' नासाचे मिशन्स “एकादशी”च्या दिवशी? वाचा नासा मिशन प्लॅनिंग कशी करते – स्टेप बाय स्टेप! – InMarathi

नासाचे मिशन्स “एकादशी”च्या दिवशी? वाचा नासा मिशन प्लॅनिंग कशी करते – स्टेप बाय स्टेप!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“अमेरिकेने एकादशीच्या दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्माण्डातील स्थिती संतुलित असते, त्यामुळे त्यांचा प्रयोग यशस्वी झाला” असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी ह्यांनी केले होते.

त्यांच्या ह्या विधानावर अनेकांनी उलटसुलट मते व्यक्त केली गेली.

संभाजी भिडे गुरुजी असेही म्हणाले की भारतीय कालमापन पद्धती ही अगदी परिपूर्ण असून आपल्याकडे पूर्वजांनी सेकंदाचा हजारावा भाग सुद्धा मोजायची पद्धत शोधून काढली आहे.

“अमेरिकेने ह्याच कालमापन पद्धतीचा उपयोग केल्याने त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला.” असे गुरुजींचे म्हणणे आहे.

 

sambhaji bhide inmarathi
dnaindia.com

 

गुरुजींच्या ह्या विधानामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे. काही लोक गुरुजींच्या म्हणण्याला दुजोरा देत आहेत तर काहींना हे विधान अजिबात पटलेले नाही.

कुठलाही उपग्रह अवकाशात सोडायचा म्हटल्यावर त्यासाठी भरपूर कॅल्क्युलेशन्स करावी लागतात. अवकाशातील परिस्थितीचा अभ्यास , पृथ्वीचे भ्रमण, गती, दिशा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा अभ्यासाव्या लागतात.

ह्या कॅल्क्युलेशन्स मध्ये थोडीही चूक झाली तर प्रयोग फसू शकतो. म्हणूनच डोळ्यात तेल घालून सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो.

सर्वसामान्य माणसाला कायम हा प्रश्न पडतो की अवकाश संशोधक, अमुक ह्या दिवशीच उपग्रह प्रक्षेपित झाला पाहिजे हे कसे ठरवत असतील? त्या मागे काय कारणे असू शकतील?

आज आपण हेच बघणार आहोत की नासा त्यांच्या मिशनचे प्लॅनिंग कसे करते.

 

man on moon

 

अवकाशात रॉकेट लाँच करणे म्हणजे चालत्या मेरी-गो राउंड मधून उडी मारण्यासारखे आहे. चालत्या मेरी गो राउंड मधून तुम्हाला उडी मारायची असेल तर असंख्य गोष्टींचा विचार करावा लागतो.

दार किती वेळात तुमच्या पर्यंत येईल, तुम्हाला उडी मारायला किती वेळ लागेल, तुमची गती, मेरी गो राउंडची तत्कालीन गती ह्या आणि इतर अनेक गोष्टींचा अगदी परफेक्ट विचार करून योग्य क्षणीच उडी टाकणे आवश्यक असते. नाहीतर तुम्ही अडकून पडू शकता.

तुम्ही मेरी गो राउंडचे दार तुमच्या अगदी पुढ्यात येईपर्यंत वाट बघत राहिलात तर तुम्ही वेळेत उडी टाकू शकणार नाही. तसेच तुम्ही दार तुमच्या पुढ्यात येण्याआधीच उडी टाकली तरी तुम्ही व्यवस्थित बाहेर पडू शकणार नाही.

 

space orbit inmarathi
quora.com

 

अवकाशयान प्रक्षेपित करताना असाच विचार करावा लागतो. फक्त ते चालत्या मेरी गो राउंड मधून उडी टाकण्याइतके सोपे नसल्याने असंख्य गोष्टींचा विचार फार मोठया प्रमाणावर करावा लागतो आणि प्रचंड कॅल्क्युलेशन्स असतात.

इंजिनिअर्स त्यांच्याकडे किती वेळ आहे ह्याचा हिशोब करतात. लाँच केल्यापासून अंतराळयान टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल ह्याचा अगदी मिनिट आणि सेकंदांचा देखील हिशोब केला जातो.

ह्या सगळ्या अंदाजाला आणि कॅल्क्युलेशनला लाँच विंडो असे म्हणतात.

हे लाँच विंडो स्पेसफ्लाईट ऑपरेशन्ससाठी इतके महत्वाचे असतात की नासा ह्या कामासाठी इंजिनियर्सची एक खास टीमच (फीडो किंवा FDO -फ्लाईट डायनॅमिक्स ऑफिसर्स) नियुक्त करते.

अंतराळयानाच्या प्रत्येक भागासाठी, प्रत्येक फेजसाठी वेगवेगळी तज्ज्ञ माणसे काम करीत असतात.

लाँच विंडो म्हणजे दोन टाइम पिरियड्समधील ओव्हरलॅप होय. ह्याला प्लेन विंडो किंवा फेज विंडो असे देखील म्हणतात.

जेव्हा अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या जवळ पाठवण्यात येणार असते, तेव्हा इंजिनिअर्स असे कॅलक्युलेशन करतात की इंटरनॅशनल स्पेस सेंटरचा परिभ्रमण मार्ग केनेडी स्पेस सेंटरच्या (फ्लोरिडा) अक्षांश आणि रेखांशाच्या थेट वर असेल किंवा जवळपास असेल. ह्याला प्लेन विंडो असे म्हणतात.

