'"प्रत्येक चूक स्त्रीचीच असते"- नाही का?!

“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का?!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

मध्यंतरी whatsapp वर एक video clip फिरत होती, पाळणाघरात एका बाळाला तिथल्या बाईने दिलेल्या त्रासाबद्दल !
अर्थातच बघून मन विषण्ण झालं आणि त्यावरच्या comments वाचून दुसऱ्यांदा !!

आजकाल बायका करीयरच्या नादी लागल्या आहेत मग काय होणार हा सगळ्यांचा मतितार्थ! अशी टीप्पणी करताना मति वापरलेली नसते त्यामुळे त्यात फारसा अर्थही नसतोच. नादी लागणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जाणं. त्याने केलं तर कर्तृत्व आणि तिने केलं तर नादी लागणं ? आपण ज्या दर्जाच्या समाजात राहातोय तिथे माझा प्रश्न अप्रस्तुत वाटेल काही जणांना. म्हणून मी उदाहरणंच देतेचं!

माझ्यापासूनच सुरुवात करू. मी लग्नापूर्वीच वकीली व्यवसायाला सुरुवात केली. लग्नानंतरही मी व्यवसाय चालू ठेवला. मला घरातून support होता. आज २४ वर्षांनंतर ह्या support चा मी विचार करते तेव्हा कळतं ती फक्त घराबाहेर पडण्याची परवानगी होती. It was subject to conditions… घर सांभाळण्यात कुठलीही कसूर होता कामा नये. समाजाने आखलेल्या चौकटींच्या मर्यादा मी पाळल्याच पाहिजेत. चौकट या शब्दाचं अनेकवचन यासाठी वापरलं की समाज ह्या चौकटी बदलत राहातो अन् घर सांभाळण्याचे किती आयाम असतात हे सांगणं म्हणजे type करताना हात थबकवून विचारांमधेच गुंतून पडणं. पण तरीही मी खुष होऊन आणि राहून माझ्या मनासारखं यश मिळवलं प्रत्येक आघाडीवर! त्यासाठी मी माझे छंद, करमणुक, विरंगुळा, हौसमौज हे सगळे शब्दच माझ्या dictionary मधून काढून टाकले. आज माझ्या कुटुंबात आणि बाहेरही मला मानाचं स्थान आहे .

(हे देखील वाचा: Love, लग्न : आग का दरिया है, डूब के जाना है !)

दुसरं उदाहरण माझी मैत्रिण मनीषाचं! ती पण वकील! MPSC पास होऊन सरकारी वकील झाली. त्या दरम्यान तिची मुलगी १६ -१७ वर्षांची झालेली. नव-याची practice जोरात. हिच्या joining ला विरोधही जोरात. आता मुलीचं करीयर बघायचं सोडून हीने  स्वार्थीपणाने स्वतःचं करीयर करू नये असा मुद्दा ! मी तिला सांगितलं, “मुलीचं लग्न करुन टाका म्हणावं. कुणाचं तरी एकीचंच करीयर घडणार असेल तर तुझ्याच आईवडीलांना यश मिळू दे.” माझी गोळी अगदी योग्य जागी लागली! तिची मुलगीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आता मनीषाही ” घर सांभाळून ” नोकरी करतेय तिची मुलगी engineer झाली पुण्यात job करतेय समाजाच्या चौकटीत राहून ! एक दोन वर्षांनी तिच्यासाठी स्थळ बघणार आहेत.

आमच्या पिढीसाठी ह्या कहाण्या अगदी common आहेत. ह्यात नवीन काही नाही. महिलांच्या करीयरबद्दल चर्चा करताना फार नाही फक्त दोन तीन पिढ्या मागे जाऊन विचार करा. हे का सुरु झालं ?

(हे देखील वाचा: अस्वस्थ करणारा ‘अर्थ’- शबानाचा आणि रोहिणीचाही !)

sad-woman

स्रोत

आर्थिक स्वातंत्र्य ही प्रत्येक adult ची गरज आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
नवरा हे सगळं सांभाळेल हे गृहीत धरून बायकोच्या करीयरला अनावश्यक मानलं जातं. पण लग्न हा एक जुगार आहे तिथे सगळे पत्ते आपल्या मनासारखे पडतील असं नाही. नवरा तिला आयुष्यभर सांभाळेल याची खात्री कोणी घेऊ शकतं का? तो कुटुंब सांभाळायला समर्थ ठरेल आणि हीच्या नंतरच मरेल ही खात्री तर नक्कीच नाही.

हे खूप harsh वाटतंय का? बरं जरा मऊ बोलूया.

विधवा, परित्यक्ता स्त्रियांचे आणि त्यांच्या मुलांचे हाल आपण समाज म्हणून तर अनुभवले आहेत नं ?

आणि यानंतरचा टप्पा आला स्त्रीशिक्षणाचा! शिक्षण देण्यापर्यंत आमच्यावर उपकार करायला समाज तयार झाला. मग एखादीवर उपरोल्लिखित वाईट वेळ आली तर तिने त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी असा सल्ला तर आपण देणार नाही ना ? घर सांभाळता येणं हे पुरुषांसाठीही तेवढंच गरजेचं झालं आहे. कारणं…वरचीच आहेत !

ती घर सांभाळायला समर्थ असेल का? आयुष्यभर सोबत करेल का? सगळ्याच जबाबदा-या कुटुंबाने आणि समाजाने वाटून घेतल्या पाहिजेत. So called space मागणारे आजी आजोबा, एकमेकांना न सांभाळणा-या दोन पिढ्या ज्या समाजात आहेत तिथे बालकांवर अन्याय होणार! एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येकाचं स्वातंत्र्य, आकांक्षा जपून एकमेकांना आधार देत राहिलं तर अनेक समस्या संपतील. काहीतरी वाईट घडलं की सवयीनेच स्त्रियांवर चूक ढकलण्यापेक्षा कुटुंब प्रबोधन आणि समाज प्रबोधन जास्त गरजेचं आहे.

मी सुरूवातीला उल्लेखिलेली comment , अतिशय sensible , sensitive असलेल्या खूप चांगली काव्य प्रतिभा लाभलेल्या माझ्या एका डॉक्टर मित्राची आहे .

(हे देखील वाचा: ती सध्या काय करते? – विनोद पुरे, आता हे वाचा! )

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?