५ वर्षात करोडपती व्हा: या १८ स्टेप्स फॉलो करा आणि जगज्जेत्यांच्या रांगेत बसा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यापैकी प्रत्येक जण काही लाखात कमवत नाही. पण, म्हणून आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाही असे नाही.

थोडा वेळ लागेल पण, पैशाला पैसा जोडत राहिल्यास एक दिवस नक्कीच पैशाची रास लागू शकते.

india.com

श्रीमंत होणे फार अवघड नाही.

थोडीशी जिद्द आणि थोडीशी शिस्त असेल तर, किमान पाच वर्षाच्या कालावधीत तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता.

त्यासाठी मात्र काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करावे लागेल.

१. अविचारपूर्वक खर्च करणे टाळा –

कोणतीही वस्तू खरेदी करताना ती खरच गरजेची आहे का? आपण जी किंमत मोजणार आहोत ती त्यासाठी योग्य आहे का?

चैनीची वस्तू आणि गरजेची वस्तू यातील फरक लक्षात घ्या.

चैनीच्या वस्तूवर पैसे खर्च करण्यापेक्षा तो पैसा बचत करा. खर्च करण्याची योग्य सवय लावून घ्या.

 

Impulsive buyer-InMarathi

२. रिटायरमेंट प्लॅन लवकरात लवकर सुरु करा –

सध्याचा खर्च भागवून काही पैसे भविष्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. त्यातलीच एक बाब म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग, हे तुम्ही जितक्या लवकर सुरु कराल तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील.

 

planning Sequence InMarathi

३. कर जागृती –

तुमचा कर कसा आणि कुठे कापला जातो, कुठे इंवेव्हेस्ट केल्यावर कर कपातीमध्ये बचत होऊ शकते याचा पूर्ण अभ्यास करून पैसे गुंतवा.

आर्थिक साक्षर होण्यावर भर द्या. करप्रणाली आणि तुमची मिळकत यांची सांगड कशी घालायची याचा अभ्यास करा.

 

income tax ndtv

४. स्वतःचे घर घ्या –

अनेक जण स्वतःचे घर घेण्याऐवजी भाड्याने घर घेऊन राहतात. भाड्याचे घर हा काही बचतीचा योग्य मार्ग नव्हे.

म्हणून भाड्याच्या घरातून बाहेर पडून स्वतःचे घर कसे घेता येईल याचे नियोजन करा. यामुळे तुमचा पैसा वाचेल आणि भविष्यातील सुरक्षेची देखील तरतूद होईल.

पण हे करताना होम लोनच्या चक्रात देखील अडकू नका! उत्पन्न वाढवत, विविध उत्पन्नाचे स्रोत तयार करत घर घेण्याची तजवीज करा.

 

house-inmarathi
Justdial.com

५. महागडी गाडी –

वाहन असणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे सध्या पण, गाडी घेताना जास्त पैसे गुंतवू नका. गाडीचे हप्ते परवडतील अशीच गाडी खरेदी करा.

 

car tyres inmarathi
News18.com

६. स्वतःचे मूल्य ओळखा –

कधी कधी लोकं आपल्या बॉसशी प्रामाणिक राहून काम करतात. पण त्याचा मोबदला त्यांना पगाराच्या रुपात मिळत नाही.

म्हणून प्रामाणिकपणे काम करूनही पगारात वाढ मिळत नसेल तर, ज्याठिकाणी तुमच्या कौशल्याला वाव आणि चांगली किंमत मिळेल अशा ठिकाणी काम करा.

 

Self Image - InMarathi
Vectorstock.com

७. वस्तुनिष्ठ दृष्टीकोन –

पाचही बोटं तुपात असण्यासाठी तुम्हाला लॉटरीच लागली पाहिजे असे काही नाही.

योग्य वेळी सुरुवात, गरजेपुरता खर्च आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला काही वर्षांत लाखो रुपयांचा फायदा मिळू शकतो.

 

investment-inmarathi
dailymail.co.uk

८. लिखित आर्थिक नियोजन –

फालतू खर्च टाळण्यासाठी तुमच्या मासिक खर्चाचे नियोजन लिहून काढा.

तुम्ही तुमचे नियोजन लिहून काढल्यास त्यानुसार खर्च करणे आणि बचत करणे दोन्ही शक्य होईल. ज्यामुळे ध्येयापर्यंत पोचण्याचा तुमचा मार्ग अधिक सुकर होईल. अवास्तव खर्च देखील टाळला जाईल.

 

Indian-Stock-Market-Tips-marathipizza02
meghainvestments.com

९. आवाक्याच्या बाहेरचा खर्च टाळा –

महागडे कपडे, दागिने, घड्याळे, असा अवास्तव खर्च करू नका. तुमच्या कुवतीनुसारच खर्च करा.

याचा अर्थ कंजुषी करा असा होत नाही. पण, पैसे कुठे खर्च करायचे, कुठे नाही याचा ताळेबंद ठरवा.

