'"सरकार गडकिल्ले विकायला/भाड्याने द्यायला निघालंय" - आरोपामागील तथ्य जाणून घ्या

“सरकार गडकिल्ले विकायला/भाड्याने द्यायला निघालंय” – आरोपामागील तथ्य जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम

===

लेखक: सुचिकांत वनारसे

===

‘महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून संताप’

अशी बातमी सोशल मिडीयावर झळकली आणि सरकारविरोधी बेटांवरून फडणवीस सरकारच्या नावाने खडे फोडायला सुरुवात झाली.

 

devendra-fadanvis-inmarathi
abpmaza.com

आरोपांचे आणि आक्षेपांचे मुख्यत्त्वे ३ मुद्दे आहेत.

– पवित्र गडकिल्ल्यांना हॉटेल कसे काय बनवू शकता?
– पवित्र गडकिल्ल्यांमध्ये लग्नसमारंभ कसे काय आयोजित करू शकता?
– पवित्र गडकिल्ले भाड्याने देणार का?

इंडियन एक्स्प्रेसमध्ये अर्धवट बातमी आल्यावर यावरून रान पेटवणारे मुख्यत्वे सर्व राजकीय पक्ष आहेत. विरोधी पक्ष कधीही लॉजिकल/तार्किक मांडणी किंवा विरोध करत नाही, हे गेल्या काही वर्षात आपण पाहिलेले आहेच! त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करुया.

प्रश्न आहे तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांचा, कर भरणाऱ्यांचा. आपल्यापर्यंत पुराव्यासहीत माहिती जावी म्हणूनच हे स्पष्टीकरण.

आक्षेप १: पवित्र गडकिल्ल्यांना हॉटेल कसे काय बनवू शकता?

 

forts-maharashtra-marathipizza

गडकिल्ल्यांना/ऐतिहासिक वास्तूंना हेरीटेज हॉटेल्सचं रूप देणे ही राष्ट्रीय पॉलिसी आहे.

अगदी २०११ मध्येदेखील युपीए सरकारच्या ‘मॉडेल हेरिटेज रेग्युलेशन्स’ मध्ये याचा उल्लेख आणि ऐतिहासिक वास्तू कशा पद्धतीने विकसित करावी याचे निकष दिलेले आहेत. याचा उल्लेख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्ल्यू प्रिंटमध्येपण आहे.

अर्थातच ही राष्ट्रीय पातळीवरची पॉलिसी आहे. राजस्थान/गोव्यातील किल्ल्यांना लागू होते परंतु महाराष्ट्रातील किल्ल्यांना लागू होणे अशक्य आहे! याचे मुख्य कारण महाराष्ट्रातले बहुतेक किल्ले या निकषात बसत नाहीत हे आहे!

कारण आपले किल्ले वॉर फोर्टस आहेत, रेसिडेन्शल फोर्टस नाहीत…!

हेरिटेज हॉटेल्स कसे असावेत?

१९५० च्या आधीचा पारंपरिक पद्धतीने बांधलेला एखादा राजवाडा, हवेली, ऐतिहासिक वास्तूचे दरबारगृह, हेरिटेज हॉटेल बनू शकते. त्यामध्ये किमान १० खोल्या असाव्यात आणि ही वास्तू भारत सरकारच्या पर्यटन विभागाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करणारी असावी. (निकषांची लिंक)

महाराष्ट्रातले किंवा शिवाजी महाराजांचे बहुतेक किल्ले असे नाहीत…! 🙂

आक्षेप २: पवित्र गडकिल्ल्यांमध्ये लग्नसमारंभ कसे काय आयोजित करू शकता?

लग्न समारंभ ही इतकी वाईट आणि तुच्छ गोष्ट आहे, हे मला या प्रकरणानंतरच समजलं. पण मुळात हेरीटेज हॉटेल्सच बनू शकणार नाहीत तर लग्नसमारंभ कसे आयोजित करणार? आणि कुठे आयोजित करणार? कित्येक किल्लेतर इतके दुर्गम आहेत की, वर जायला रस्तेपण उपलब्ध नाहीत. निवडक २-४ किल्ल्यांवर आपण वाहनाने जाऊ शकतो. उदा. सिंहगड, पन्हाळा, शिवनेरी, पुरंदर ई.

यासाठी गडकिल्ले परिसरात रीजॉर्ट्स बांधावे लागतील. ज्याची नियमानुसार अनुमती आहे! आता असे रीजॉर्ट्स बनवायला गडावरील पठाराचा उपयोग करावा लागेल आणि इतकी जागा मिळणे अवघड आहे. यासाठी पायथ्याच्या ठिकाणी जागा शोधून रीजॉर्ट्स उभी करावी लागतील.

Expensive Hotels in World.Inmarathi3
lagonissiresort.gr

मग त्यात गैर काय?

गडकिल्ल्यांच्या साधारण १० किमी परिसरात अशी हॉटेल्स/रीजॉर्ट्स बनवायला काहीच हरकत नाही आणि तिथे लग्नसमारंभाचा कार्यक्रम घेतला तरीही त्याला हरकत नसावी. लग्नसमारंभ प्रत्येक गावात, वाडी वस्तीत होतातच.