 

space window inmarathi

 

जर परिभ्रमण मार्ग केनेडी स्पेस सेंटरच्या थेट वर असेल तर तो दिवस लाँच साठी अगदी आदर्श समजला जातो. जर हा मार्ग पूर्व किंवा पश्चिम दिशेला काही किलोमीटरच्या अंतरावर असेल तर मग इंजिनिअर्सना अतिरिक्त स्टिअरिंग करावे लागते.

त्यासाठी मग अतिरिक्त इंधनाची गरज पडते आणि त्याचा थेट ताण एक्स्टर्नल टॅंक वर येतो. हा ताण कमी करण्याचा इंजिनिअर्स प्रयत्न करतात.

प्लेन विंडो परिदृश्याबद्दल अभ्यास करताना हे लक्षात घ्यावे लागते की पृथ्वीची फिरण्याची गती ही १०३५ mph आहे. तसेच अवकाशयान किंवा इंटरनॅशनल स्पेस सेंटरची कक्षा देखील निश्चित केलेली असते.

ह्याचा अर्थ असा की इंटरनॅशनल स्पेस सेंटरची परिभ्रमण कक्षा पृथ्वीवरील विविध भागात नव्वद मिनिटांसाठी असते.

इंटरनॅशनल स्पेस सेंटरची परिभ्रमण गती ही वेगळी असते. त्यामुळे रोज फक्त अशी एकच प्लेन विंडो मिळते जेव्हा अंतराळयान कमी वेळेत, कमी इंधनात, त्यातल्या त्यात सोप्या मार्गाने टार्गेट ऑर्बिटमध्ये जाऊ शकेल.

 

launching rocket inmarathi
boston.com

 

आज ती वेळ चुकून मिस झाली तर परत ती वेळ येण्यासाठी म्हणजेच टार्गेट ऑर्बिट थेट संपर्कात येण्यासाठी २४ तास जावे लागतात. कारण पृथ्वीला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यास चोवीस तासांचा अवधी लागतो.

लाँच विंडो मधील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे फेज विंडो होय.

फेज विंडो हा असा काळ असतो ज्यामध्ये यान इंटरनॅशनल स्पेस सेंटरच्या रेषेत पण त्याच्या मागे सोडले जाते आणि इंटरनॅशनल स्पेस सेंटरच्या जवळ जाण्यासाठी एक वेळ निश्चित केलेली असते.

ही वेळ साधारणपणे प्रक्षेपण झाल्यानंतर तीन दिवसांनी असते. मर्यादित इंधनामुळे लाँच विंडोचा कालावधी फक्त अडीच ते दहा मिनिटे इतकाच मिळू शकतो.

तेवढ्याच वेळात यान आणि इंटरनॅशनल स्पेस सेंटरची भेट होऊ शकते. जर हा कालावधी वाढला तर यानाला इंटरनॅशनल स्पेस सेंटरजवळ जाताच येणार नाही.

 

spacewalk-inmarathi02
nasa.gov

 

असेच प्रत्येक यानाचे उद्दिष्ट्य आणि टार्गेट ठरलेले असते. आणि अवकाशातील ग्रहांच्या हालचाली, त्यांचे पृथ्वीपासूनचे कमी -जास्त होणारे अंतर ह्यावर लाँच ठरलेले असते.

जरी आपल्याला काही आठवड्यांच्या कालावधीत अनेक फेज आणि प्लेन विंडो मिळत असले तरी लाँचसाठी आणखी अनेक व्हेरिएबल्सचा विचार करावा लागतो. त्यामुळे संभाव्य लाँच विंडो सुद्धा कमी मिळते.

 

launching rocket inmarathi

 

ह्यात टीमच्या “स्लिप सायकल्स”, एक्स्टर्नल टॅंक आणि सॉलिड रॉकेट बुस्टर्स ड्रॉप ऑफ, लाँचच्या दिवशी असलेली वाऱ्याची गती आणि दिशा, संभाव्य धोके आणि अडथळे लक्षात घेऊन मिशन अबोर्टची शक्यता, काही मिशन स्पेसिफिक आवश्यकता आणि योजलेल्या रिएन्ट्री आणि लँडिंगच्या वेळा ह्या सगळ्या बाबींचा समावेश होतो.

जेव्हा लाँच विंडो अखेर निवडली जाते तेव्हा लाँच कॅल्क्युलेशन्स कम्प्युटरद्वारे ऍडजेस्ट केले जातात. अगदी शेवटच्या काऊंटडाऊन पर्यंत ह्या कॅल्क्युलेशन ऍडजस्टमेन्ट सुरु असतात.

 

chandrayaan 2 inmarathi
business-standard.com

 

चुकून जर काही कारणांमुळे लाँचला उशीर झाला किंवा लाँच लवकर करावे लागले किंवा १० मिनिटांच्या लाँच विंडो दरम्यान लाँच मध्ये काही बदल झाले तर ऑर्बिटरची दिशा आयएसएसच्या परिभ्रमण कक्षेप्रमाणे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवावी लागते.

सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येक मिशनचे उद्दिष्ट्य वेगळे असते. त्यामुळे त्या त्या मिशनच्या आवश्यकतेप्रमाणे लाँचची वेळ ठरवली जाते जेणे करून आहे त्या मर्यादित इंधनात, ठरवलेल्या वेळेत अंतराळयान नियोजित ठिकाणी पोहोचू शकेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?