'सावधान : तुम्ही नेहेमी अपयशी ठरणाऱ्या या १३ प्रकारच्या व्यक्तींपैकी तर नाही आहात ना?

सावधान : तुम्ही नेहेमी अपयशी ठरणाऱ्या या १३ प्रकारच्या व्यक्तींपैकी तर नाही आहात ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्याही आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक कमी असल्याने ऑफिस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जुळवून घेणे त्यांना कठीण जाते. अशा व्यक्ती आपल्या करिअरमध्ये देखील पिछाडीवर राहतात.

 

sad-girl-inmarathi
news.un.org

इथे आम्ही अशा लोकांची काही वैशिष्ट्ये देत आहोत. तुम्हाला स्वतःला जर वाटले की ही वैशिष्ट्ये तुमच्यातही जाणवतात तर, फार निराश होण्याची गरज नाही.

यातील प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्यावर थोडा अभ्यास करून तो बदलता येतो, ज्यामुळे तुमच्या करिअर ग्राफवर याचा विपरीत परिणाम होणार नाही. समोर उद्भवलेल्या परिस्थितीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला शिकल्यास, अनेक समस्या कमी होतील.

१. घाबरट व्यक्ती –

कामाच्या ठिकाणी आपल्या हातून काही चूक झाल्यास आपल्याला बोलून घ्यावं लागेल. आपल्याला चुकीचे ठरवले जाईल अशी भीती असणारी व्यक्ती नेहमी आपल्या चुका इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न करते.

अशी लोकं नेहमी इतरांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करतात. हे लोक कधीच जे बरोबर असेल त्याची बाजू घेणार नाहीत.

 

Scared Inmarathi
Freepik

२. सतत नकारात्मक विचार करणारे लोक –

सतत नकारात्मक विचार करणारे लोक इतरांच्यातील उत्साह देखील मारून टाकतात. या लोकांच्या दृष्टीने ग्लास नेहमीच अर्धा रिकामा असतो. अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनही हे लोक भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण करतात.

 

Negative Thinking Inmarathi
Medium

३. उद्धटपणा –

उद्धट लोकं नेहमी इतरांचा वेळ खात असतात. कारण प्रत्येक गोष्टीकडे ते व्यक्तिगत आव्हानाच्या रुपात पाहतात. अतिरेकी आत्मविश्वास असणे हे उद्धटपणाचेच लक्षण असते.

अशा व्यक्ती स्वतःला प्रचंड असुरक्षित समजतात. अशा व्यक्तींकडे कामाचा उरक देखील नसतो आणि ते कधीच इतरांच्या मताशी सहमत होत नाहीत.

 

Arrogant InMarathi
DNA India

४. शीघ्रकोपी –

अशा व्यक्तींना आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवावे हेच कळत नाही. अशा व्यक्तींच्या मताप्रमाणे कामे झाले नाहीत तर या व्यक्तींचे संतुलन बिघडते. अशा लोकांना आपल्या भोवतालच्या व्यक्तींशी जुळवून घेणे कठीण जाते.

अशा लोकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने, त्या प्रचंड चिडचिडेपणा करतात किंवा अचानक त्यांना रडायला येतं.

 

angry-face-inmarathi03
globalseducer.com

५.कपटी –

करिअर मध्ये फक्त वरच्या लेवलवर जाणे हेच ज्यांचे ध्येय असते, ते करिअर मधील वाढत्या संधीला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतात. हे प्रचंड महत्वाकांक्षी असतात. ज्या कल्पना त्यांनी मांडलेल्याच नसतात, त्यांचे श्रेय घेण्याचा हे लोकं सतत प्रयत्न करतात.

इतरांपेक्षा पुढे जाणे, यांच्यासाठी खूप महत्वाचे असते आणि यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. इतरांना मदत करणे, संभाळून घेणे, अशा गोष्टींचा या लोकाकडे अभाव असतो.

 

Office-Politics Inmarathi
Campus Career Club

६. “मी सर्वात हुशार” –

असे लोक जेंव्हा ऑफिसमध्ये बसलेले असतात, तेंव्हा त्यांचा समज असतो, की मी सोडून इथे दुसरे कोणीच शहाणे असू शकत नाही. जर काही चुकीचे झाल्यास इतरांनी कसे आपले म्हणणे डावलल्याने ही वेळ आली, हे पटवून देण्यात ते पटाईत असतात.

यांचं एकंदरीत वर्तन असं असतं की काही गोष्टी अगदी ठीकठाक झाल्यास त्या फक्त त्यांच्या हुशारीमुळे झालेल्या असतात. अशा व्यक्ती काहीशा उद्धट देखील असतात, त्यामुळे अशा व्यक्तींना इतरांचा विश्वास जिंकता येत नाही.

 

oversmart people Inmarathi
Forbes

७. त्रस्त असणे –

अशा लोकांना नेहमी असे वाटते, की ते इतरांच्या चुकीची शिक्षा भोगत आहेत.ऑफिस मध्ये काही चुकीचे घडल्यास असते, त्यात यांचा काहीही वाटा नसतो.