आक्षेप ३: कोणते किल्ले भाड्याने जाऊ शकतात?

वर्ग २ मधले किल्ले! वर्ग २ म्हणजे कोणते किल्ले? तर असे किल्ले जे महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या अखत्यारीत येतात आणि असंरक्षित आहेत. याचेही निकष आहेत! ऐतिहासिक वास्तू विमानतळापासून १०० किमीच्या परिसरातली असावी, ही वास्तू ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असावी. असे २५ किल्ले निवडणार हे सरकारने म्हटले आहे.

त्यातल्या ९ किल्ल्यांची नावे माझ्याकडे आहेत : आणि मजेशीर गोष्ट म्हणजे यातले ४ किल्ले आधीच म्हणजे आघाडी सरकारच्या काळात भाड्याने दिलेले आहेत.

– नळदुर्ग (उस्मानाबाद) – आघाडी सरकार : २०११ –  लिंक

– कंधार(नांदेड) – आघाडी सरकार : २०११ – लिंक

– नागरधन(नागपूर) – आघाडी सरकार : २०११ – लिंक

आघाडी सरकारच्या काळात विदर्भातल्या तब्बल १८ वास्तू भाड्याने दिल्या गेल्यात! यात लखुजी जाधव यांचा बुलढाण्यातला सिंदखेडराजाचा वाडापण आहे.

– यशवंतगड (रत्नागिरी) – हे प्रकरण २०१२ चं आहे. तब्बल ३५ लाखाला हा किल्ला विकल्याच्या बातम्या आधी आल्या आणि नंतर खुलासा झाला की ३५ लाखांना ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिलेला आहे. काय गौडबंगाल आहे ते माहिती नाही…!

इतर किल्ले – कोरीगड(पुणे), घोडबंदर(ठाणे), लाळींग(धुळे), पारोळा(जळगाव), साल्हेर(नाशिक)

यातला नळदुर्ग किल्ला अशाच पद्धतीने विकसित करण्यात आलेला असून हे काम अशोक चव्हाणांच्या काळातच पूर्ण झालेले आहे. आज हा किल्ला नियोजनबद्ध रीतीने उत्तमपणे कार्यरत आहे.

शिवाय मुख्य रस्त्याला लागून असल्याने महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटकमधले अनेक पर्यटक किल्ल्याचा आनंद घेत आहेत. त्यावरचे रिपोर्टिंग एबीपी माझाला पूर्वी झालेच आहे.

मराठवाड्यातील अनेक इतर वास्तूदेखील आधीच भाडे तत्त्वावर दिलेल्या आहेत.

उदा. धाराशिव लेणी, परंडा किल्ला, सोनेरी महाल(औरंगाबाद), दिल्ली दरवाजा(औरंगाबाद), महादेव मंदिर(अनवा-जालना), कंकालेश्वर मंदिर(बीड), महादेव मंदिर(धर्मपुरी), नंदगिरी किल्ला, उदगीर किल्ला, औसा किल्ला, माहूर किल्ला, कंधार किल्ला, सरफराज खान मस्जिद(नांदेड), महादेव मंदिर(नांदेड), चारठाणा मंदिर(परभणी) ई.

४. आत्तापर्यंतचे या विषयावरचे महत्वाचे जी आर!

– २००७ चा शासन निर्णय : लिंक

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालकत्त्व घेतलेल्या संस्थेला किल्ल्यावर विद्युत रोषणाई कार्यक्रम, करमणुकीची साधने, साहसप्रिय खेळ, आकाशदर्शन, गिरी भ्रमंती कार्यक्रम, युथ कॅम्पस, कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम असे उपक्रम शुल्क आकारून राबविण्यात येऊन त्याद्वारे महसूल गोळा करता येईल. मात्र त्या ठिकाणी कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही.

rajgad-fort-inmarathi
aroundpune.com

– महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांचे जतन करणे व राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन, देखभाल, सुशोभिकरण इत्यादी कामांसाठी सार्वजनिक सहभाग मिळवणे, संस्था/व्यक्ती यांना या स्मारकाचे पालकत्त्व घेणेकरीता प्रोत्साहित करणे, खाजगी क्षेत्रातील कौशल्याचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा जतन व दुरुस्ती कार्याकरिता उपयोग करून घेणे या हेतूने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत “महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना” उपरोक्त अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयानुसार दिनांक २ फेब्रुवारी २००७ पासून सुरु करण्यात आली. (लिंक)

फोर्ट पॉलिसी : मार्च २०१९ काय आहे?

➢ This will be a Revenue Sharing Model for the entire period of a Lease of Max. 90 Years (30 Years + 2 Extensions of 30 years each)

➢ Tourism Department shall provide most critical components required for Heritage Development such as Electricity, Water, Approach Roads etc.

➢ The Department will also carry out the most critical restoration of the heritage site

➢ Private Partner will be given preference for developing a Tourist Facility such as Resort/ Hotel/
Restaurant etc. in a 10 KM radius of the Heritage Site

आता यानंतर प्रत्येकजण आपापल्या आकलनानुसार अर्थ काढायला मोकळा आहे!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?