' “पवार साहेबांची” चिडचिड मोदी-शाह-फडणवीसांसमोरील हतबलतेतून…! – InMarathi

“पवार साहेबांची” चिडचिड मोदी-शाह-फडणवीसांसमोरील हतबलतेतून…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखकः सुधन्वा कुलकर्णी

===

राज ठाकरे ज्यावेळी काका आणि पक्ष सोडून गेले, तेव्हा हा प्रश्न बाळ ठाकरेंना पत्रकारांनी विचारला होता. आणि त्यामागील राजकारण बाजूला ठेवून ठाकरे साहेबांनी याबद्दल खेदही व्यक्त केला होता.

 

balasaheb thackeray uddhav thackeray raj thackeray inmarathi

 

गोपीनाथ मुंडेंचा भाऊ आणि पुतण्या, ज्यावेळी त्यांना आणि पक्षाला सोडून राष्ट्रवादीत गेले तेव्हा मुंडेंना अपरिहार्यपणे हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला होता.

 

gopinath mundhe dhananjay mundhe inmarathi

 

अगदी अलीकडे, सुजय विखे पाटील, त्यांचे वडील आणि पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते होते. त्यांनाही हा प्रश्न पत्रकारांनी विचारला. आणि त्यावर त्यांनी स्वतःची हतबल प्रतिक्रिया ( खरी -खोटी जे असेल ते ) दिली होती.

 

radhakrishna vikhe patil sujay vikhe patil inmarathi

 

थोडक्यात सार्वजनिक जीवनात ज्यावेळी तुम्ही वावरता, तेव्हा अशी घटना घडल्यावर नात्याचा उल्लेख होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि त्यामुळेच मुंडे, ठाकरे किंवा विखे यांनी हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर उलट आगपाखड केली नाही.

मला विचाराल, तर शरद पवार या तिघांपेक्षाही राजकारणात अधिक मुरलेले आणि मुत्सद्दी अर्क आहेत. कुठल्याही राजकीय स्थितीत अविचल राहण्याचा त्यांचा स्वभाव महाराष्ट्रात अजोड आहे.

बरं, पक्षाचा पराभव पचवणे ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट नाही. २०१४ च्या आधी सुद्धा, १९९५ साली युतीकडून ते पहिल्यांदा पराभूत झाले होते.

===

हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

===

तसंच १९९९ साली ज्या सोनियांच्या विरोधात बंड करून नवा पक्ष काढला, त्याच सोनियांच्या समोर अपमान गिळून, महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्ता मिळवण्याचा थंडपणासुद्धा त्यांच्या अंगी आहे.

त्यामुळेच आज सामान्य परिस्थिती असती तर पवारांनी या स्वाभाविक प्रश्नाला सहज टोलवले असते.

“आमचे जवळचे असूनही हे आम्हाला सोडून जातात, ही घटना खेदजनक आहे” असे सांगून, पवारांनी पाटील कुटुंबाच्या स्वार्थाकडे चतुराईने अंगुलीनिर्देश केला असता. पण पवार संतापले. इतके की त्यांनी पत्रकार परिषदेतून उठून जाण्याचा पवित्रा घेतला.

 

ही घटना सामान्य नाही. पवारांच्या चाहत्यांना आणि पक्षाला ऐकू येत नसली, तरी सर्वसामान्य जनतेसाठी नियतीने वाजलेली ही तिसरी घंटा आहे. नव्हे, पवारांच्या राजकीय शेवटाचा हा घणघणीत घंटानाद आहे.

ज्या फोडाफोडीसाठी पवारांचा ४० वर्षे महाराष्ट्रात दबदबा आहे; ज्या सेटिंगबाजीसाठी या तेल लावलेल्या पहिलवानाला अख्खा देश ओळखतो; त्याच गोष्टींमध्ये दोन गुजराती व्यापारी, गुरु गुरु म्हणून आपल्याला वरताण ठरतात, ही गोष्ट पवारांना जिव्हारी लागणारी आहे.

 

narendra modi and amit shaha inmarathi

 

स्वतः पडद्यामागे राहून जाणीवपूर्वक ज्या जातीविरुद्ध गेली २५ वर्षे पद्धतशीरपणे रान पेटवले, त्याच जातीचा मुख्यमंत्री, आकाशपाताळ एक करूनही पदावरून हटत नाही; उलट आपल्या राजकारणावर शिरजोर ठरतो; ही भावना किती वैफल्यकारक असेल?

 

devendra fadnavis marathipizza

 

पवारांच्या जवळ राहून त्यांच्या पुरोगामी मुखवट्याआड लपलेला जातीयवादी चेहरा ज्यांनी पाहिला आहे, त्यांना ते बरोबर जाणवेल. आणि या घटनाक्रमाचा वेध घेतला, की पवारांची अनाकलनीय चिडचिड समजूनही घेता येईल.

नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये, टिमला अत्यंत गरज असताना, इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध महेंद्रसिंग धोनी ज्याप्रकारे खेळला तोही एक असाच घंटानाद होता. धोनीचे कट्टर पाठीराखे आणि चाहते सोडल्यास इतर सर्वांना तो ऐकू आला होता. पण धोनीचे चाहते मात्र त्याला परवा टिममधून ड्रॉप केल्यावरही सत्य स्वीकारण्याच्या मनोभूमिकेत नव्हते.

पवारांच्या राष्ट्रवादीत उरलेल्या मावळ्यांची स्थिती यापेक्षा निराळी नाहीये. कारकीर्द संपल्याने धोनी किंवा शरद पवार छोटे ठरत नाहीत.

पण तुम्ही जबरदस्तीने कोंबडं झाकून ठेवल्याने सूर्य उगवायचा रहात नसतो, हे मात्र नक्की.

===

हे ही वाचा – राज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?