' "परफेक्शन" ची व्याख्या ठरवू शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत...!

“परफेक्शन” ची व्याख्या ठरवू शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हॉलीवूडचा चित्रपट म्हणलं की आपल्यातील अनेकांना मनोमन तो चित्रपट चांगलाच असणार याची खात्री असते. परंतु वास्तवात असं नसतं.

अनेक भारतीय हॉलीवूड वा इंग्रजी चित्रपटांसाठी वेडे आहेत. परंतु त्यांतील अनेकांना सर्वोत्तम चित्रपट माहितीच नसतात.

तर असेच काही चित्रपट जाणून घेऊ या जे परफेक्शनची व्याख्या ठरवून देतात.

चित्रपटात रुची असणाऱ्या सर्वांनी हे १५ चित्रपट बघायलाच हवेत.

१. पल्प फिक्शन

क्वेटीन टेरेन्टिनो या दिगदर्शकाचा हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. १९९४ मधील हा सगळ्यात जास्त पसंतीस पडलेला चित्रपट आहे, तसेच ऑस्कर विजेता चित्रपट आहे.

या चित्रपटाचे नाव हे ग्राफिक व्हॉइलेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या पल्प नावाच्या मासिकाला अनुसरून आहे. अतिशय उत्कृष्ट असे कथानक, आणि त्याच बरोबर त्याला साजेसे डायलॉग, यामुळे चित्रपटाला बहार येऊन जाते.

यातील संवाद हे मनोरंजक, विनोदी आणि थरारक असल्यामुळे चित्रपटाला रंगत येते. हा चित्रपट त्याच्या फायटिंग सीन्स साठी जास्त प्रसिद्ध आहे, जे की अगदीच कल्पने पलीकडचे आहेत. हा चित्रपट नक्कीच पहायला हवा.

 

pulp fiction Inmarathi

२. फॉरेस्ट गम्प

रॉबर्ट झेमेकीस यांचा फॉरेस्ट गम्प हा चित्रपट एका पात्रावर आधारित आहे. ते पात्र टॉम हँक्स यांनी साकारलं आहे. ७५ बुद्ध्यांक असलेल्या पात्राला त्याने अतिशय सुंदर रंगवले आहे.

हा चित्रपट खुपच साधं आणि साजेसं असं चित्र उभा करतं, जे सर्वांना खूप आवडतं. या चित्रपटाने देखील ऑस्कर मिळवला. बऱ्याच चित्रपट प्रेमींचे असे देखील म्हणणे आहे की असा चित्रपट होणे नाही.

 

Forest Gump Inmarathi

३. टू किल अ मॉकिंगबर्ड

हा म्हणजे एक मास्टरपिसच, या चित्रपटाचा जो काही असर होतो तो अजून काही पाहिल्यावर होऊच शकत नाही. ग्रेगरी पेक यांच्या सारखं अटिकस फिंच हे पात्र कोणीच करू शकणार नाही.

अतिशय भारदस्त आणि तेवढंच शांत असं पात्र आहे हे. याचा रिमेक करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण हा चित्रपट तरीही डोक्यातून जाणार नाही.

 

to kill a mockingbird
Barnes & Noble

४. टॅक्सी ड्रायवर

मार्टिन स्कॉरसिस यांचा १९७६ सालचा हा चित्रपट आजही तेवढाच नवा वाटतो. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा त्यातील ते पात्र जगायला भाग पाडतो.

रॉबर्ट दि नीरो ने रंगवलेले हे पात्र म्हणजे चिडकं, रागीट आणि एकटं असं आहे. यातील काही डायलॉग लोकांचे तोंडपाठ होते, इतका हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस पडला.

 

Taxi-Driver-2 inmarathi
The Young Folks

५. रिसर्वोयर डॉग्स

क्वेटीन टेरेन्टिनो या दिगदर्शकाचा हा चित्रपटदेखील नक्कीच पाहायला हवा. हा असा  चित्रपट आहे, जेव्हा तुम्ही स्क्रीन कडे पहात असता तेव्हा ते सर्व खूप खरं असल्याचं भासतं. अतिशय दिग्गज आणि एकापेक्षा एक सरस स्टार कास्ट असलेला हा चित्रपट सर्व क्राईम चित्रपटांसाठी प्रमाण मानला जातो.

 

Reservoir Dogs Inmarathi
Medium

६. स्टार वॉर्स

तरुण पिढीला वेड लावणारा तसेच अस्सल सिनेमॅटिक अनुभव मिळवून देणारा हा चित्रपट आहे. काही लोकांसाठी हे नेहमीचंच अस झालेलं. नावातच स्टार वॉर असलेला हा चित्रपट आपल्याला आहे त्या जागी बसल्या बसल्या, अवकाशात नेऊन पोहोचवतो. कोणी याच्या रिमेकची अपेक्षा देखील करीत नाही.

 

Star wars Inmarathi
GamesRadar

७. नो कंट्री फॉर ओल्ड मेन

कॉएन ब्रोदर्स यांनी केलेला हा मास्टरपीस आहे. यातील बरेच असे सीन्स आहेत जे संपूच नयेत असे वाटतं आणि जसं तुम्ही पुढच्या सीन्सकडे वळता त्या मागच्या भावना आपल्यात अजून तीव्रतेने निर्माण होतात.

हा चित्रपट अगदी परिपूर्ण असा चित्रपट आहे, ज्यात लेखन, दिगदर्शन, त्यातील लोकेशन्स, पात्र, पात्राची मानसिकता, नशीब ह्या सगळ्याच गोष्टी खूप सुंदर रित्या मांडल्या आहेत.

