज्यांनी आय.ए.एस. परीक्षेमध्ये उत्तम यश संपादित केलं आहे, अशा यशस्वी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची प्रत्येक आय.ए.एस. परीक्षार्थीची इच्छा असते. म्हणूनच, यूपीएससी टॉपर्सनी सुचवलेली, काही पुस्तकांची सूची येथे देत आहोत, याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच फायदा होईल.

आय.ए.एस.ची प्राथमिक परीक्षा पास केलेल्या टॉपर्सनी कोणती पुस्तके वाचली असावीत? यूपीएससीची प्रिलीम पास करण्यासाठी कोणत्या पुस्तकांची जास्त आवश्यकता आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी यूपीएससी सारख्या सगळ्यात कठीण परीक्षेत यशस्वी ठरलेल्या लोकांना फॉलो करणे, हा एक हमखास पर्याय आहे.

 

IAS Students InMarathi

 

आय.ए.एस. प्रिलिम्स पास होणे ही यूपीएससी परीक्षेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. जास्तीत जास्त उमेदवार याच टप्प्यावर बाहेर जातात. म्हणून आय.ए.एस. प्रिलिम्सच्या तयारीसाठी भरपूर अभ्यास करावा लागतो.

अनेकदा असे दिसून येते की, योग्य मार्गदर्शन आणि माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी चुकीची किंवा कमी महत्त्वाची संदर्भ साधने आणि पुस्तके वाचण्यात आपला बहुमुल्य वेळ खर्ची घालवतात आणि यशापासून दूर जातात.

म्हणूनच, आय.ए.एस. प्रिलीम परीक्षेसाठी महत्त्वाची असणारी संदर्भ साधने आणि पुस्तकांची यादी इथे देत आहोत. ही पुस्तके वाचल्याने तुमचा अभ्यास अधिक सखोल तर होईलच पण, या पुस्तकांच्या अभ्यासाने तुम्हाला आय.ए.एस. परीक्षा क्रॅक करण्यातही निश्चित मदत होईल.

आय.ए.एस. प्रिलिम्ससाठी सर्वात चांगली पुस्तके

 

jagran josh

 

(जुन्या एनसीआरटी) ची आर. एस. शर्मा यांचे “प्राचीन भारत” (Ancient India) हे पुस्तक युपीएससी आय.ए.एस. प्रिलिम्स परीक्षेतील सर्व अभ्यासक्रम कव्हर करते. परीक्षेत किती तरी प्रश्न असे सापडतील जे सरळ सरळ या पुस्तकातून काढलेले असतील.

सतीश चंद्र यांचे (जुनी एनसीआरटी) मध्ययुगीन भारत का इतिहास, हे पुस्तक मध्ययुगीन इतिहास पूर्णतः समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि अचूक माहिती देणारे पुस्तक आहे. यात मध्ययुगीन इतिहासातील विषय चांगल्या पद्धतीने समजावून देण्यात आले आहेत.

स्पेक्ट्रम पब्लिकेशनच्या “A brief history of modern India” या पुस्तकासोबतच सुजाता मेनन यांच्या “Concese history of modern India” या पुस्तकातून आधुनिक भारताच्या इतिहासाचा आवश्यक अभ्यास्क्रम चांगल्या रीतीने समजावून देण्यात आला आहे.

भारतीय संस्कृती खंड यासाठी विद्यार्थ्यांनी स्पेक्ट्रम पब्लिकेशनचे “Facets of Indian culture” हे पुस्तक वाचले पाहिजे त्याचसोबत सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्राची वेबसाईट पाहून देखील नोट्स अपडेट करता येतील.

देशातील चालू सांस्कृतिक घडामोडी आणि त्या संबधित मुद्द्यांवर नोट्स काढण्यासाठी आणि या विषयाची तयारी करण्यासाठी ही वेबसाईट अतिशय उपयुक्त ठरू शकते.

भारतीय भूगोल या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एनसीआरटीच्या पुस्तकांनाच सर्वाधिक पसंती दिली जाते. भौतिक भूगोल समजून घेण्यासाठी गो चेंग लीओंग याचे “Certificate physical and human geography” हा एक चांगला पर्याय आहे. भौतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी ऑक्सफर्ड स्कूलच्या नकाशांचा जरूर अभ्यास करावा.

भारतीय राजकारणाची तयारी करत असताना सर्वात जास्त ज्या पुस्तकाचे नाव सुचवले जाते त्यामध्ये लक्ष्मीकांत यांचे “Indian polity” आणि डी. डी. बासू यांचे “An introduction to the constitution of India” ही दोन नावे महत्त्वाची आहेत. या दोन पुस्तकांशिवाय या विषयावरील एनसीआरटीच्या जुन्या पुस्तकांचा अभ्यास करायला हवा.