 

empty-wallet- Inmarathi
Van Hulzen Asset Management

 

१०. कर्ज घेऊ नका –

क्षुल्लक गोष्टींसाठी कर्ज घेऊ नका. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी क्रेडीट कार्डचा वापर करू नका.

ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यातील नाहीत त्यांची अपेक्षा किंवा हाव तुम्हाला कर्जबाजरी बनवू शकते. ज्यामुळे श्रीमंत होण्याच्या तुमच्या महत्त्वाकांक्षेत अडथळे निर्माण होऊ शकतात.

म्हणून शक्यतो कर्जापासून दूर रहा.

 

 

११. पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा –

गुंतवणूक करण्यासाठी खूप पैसे असले पाहिजेत असे नाही. तुम्ही बचत करून साठवलेली रक्कम मुच्युअल फंड मध्ये गुंतवा जिथे तुम्हाला चांगल्या परतीची हमी मिळेल.

 

investment-inmarathi
businessfundingshow.com

१२. स्वतःचा व्यवसाय सुरु करा –

जगभरातील अनेक लखपती लोकांचे निरीक्षण केल्यास एक गोष्ट समजून येईल की, हे लोक दुसऱ्यांकडे नोकरी करत नाहीत तर, ते इतरांना नोकरी देतात.

उद्योजकच देशाच्या संपत्तीत भर घालतात. स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा दुप्पट करतात. तुमच्या आवाक्यात असेल असा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घ्या.

 

Own Business Inmarathi
wikiHow

१३. व्यावसायिक सल्ला घ्या –

पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. चांगला सल्लागार तुमचा पैसा चांगल्या परताव्यासह कसा मिळेल याचा मार्ग दाखवेल.

या क्षेत्रातील एक तरी सल्लागार तुमच्या संपर्कात असणे गरजेचे आहे. व्यावसायिक सल्लागार तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही, याची दक्षता कशी घ्यावी याबाबत देखील सल्ले देऊ शकतात.

 

Advice
StartupNation.com

१४. मिळकतीचे मार्ग वाढवा –

पैसा मिळवण्यासाठी एकाच प्रकारचे काम करण्याऐवजी त्याच कामाशी संबधित आणखी काही काम करता येते का पहा, एकाऐवजी दोन-तीन मार्गांनी पैसा आल्यास तुमची मिळकत वाढेल.

 

multiple-income-streams
Acudeen

१५. ज्ञान वाढवा –

दिवसातून किमान ३० मिनिटे वाचन करा. गाडी चालवताना पॉडकास्ट ऐका किंवा तुमच्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन ऐका.

पण, तुमच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करा. फक्त स्वतःच्याच क्षेत्रातले नाही तर, राजकारण, क्रिकेट, फिल्म, साहित्य अशा सगळ्या क्षेत्रातील चौफेर ज्ञान असणे गरजेचे आहे.

 

knowledge is Power Inmarathi
ThinkRichThinkPoor.com

१६. श्रीमंत व्यक्तीच्या संपर्कात रहा –

तुमच्या पेक्षा अधिक यशस्वी लोकांच्या संपर्कात रहा. ज्यामुळे तुमच्या विचारांचा आवाका वाढेल. तुम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येता, त्यांच्यासारखे बनता हा नियम लक्षात ठेवा.

श्रीमंत व्यक्तींच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्या काही सवयी देखील तुम्ही कॉपी करू शकता.

कल्पना ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे आईनस्टाईनने म्हंटले आहे. श्रीमंत होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे स्वतःला श्रीमंत समजा.

तुम्हाला जितका पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी हवी ती तुमच्या जवळ आहे अशी कल्पना करा.

 

Successfull people Inmarathi
inscapeconsulting.com

१७. पुनरावलोकन करा –

दर ९० दिवसांनी मागील नव्वद दिवसात तुमच्या आर्थिक परीस्थित काय किती आणि कशी वृद्धी झाली याचे पुनरावलोकन करा.

त्यानंतर, पुढील ९० दिवसासाठीचे ध्येय निश्चित करा आणि ते अचिव्ह करण्यासाठी कामाला लागा.

यामुळे तुम्ही नक्की कोणत्या दिशेने प्रगती करत आहात हे तुम्हाला समजून येईल.

 

introspections InMarathi

१८. आवश्यक ते बदल करण्याचा कंटाळा करू नका –

व्यवसायात, कामाच्या पद्धतीत किंवा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे याची तुम्हाला जाणीव झाल्यास अजिबात आळस न करता हा बदल स्वीकारा.

प्रगती करणे, बदल करणे, त्यासाठी धडपड करणे हाच जीवन जगण्याचा निरोगी दृष्टीकोन आहे.

 

change the way of thinking Inmarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “५ वर्षात करोडपती व्हा: या १८ स्टेप्स फॉलो करा आणि जगज्जेत्यांच्या रांगेत बसा

  • November 17, 2019 at 7:13 pm
    Permalink

    खूप छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?