कोणतिही जबाबदारी घेणे यांना अत्यंत कठीण काम वाटते. छोट्या छोट्या चुकांचे खापर देखील ते इतरांवर फोडत असतात. ऑफिसमधील नियम हे मी सोडून इतरांना बंधनकारक आहेत, अशी त्यांची धारणा असते.

 

frustrated-man-marathipizza01
indianhusbands.blogspot.in

८. कर्मठ –

या लोकांना नव्या कल्पनां स्वीकारणे अशक्य असते. पूर्वी ज्या पद्धतीने कामे होत होती, किंवा ते करत होते, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल यांना नको असतो.

ज्या पद्धतीचे काम ते करत असतात त्यात काही बदल करावा असे त्यांना वाटत नाही, यामुळे त्यांच्या करिअर मध्ये काही फायदा नाही झाला तरी चालेल पण, कोणताही बदल स्वीकारायला हे लोक तयार नसतात.

 

Stubborn Inmarathi
wikiHow

९. कमकुवत मानसिकता –

अशा लोकांमध्ये चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याचे धाडस नसते. अगदी ऑफिसमध्ये कुणी यांच्याशी चुकीचे वर्तन करत असतील तर, त्यांना देखील हे लोक स्पष्टपणे सुनावू शकत नाहीत. यांच्यावर इतरांच्या मतांचा चटकन प्रभाव पडतो.

स्वतःचा प्राधान्यक्रम ठरवता न आल्याने असे लोक नेहमी इतरांच्या तुलनेत मागे राहतात. स्वतःच्या टीमला ते नव्या कल्पना देऊ शकत नाहीत, यामुळे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना देखील याचा फटका बसू शकतो.

 

Bullied Inmarathi
The Economic Times

१०. इतरांबद्दल कुजबुज करणारे –

आपल्या सहकाऱ्याबद्दलची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती मिळवण्यातच या लोकांचा बहुतांश वेळ वाया जातो. नंतर अशी माहिती ते ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांना सांगत बसतात.

असे लोकं ऑफिसच्या कामात कृतीशील राहण्याऐवजी ऑफिसमधील राजकारणावरच जास्त बोलत असतात. अशा लोकांची व्यावसायिक प्रतिष्ठा धोक्यात येते. अनेकदा यांच्यावर सहकाऱ्यांचा अतोनात विश्वास असतो.

त्यामुळे इतरांबद्दल गैरसमज पसवण्यात अशा व्यक्ती यशस्वी ठरतात.

 

Gossip Inmarathi
my Learning Solutions

११. चंचल –

चंचल स्वभावाचे लोकं वाऱ्याच्या दिशेनुसार वागतात. एखादे काम यांच्याकडून झाले नाहीतर, संधी मिळाली नसल्याची तक्रार करतील. थोड्याशा यशानेही शेफारून जातील. अशा लोकांना हे समजत नाही की, त्यांना येणाऱ्या अडचणी या परिस्थितीमुळे नाही तर, त्यांच्या स्वभावामुळे येत असतात.

 

excuses Inmarathi
Business News Daily

१२. भावनेच्या आहारी जाणारे लोक –

अशा लोकांना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा लोकांना सतत कोणावर तरी, ठपका ठेवायचा असतो. यांना स्वतःच्या भावना इतरांवर लादायच्या असतात.

अशी लोकं इतरांच्या बाबतीतही भावनिक दृष्टीनेच विचार करतात. त्यांचे स्वतःवर नियंत्रण नसल्याने सहकाऱ्यांशी असलेले संबंध देखील बिघडतात.

 

Arguments Inmarathi
Financial Times

१३. सतत दिलगिरी व्यक्त करणारे –

काही लोक अगदी मोठ्या मनाने आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतात. पण, काही लोक असे देखील असतात, ज्यांना सतत खेद किंवा दिलगिरी व्यक्त करण्याची सवय असते. अशा लोकांकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो.

म्हणून आपल्या नव्या कल्पना मांडताना किंवा कोणतीही नवी गोष्ट करताना या लोकांना सतत दिलगिरी व्यक्त करण्याची सवय असते. त्यांना अपयशाची भीती वाटते, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्याने ते स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

तुमच्या बोलण्याच्या टोन वरून आणि आवाजातील ठामपणावरून तुमच्या कल्पना किती चांगल्या आहेत, हे समोरच्याला पटवून देता येणे गरजेचे आहे.

परंतु, अनावश्यक दिलगिरी व्यक्त करत राहिल्याने, तुम्ही कितीही चांगली कल्पना मांडलीत तरी, त्याचे महत्व इतरांच्या लक्षात येत नाही.

 

Sorry people Inmarathi
ScoopWhoop

अर्थात, यापैकी एखादाही गुण संपूर्ण करिअर नष्ट करू शकतो असा नाही. हे दोष स्वतःतून काढून टाकता येतात, आणि नवे गुण आत्मसात करता येतात. आपला भावनिक बुद्ध्यांक वाढवणे शक्य असते. यासाठी आवश्यक आहे ती बदलण्याची महत्वाकांक्षा आणि थोडेसे स्व-भान जपणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?