 

no-country-for-old-men_Inmarathi
IFC Center

८. लाईफ इज ब्युटीफुल

नावाप्रमाणेच ब्युटीफुल असा चित्रपट आहे. यात रॉबरटो बेनिग्नी यांनी फॅसिजम याविषयावर भाष्य केलं आहे. हा चित्रपट एका बाजूला नैराश्य तर एका बाजूला प्रोत्साहित करणारा आहे.

या चित्रपटात तुम्हाला भावनेच्या दुनियेत नेण्याची क्षमता आहे, काही चित्रपट असे आहेत जे तुम्हाला खूप काही देऊन जातात आणि त्यातील एक म्हणजे लाईफ इज ब्युटीफुल.

 

Life is beautiful Inmarathi
Cranford – Dialogue

९. द मॅट्रिक्स

वाकोवस्की ब्रदर्स यांचा हा चित्रपट आहे. यांनी हा चित्रपट ऍक्शन चित्रपटांसाठी एक प्रमाण म्हणून सेट करून ठेवला. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय पण तरीही यासम दुसरा नाही असेच म्हणावे लागेल. हा चित्रपट आणि याचे पुढील दोन भाग अजिबात चुकवू नका.

 

the_matrix_Inmarathi
Syfy

१०. शॉशॅन्क रेडेम्पशन

याचे दिग्दर्शक फ्रॅंक दाराबोन्ट यांनी असा चित्रपट बनवला ज्यात कुठेही स्पेशल इफेक्ट्स किंवा मेक अपचा अतिरेक नाही, जे काही आहे ते रिअल.

या कथेत एका अतिशय सुरक्षित अशा जेलमधील कैद्यांचे जीवन आणि कितीही अवघड परिस्थिती असूनही, जिद्द आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास ह्या गोष्टी अत्यंत परिणामकारक रित्या चित्रित केल्या गेल्या आहेत. हा चित्रपट स्टीफन किंग यांची लघुकथेवरून तयार झाला आहे.

 

Shawshank Redemption Inmarathi
Netflix

१. इट्स अ वंडरफुल लाईफ

हा चित्रपट म्हणजे जिमी स्टीव्हर्ट यांनी केलेला जॉर्ज बॅलेय ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अशी भूमिका ठरली. फ्रॅंक काब्रा यांचा १९४६ सालचा हा चित्रपट हे दाखवतो की कसं एक मुलगी एका व्यावसायिकाला आत्महत्तेच्या विचारांपासून दूर करून आयुष्य जगायला शिकवते. अशी भूमिका कोणीच करू शकणार नाही

 

Its a wonderful life Inmarathi
BBC

१२. वन फ्ल्यू ओव्हर द कुक्कुज नेस्ट

आपण असे प्रोत्साहित करणारे बरेच चित्रपट पाहिले असतील, पण यासम दुसरा नाही. याचा रिमेक होऊ शकणार नाही, कारण परत तीच पात्र घ्यावी लागतील अथवा हे होणे नाही.

 

one-flew-over-the-cuckoos-nest-Inmarathi
Wallup.net

१३. एडवर्ड सिजरहँड

टीम बर्टन यांनी आयुष्यात फक्त हाच चित्रपट केला असता तरी हा चित्रपट त्यांना खूप महान बनवतो. असं देखील म्हणलं जातं की हे पात्र जॉनी डेप शिवाय कोणी करूच शकल नसतं. हा चित्रपट कधीच जुना होणार नाही, नेहमी नवीनच वाटेल.

त्नयामुळे हा चित्रपट नक्की पहा.

 

Edward-Scissorhands Inmarathi
Science on Screen

१४. फाईट क्लब

डेविड फेंचेर यांचा हा चित्रपट अतिशय डीप, झटके देणारा, भयंकर काल्पनिक असा आहे. या चित्रपटात बरंच आयुष्यावरचं तत्वज्ञान सांगितलं आहे. यातील पात्र हे विक्षिप्तपणाची हद्दच दाखवलं आहे. या कलाकृती चा रिमेक होऊ नये.

 

fight-club Inmarathi
Variety

१५. द डार्क नाईट

ख्रीस्तोफर नोलन यांचा हा चित्रपट आजही प्रत्येक चित्रपट रसिकाच्या मनात घर करून बसलाय. यातील व्हिलन हा प्रेक्षकांसाठी हिरो ठरला. या चित्रपटाचा प्रत्तेक सीन हा खूप विचार करून केला आहे.

यातील जोकर हे पात्र करण्यासाठी हिथ लीजरने पराकोटीची मेहनत घेतली, आणि त्याला यश देखील मिळालं. कारण तो पूर्णपणे या पत्रात शिरला होता आणि असंही म्हणतात कि त्याचा मृत्यू याच पत्रामुळे झाला. कारण या पात्रामुळेच त्याला ड्रग्जचं व्यसन जडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

पण तो चित्रपट आणि हे पात्र अजरामर झालं.

 

Dark-Knight-Trilogy-Villains-Christopher-Nolan Inmarathi
MovieWeb

हे आहेत ते होलीवूडचे १५ चित्रपट जे तुम्ही नक्की पहायला हवेत, आणि ते तुम्हाला आवडतील देखील.

तुमच्या आवडत्या चित्रपटांची यादी सांगावीशी वाटत असेल तर नक्की सांगा…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?