अर्थशास्त्रातील मुलभूत सिद्धांत आणि शब्दावली जाणून घेण्यासाठी आय.ए.एस.ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एनसीआरटीची पुस्तके वाचणे महत्वाची आहे.

१२वी च्या अभ्यासक्रमातील मायक्रोइकोनॉमिक्सचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील मूल शब्दावलींचा अर्थ दिलेला आहे. देशाची वृद्धी आणि विकास यांचा अभ्यास करताना या शब्दावलींचा विशेष फायदा होतो.

भारतीय अर्थव्यवस्थेवर अधिक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आणखी दोन पुस्तके सुचवली जातात ज्यामध्ये रमेश सिंह यांचे “Indian Economy” आणि मिश्रा आणि पुरी यांनी लिहिलेले “indian Economy” आणि “Economic Survey” यांचा समावेश आहे.

 

IAS books inmarathi 1
careerIndia

 

पर्यावरण आणि इकोसिस्टीम यांची तयारी करण्यासाठी आय.ए.एस. परीक्षार्थीनी एनआयओएस द्वारे पर्यावरण आणि इकोसिस्टीम याबाबत दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा जरूर अभ्यास करावा.

याव्यतिरिक्त पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारतस सरकार आणि संयुक्त राष्ट्राच्या युएनएफसीसीसीच्या विकास योजनांची माहिती ठेवणे गरजेची आहे.

विश्लेषणात्मक तर्कशास्त्र या विषयात विशेषत: आर. एस. अग्रवाल यांची पुस्तके जास्त उपयुक्त ठरतात. याशिवाय एम. के. पांडे यांच्या “Analytical Reasoning” या पुस्तकाची देखील मदत घेऊ शकता.

गणिताच्या तयारीसाठी एस चांद पब्लिकेशनची पुस्तके पुरेशी आहेत. चालू घडमोडीसाठी द हिंदू पेपर, मासिके आणि डिजिटल मिडियाच्या इतर प्लॅटफॉर्म वर जाऊन बातमी वाचू शकता.

एमएचइचे जनरल स्टडीज पेपर : हे पुस्तक परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये अभ्यासाच्या हेतूने जे प्रश्न दिले आहेत त्यांचा परीक्षेसाठी निश्चितच फायदा होतो.

आय.ए.एस. मेन्स पेपर १ साठी :

आर. एस. शर्मा यांचा प्राचीन इतिहास, नितीन सिंघानिया यांचे कला एवं संस्कृती हे पुस्तक मेन्ससाठी देखील उपयोगी पडेल. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास केला तर, इतिहासाचा सारांश पक्का व्हायला मदत होईल.

राजीव अहिर यांचे “The spectrum of modern india”, “Politics in India since Independence-NCERT ही पुस्तकेदेखील प्रिलिम्स सोबतच मेन्सची तयारी करण्यास देखील चांगली आहेत. “Fundamentals of Physical Geography” हे पुस्तक भौगोलिक घटना आणि जागतिक भूगोलाची वैशिष्ट्ये समजून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

आय.ए.एस. मेन्स पेपर २ साठी :

Indian Constitution at Work हे पुस्तक भारतीय राजकारण आणि त्याचे काम कसे चालते हे समजून घेण्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरते. भारत सरकारद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या नवीन योजना, कल्याण योजना, शिक्षण, आरोग्य आणि निम-सरकारी संघटना यांच्या बद्दलच्या योजनांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय  आहे.

शशी थरूर यांचे  Pax Indica हे पुस्तक म्हणजे एक चांगला संदर्भ ग्रंथ आहे, ज्यामधून भारताने वेगवेगळ्या देशासंदर्भात वेळोवेळी घेतलेल्या भूमिका समजून घेण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका आणि दृष्टीकोन समजून घेता येते.

आय.ए.एस. मेन्स पेपर ३ साठी :

उमा कपिल यांचे Indian Economy हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक एक चांगला अभ्यास स्त्रोत आहे.

नीरज कुमार यांचे Lexicon for Ethics, Integrity & Aptitude for IAS General Srudies हे पुस्तक नैतिकता आणि मूल्यप्रणाली यांची मुलभूत संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे.

या काही अत्यंत महत्वाच्या पुस्तकाच्या अभ्यासाने आय.ए.एस. करू इच्छिणारे विद्यार्थी परीक्षेची चांगली तयारी करू शकतात. आय.ए.एस. परीक्षा पास झालेल्या टॉपर्सनी दिलेल्या माहितीतून इथे या पुस्तकांची यादी देण्यात आली आहे. निश्चितच इथून पुढेही आय.ए.एस.ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.

तर मित्र-मैत्रिणीनो – लागा तयारीला !

 

study book reading exam inmarathi
leverageedu.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?